वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कार्य कुठलेही असो, सर्वात अगोदर पूजा होते ती, मंगलमूर्ती श्री गणेशाची. मंगलमूर्ती शिवाय प्रत्येक कार्य हे अधुरेच ! अशी ही श्री गणेशाची ख्याती आहे. श्री गणेश हा मंगलमूर्ती तर आहेच, त्यासोबतच बुद्धिची देवता म्हणूनही सर्व ख्यात आहे.
August 8, 2018
उदो बोला उदो अंबा विझामाऊलीचा हो । उदो बोला उदो ।।
उदोकार गर्जती सकल प्रधान मंडळी हो । उदो बोला उदो ।।धृ।।
सह्याद्री पर्वती नगरी ताम्हीणीते मधी हो ।
देवी विझाई वसली प्रधान कुल रक्षिणी हो ।।
मूळ रूप जगन् माता अंबा विध्याद्री पर्वती हो।
ताम्हीणीते आली भत्त*ा प्रसन्न होऊनी हो ।।1।।
उदो बोला उदो ।।धृ।।
सप्तशति जप होम हवने सद्भत्त*ी करूनी हो।
श्रेष्ठ गंगा सुते विध्य पर्वती आकान्त मांडीला हो ।।
तनु त्यागुनि विलिन झाला जगदंब स्वरूपी हो ।
जगतामध्ये कीर्ती केली कायस्थाचे कुळी हो ।।2।।
उदो बोला उदो ।।धृ।।
प्रसन्न झाली अम्बा कनिष्टा कारणी हो ।
रक्षीन तुझे कुला सूर्य चंद्र हो परी हो ।
मागणे मागतो विध्यवासीनी चरणी हो ।
दासा गणेश सुता ठाव द्यावा तो चरणी हो।।3।।
उदो बोला उदो ।।धृ।।
गायक- श्री.गजानन प्रधान.
October 15, 2015
देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर साखरफुटाणे, पेढे, खोबरे, फळे आदी पदार्थ भाविकांना वाटले जातात. त्याला देवाचा प्रसाद अशी संज्ञा आहे.
प्र म्हणजे पुढे, साद म्हणजे हाक मारणे. प्रसाद ग्रहणामागे देवाला `आमचे जीवन पुढे ने' अशी सुप्तपणे मारलेली हाक असते. या प्रसादामध्ये देवाची कृपादृष्टी असल्यामुळे तो श्रध्देने खाल्ला असता समाधान प्राप्त होते.
देवाला पंचामृताचे स्नान घातल्यानंतर ताम्हणात जे पंचामृताचे पाणी सांडते त्याला तीर्थ म्हणतात. कारण त्याला तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त झालेले असते. हे तीर्थ प्राशन केले असता तीर्थक्षेत्राचे पुण्य माणसाला लाभते. तीर्थ याचा अर्थ असा की जे तारते ते तीर्थ. म्हणूनच देवाची आरती झाल्यावर तीर्थप्रसाद देण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे.
March 19, 2016
रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.
December 14, 2010
प्रथम खोकल्याचे औषध घेण्यापुर्वी आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा खोकला झाला आहे हे समजायला हव!
सर्दी खोकला ही जुळी भावंड असल्यासारखे असतात. सर्दी झाली की काही दिवसांनी खोकला होतोच. विविधप्रकारचे धुर- धुळ वा वास अत्तर रसायनांचे वास उदा. बॅगाॅन स्प्रे वगैरे, आईस्क्रिम, थंड पाणी, शीतपेय , सरबत यांच्यामुळे खोकला होतो. थंड वातावरणात रहाणे किंवा जाण एयरकंडीशनर चा वापर अती प्रमाणात करण यामुळे खोकला होऊ शकतो. भरभर जेवताना एखादा कण श्वासामार्फत गेल्यामुळेसुद्धा खोकला येतो.
