वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजचा दिवस माझा – राजकीय “माणूस टिपणारा” चित्रपट. राजकीय पदाच्या अतिउच्च स्थानावर पोहोचण्याआधी व नंतर आपली माणूस म्हणून असलेली छबी कशी जपावी हे “आजचा दिवस माझा” मधून अधोरेखीत करण्याचा प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शकाने केला आहे.
April 5, 2013
प्राणापासून बुद्धी पर्यंत सर्वत्र चालणारा चैतन्याचा विलास पाहिल्यानंतर त्या प्रत्येक जागी आत्मस्वरूपाचा विचार करून, चिंतन करणार्या साधकाला त्या त्या स्थानी असणाऱ्या मर्यादेची देखील जाणीव होते.
November 26, 2020
मनगटी घड्याळाचा शोध पॅटेक फिलीप यांनी लावला व गंमत म्हणजे त्याकाळात हे घड्याळ म्हणजे महिलांचे आवडते साधन होते. त्यानंतरच्या काळात क्वार्ट्स घड्याळे आली व कालांतराने त्यांची जागा डिजिटल घड्याळांनी घेतली. १९५६ मध्ये त्यांचा शोध लागला.
August 19, 2023
वेरा लीचा जन्म 17 मार्च 1903 रोजी leeds इंग्लंड येथे झाला. तिचे मूळचे नाव वेरा ग्लास पण तिला लहानपणीच एच इगन लीग ह्या रेसकोर्सच्या घोड्याना ट्रेनिंग देणाऱ्या माणसाने दत्तक घेतले त्यामुळे ती वेरा लीग झाली. तिचे लहानपण मेसन लिफि ह्या घोड्यांच्या तबेलयांच्या आसपास गेले. लहानपणी तिला मोठे झाल्यावर जॉकी बनायचे होते.
January 15, 2023
ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगटलेल्या भगवान शंकरांच्या दिव्य स्वरूपाचा अंतपार जाणण्याच्या, भगवान श्री विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव यांनी केलेल्या प्रयासाची कथा पुराणांमध्ये प्रचलित आहे.
September 1, 2020
गीतेच्या या श्लोकानुसार आत्मा, मानवी शरीरात, जन्मापासून मरेपर्यंत असतो आणि मृत्यूनंतर तो दुसर्याा शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतो. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असतो आणि तो गर्भधारणेपासून मरेपर्यंत शरीरातच असतो. आनुवंशिक तत्व, जनक पिढीक़डून अपत्य पिढीत संक्रमित झाले म्हणजेच आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म झाला असे..आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मानतो.
May 22, 2012
निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.
माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.
हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.
त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.
हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
कसा कळणार ?
मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
आपुला संवाद आपणासी.....
अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.
पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती - समाधान.
म्हणजेच तृष्णा आणि तृप्तीच्यामध्ये तो आहे.
त्याला विसरून कसे चालेल ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
10.12.2016
December 10, 2016
आजच्या स्पर्धेच्या युगात अशा भ्रूणहत्या ठिकठिकाणी घडताहेत. त्यावर कुणाचाही वचक नाही , कुणाला काही देणंघेणं पडलेलं नाही आणि कुणालाही कसलंही सोयरसुतक नाही…
August 21, 2025
जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.
वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.
मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.
पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.
दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.
कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.
जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
पायांना भक्कम आधार हवा,
पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
21.09.2016
September 21, 2016
आजच्या प्रगत इंजिनिअरिंगला सुद्धा तोंडात बोट घालायला लावेल असा हा ‘भुलभुलैय्या’ लखनौच्या बडया इमामबाडयात आहे. नवाब आसफउद्दौलाने याच वास्तूत… सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भुलभुलैय्या बांधला. यातल्या वास्तू-बांधकामशास्त्रातल्या योजना बघितल्या तर विश्वास बसत नाही. त्यातही इथे त्याने ध्वनीशास्त्रातल्या प्रतिध्वनीच्या उपयोगाची कमाल केली. अगदी आपल्या श्वासाचा देखील आवाज ऐकू येईल, इतकी जबरदस्त.
October 17, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti