(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नमस्कार – भाग ७

    गणपती आणि कार्तिकेयाची गोष्ट सर्वानाच माहिती आहे. फक्त आठवण करून देतो. सर्वात मोठी प्रदक्षिणा कार्तिकेयाने आपल्या शक्तीने प्रत्यक्ष घातली होती. संपूर्ण पृथ्वीला बाहेरून प्रदक्षिणा ! आणि बुद्धीमान गणेशाने प्रदक्षिणा घातली होती, आपल्या मातापित्यांनाच. आणि मोदकावर आपला हक्क सांगितला होता.

      July 21, 2017


  • भायखळा.. नाव कसे पडले असावे?

    भायखळा’ ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव होते ‘भाया’. ‘भाया’चे खळे ते ‘भायखळे’ आणि त्याचा झाला ‘भायखळा’ ही कथा अनेकदा व्हाट्सअॅपवर वाचण्यात आली. आपणही वाचली असेल..

      August 10, 2016


  • स्मरणगाथा : ६ 

    संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !

    अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान !

    ' कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .'

    ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो .
    प्र .ल. वाट बघत होते .

    ' आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .'
    माझ्या स्कूटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कूटरला किक मारायला विसरलो .

    ' दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ?'
    मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले .
    ' एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल ?'
    ' ते त्यालाच विचारा .'
    त्यांनी विषय संपवला .

    आम्ही हॉटेलवर आलो .
    रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
    ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
    ' जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .'
    ' अहो पण ...'
    मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .

    त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
    पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . कीआणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती .
    पण त्या कथेवर नाटक ?

    मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .

    प्र ल मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .
    आणि प्रकाश बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती .

    हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .

    शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले .
    एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
    या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .

    त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते . आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .
    पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .
    दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .

    ' नाटकाचे नाव काय ठेवणार ? '
    प्रकाशजीनी विचारलं .
    अरे , चल उचल !
    ' असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .'
    ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
    ' हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला . '

    -- आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस ...अनेक गोष्टी .

    'खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..'

    त्यांना मी एक प्रत दिली .
    ते त्या रात्री मुंबईला गेले .
    नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
    अचानक संपर्क थांबला .
    मीसुद्धा व्यग्र होतो .
    आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
    ' प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू झाला आहे ...'

    मला धक्काच बसला .
    अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .

    नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं .
    त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं . त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं .
    पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं .

    त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
    पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .

    एखाद्या संहितेचं भागधेय असतं.
    प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही .

    पण मी नाराज नाही .
    कारण माझी संहिता दमदार आहे .
    कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे .
    दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी देणारं आहे .
    आणि ... आणि बरंच काही आहे त्या संहितेत .

    मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय .

    केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;

    "...श्रीनटेश्वर , रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी , धमाल विनोदी नाटक , अरे , चल उचल ! "

    आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे.

    - डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
    ८९५१९०६७०१
    -------
    स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही

      August 18, 2025


  • चारित्र्य

    उद्या जर घराघरातल्या स्त्रिया ‘मी टू – मी टू’ असं म्हणायला लागल्या तर त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था होईल ? समाजात त्या विषयासंबंधी कोणती प्रतिमा तयार होईल, याची थोडीशी तरी कल्पना करायला हवी. स्त्री-पुरूष संबंधातील चिरंतन सत्य काय आहे, हे जाणून घेतलं- समजून घेतलं तर मनातली वावटळ शांत होईल.

      November 11, 2018


  • गाजर

    गाजराचा नेमका उगम कुठून झाला हे काहीच सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी की, गाजर हे गरिबांचे अन्न आहे. गाजराची बी कुठेही उगवते. व भूक लागली तर लोक गाजर खात असतात त्यामुळे गाजर हे फक्त गरिबांचे अन्न ठरते. जसे आपण आवळा म्हणतो अगदी त्याचप्रमाणे आवळा आणि गाजर हिमालयाच्या पायथ्याशीही मिळते. आवळ्याचे वर्णन स्कंदपुराणात अथवा गरुड पुराणातही मिळते.

      December 14, 2023


  • मानवी मन ( Human Mind )

    निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण व पौष्टिक आहाराची आवशक्यता असते . तसेच मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार ,अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास. व्यक्तीला वाटणारा आनंद ,दुःख ,भावना आपलं शहाणपण,आपली ताकद,आपला वेडेपणा आणि दुबळेपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात .

      April 23, 2017


  • भारतीय स्त्री वैज्ञानिक अनुराधा टि के

    अनुराधा टी.के.यांचा जन्म  कर्नाटकातील बेंगळुरू येथे झाला. त्यांनी बंगळुरू येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली.  १५ जुलै २०११ रोजी  अंतराळ केंद्रातून GSAT-१२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी GSAT-10, GSAT-9, GSAT-17 आणि GSAT-18 संप्रेषण उपग्रहांच्या प्रक्षेपणाचेही निरीक्षण केले.

      August 25, 2025


  • प्रभात फिल्म कंपनीचा खूनी खंजीर चित्रपट

    द्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली.

      March 29, 2022


  • राष्ट्रीय विज्ञान दिवस

    सध्या , शुध्द विज्ञानाचा अभ्यास करण्याची, विद्यार्थ्यांची आवड आणी निकड कमीकमी होते आहे. अुपयोजित आणि व्यावसायिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याकडे आणि तोच व्यवसाय निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.

      February 11, 2022


  • अभ्यंग स्नान.. आरोग्याला वरदान

    दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण घासला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान.

    खरे तर प्रत्येकाने स्वास्थ टिकविणे ही आज काळाची गरज आहे. आपले सगळे सण वार त्याला जोडुन असणारे रिवाज, सणांना करण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नितीनियम गाठोड्यात बांधुन वरच्या माळ्यावर टाकले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपल्याला समजत नाही.

    वास्तवीक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करुन थांबायचे नसते, तर त्या दिवसापासून पुढे वर्षभर करायचे असते. दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल कुण्या प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळित भेटलेले हेच विसाव्याचे क्षण , आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात. प्रत्येक नात्यातला आपलेपणा - आपुलकी पणा टिकवितात.

    दिवाळी म्हणजे मुक्त हस्ताने तेजाची उधळण करणारा सण. दिवाळीत असते दिव्याच्या पंक्तीचे तेज, दारात लटकणारया आकाशदिव्याचे तेज, अंगणात मांडलेल्या रांगोळीचे तेज, श्रीलक्ष्मीच्या आराधनेमुळे आलेल्या मांगल्याचे तेज. एकंदरीत दिवाळी हा सण तेजाची लयलुट करणारा आहे, जीवनास तेजोमय बनविणारा आहे.

    सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणारयांनी आवर्जुन घ्यायला हवा. आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास करणारयांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणारयांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणारयांनी, बौध्दिक शारिरिक परिश्रम करणारयांनी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य प्रतिदिन अभ्यंग करावे.

    सर्व साधारण ३० ते ४० मिनीटे संपुर्ण मसाज व्हायला हवा. तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे. अभ्यंग विषेशतः सकाळी आंघोळ आणि व्यायाम करण्यापुर्वी करावा. अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते, त्वचेचा टोन सुधारतो, त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवरील लव कमी होते. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.

    शरीरात ज्या ठिकाणी वात हा दोष कार्यरत असतो त्या ठिकाणी तैलादी द्र्व्ये ही वात नाशनाचे काम करतात. वाताचे रुक्ष व खरता हे दोन गुण स्नेहाच्या मार्दवता व स्निग्धता या उलट असल्याने वातविकाराचे शमन होते, त्वचेच्या ठिकाणी स्पर्शानुभव होत असल्याने वाताची रुक्षता नियमित अभ्यंग करणारया लोकांमध्ये नश्ट होऊन वात रोगाची उत्पत्ती टाळली जाते. आयुर्वेदानुसार आठ वेळा तुप खाण्यापेक्शा एकदा तैलाभ्यंग करुन घेणे सरस ठरते. नियमित व तात्रिक दॄष्ट्या योग्य प्रकारे तैलाभ्यंगाने सर्व अंगप्रत्यंग पुष्ट व बलवान होतात. दृष्टि तेजोमय होते व मन समाधानी होऊन निद्रा सुखकर होते.

    अभ्यंग म्हणजे वास्तवता शरीरातील वेगवेगळ्या स्नायुंना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम होय. या क्रियेमुळे स्नायुंना गती, चालना मिळुन ते अबाधित रित्या काम करु लागतात. अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्शन क्रियेने उष्णतेची निर्मीती होते. परीणामी रक्ताधीन असलेले विजातीय द्रव्ये तसेच त्वचेखालील अतिरिक्त फॅट वेगवेगळे होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकले जातात. परीणामी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक रक्त शुध्द होऊन शरीराची कांती निखळून येते. शरीरात असणारया वेदना, सुज या तैलाभ्यंगाने नष्ट होऊन अस्थी सांध्यांना पुष्टता व दृढता प्राप्त होते. तसेच मणुष्य देखील शक्ती संपन्न होऊन दिर्घायुष्य प्राप्त करतो. नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते. स्नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.

    अशाप्रकारे शरीराचा लवचिकपणा तसेच कांती थोडक्यात संपुर्ण आरोग्यच जर अभ्यंगा सारख्या सहज सोप्या उपायाने मिळत असेल तर प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यावयासच हवा.

    करावे नित्यदिन सर्वांगास अभ्यंग
    प्रफुल्लीत मन उत्साही सर्वांग
    तारूण्य टिकेल आयुष्य भर
    न दुखणार गुडघा अन् कंबर
    तेजोमय दिवाळी, सुवर्ण मयी काया
    हिच खरी अभ्यंगाची किमया.......

    अभ्यंगासाठी तिळाचे तेल सर्वात चांगले आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये गंगा कंपनीचे वनौषधींबरोबर प्रक्रिया केलेले तिळाचे तेल मिळते किंवा डाबर कंपनीचे भारीचे धान्वंतर तेल मिळते ते तेल आपण अभ्यंगासाठी वापरु शकतो. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकित्सा. अगदी दररोज शक्‍य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी.

    काही शंका असेल तर ०९३२६५११६८१ या व्हॉट्सएप वर मॅसेज करा( कृपया फोन करु नका..इतर मॅसेज पाठवु नका.)

    -- डॉ.कविता पवन लड्डा
    लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
    पद्मा नगर, उदय पेट्रोल पंपामागे, बार्शी रोड, लातूर
    फोन ०२३८२ २२१३६४ , ०९३२६५११६८१

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

      October 20, 2016