अती व्यायाम, ओझ उचलण, अती चालण, अती जागरण, अती बोलण, दिवसा झोपणं, अति मैथुन करणं , अत्याधिक उपवास करण, वेळी अवेळी भोजन करण, कोरडे पदार्थ शिळे पदार्थ खाणे, अतिगोड, खारट, तेलकट आंबट असणा-या पदार्थामुळे खोकला होतो
वात- कफाचा खोकला
खोकला झाल्यावर तो कोरडा किंवा वातप्रधान असल्यास खोकताना फुटक्या भांड्याप्रमाणे आवाज येतो.ब-याच वेळा खोकला आल्यावर थोडा कफ पडतो व नंतर ढास थांबते. कफप्रधान म्हणजे ओला खोकला असल्यास खोकताना कफ सुटत असतो. तो वारंवार थुंकून टाकावा लागतो. बारीक ताप येण किंवा अंग दुखणं यासारखी लक्षण उत्पन्न होतात. आवाज बसन, खोकून तोंडाला कोरड पडण, थकवा जाणवणं यासारखी लक्षण दिसतात. कोरडा खोकला होतो त्याला डांग्या खोकला म्हणतात.
कफाच्या खोकल्यावरचा इलाज
1) सुंठ, मिरी, पिंपळी यांच चूर्ण मधामधुन चाटवावं.
2) सुंठ टाकुन उकळलेल पाणी प्यायल्याने खोकला व कफ कमी होतो
3) अडुळसा या वनस्पतीचा रस काढुन त्यात मध टाकून किंवा काढा करुन पाजल्यास खोकला कमी होतो
४) कोरफड भाजून त्यातील गर काढून त्यात मध मिसळून चाटवल्यास खोकला कमी होतो.
५) दालचिनी पावडर मधातून वारंवार चाटवावी त्यान खोकला कमी होतो
६) द्राक्षसव, कुमार आसव, अडुळसा सिरप, पिंपलासव ही बाजारात मिळणारी औषध उपयुक्त आहेत
७)छातीला तीळतेल व सैंधव एकत्र करुन माॅलिश करावी आणि गरम पाण्याच्या पिशवीन शेक द्यावा
८) दोन चमचे तुळशीचा रस, एक चमचा आल्याचा रस आणि मध अंस चाटण द्याव किंवा तुळशीचा काढा करुन प्यावा.
९) गवती चहाचा काढा करावा त्यात सुंठ, पिंपळी, दालचिनी, मिरी, आणि गुळ टाकुन एक कपभर काढा पाजावा
१०) वेलदोडे व लवंग भाजुन त्याची राख मधातून चाटवल्यास कफाचा खोकला त्वरीत कमी होतो
कोरडा खोकला
उपाय
कोरडा किंवा वातप्रधान खोकला असल्यास
१) खोबरेल तेल, तीळाचे तेल किंवा सहचर तेल किंवा दोन- तीन चमचे गाईचे तुप गरम पाणी आणि चिमुठभर सैंधव मिठ अंस एकत्र करुन पाजल्यास खोकल्याची ढास त्वरीत कमी होते. तेल किंवा तुप हे या खोकल्यातील प्रभावी औषध आहे
२) रुईची फुल, पानं वाळवुन ती जाळुन त्याची राख करुन ठेवावी व ती राख एक चिमूट व मधातून किंवा तेलातून चाटवल्यास दमा त्वरित कमी होतो
३) सागाची पानं, पळसाची पानं, रुईची पानं, फुलं, आवळकाडी, जाळुन त्याची राख, त्रिफळा किंवा बेहडा, लवंग वेलदोडा गायीच्या शेणाची राख यांचा प्रभावी उपचार या खोकल्यावर होतो
४) डाळिंबाची साल उगाळून चाटवणं किंवा सालीचा काढा करून त्यात तुप आणि सैंधव मीठ टाकून दिल्यास कितीही खोकला असेल तरी तो तात्काळ थांबतो
५) हळद, सुंठ व गुळ एकत्र करुन त्याच्या बोरा एवढ्या गोळ्या करुन ठेवाव्यात व दर १०/१५ मिनटांनी चघळाव्यात*
६) कोरडा खोकल्याच प्रमाण अतिशय असल्यास तेलाची बस्ती म्हणजे एनिमा द्यावा तात्काळ उपयोग होतो
या लेखाचे लेखक वैद्य विनय वेलणकर हे ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत
( vd.velankar@gmail.com)
कमलाकर भोईटे यांनी आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवर पाठवलेला लेख.
08275275841
April 7, 2017

आपल्या या संशोधनावरून बार्बरा शेरवूड लोलार यांनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. मंगळावर आज जीवसृष्टी अस्तित्वात नाही. परंतु मंगळ काही अब्ज वर्षांपूर्वी वसतियोग्य ग्रह होता. मंगळावरची आजची परिस्थिती जरी जीवसृष्टीच्या वाढीसाठी फारशी पोषक नसली तरी, एके काळी तिथे प्राथमिक स्वरूपाची जीवसृष्टी कदाचित अस्तित्वात आलीही असेल. बार्बरा शेरवूड लोलार यांच्या म्हणण्याप्रमाणे, मंगळावर जर अशी जीवसृष्टी निर्माण झाली असली, तर ती तिथल्या जमिनीखालील खोलवरच्या पाण्यात तग धरून राहिलीही असेल. त्यामुळे भविष्यात जर मंगळावरच्या जमिनीत खोलवर अशी जीवसृष्टी सापडलीच, तर आश्चर्य वाटायला नको!
September 7, 2022
दोघी एकमेकींना आजारी पडलेलं बघत, बरं होताना बघत, त्याबद्दल मला प्रश्न विचारत, तेव्हा त्या त्या वयाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांना काय झालंय, ते कशाने बरं होईल याची शास्त्रोक्त माहिती मी देत असे, अजूनही देते.
February 13, 2022
घराण्यात कुठलाच आजार नसताना अचानक एका बाळात/ व्यक्तीत अनुवंशिक आजार उद्भवू शकतो का? हा प्रश्न मनात येतो. रंगसूत्रांत वा गुणसूत्रांत गर्भ वाढत असताना नव्याने काही चुका/ दोष निर्माण होऊ शकतात. त्यातून वाढणाऱ्या गर्भात/ व्यक्तीत अनुवंशिक आजार दिसतो, मात्र तो आई-वडिलांकडून आलेला नसतो. अनेकदा जनुकांच्या दोन प्रतींमधली एक प्रत काम करीत नसते, मात्र दुसरी प्रत आवश्यक ते काम योग्य प्रकारे आणि शरीराला पुरेशा प्रकारे करते.
May 15, 2023
आयुष्य तर किती एकसारख्या अशा हुलकावण्या आपल्याला देत असतं ना! अगदी आता-आता आपलं सारं सुख, आपला आनंद, किंवा आयुष्याचं मर्म आपल्या जवळ दिसू लागलंय, म्हणेपर्यंत निसर्गाने कूस बदलून घ्यावी, साऱ्या दिशाच विस्कटून, टाकाव्यात, असे काहीसे खेळ चालू असतात त्याचे!
September 14, 2019
खय्याम साहेब तसे एस-जे, एस.डी, एल-पी किंवा आर.डी. यांच्यासारखे खूप फॕन फाॕलोईंग असणारे संगीतकार नव्हते. तसे त्यांचे नावही फक्त दर्दी कान-सेनांनाच ठाउक आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चटका लागलाच पण त्याचवेळी त्यांच्याविषयी त्यांच्या संगीताविषयी एवढं भरभरुन दाखवले गेले व लिहीले गेले हे पाहून मनाला खरंच समाधान वाटलं त्यांच्या निधनानंतर मी जे काही थोडे कार्यक्रम पाहिले व लेख वाचले त्यात खय्याम साहेबांची बरीच गाणी उल्लेखली गेली.
April 19, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti