वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
January 4, 2022
October 27, 2016
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे व पूर्ण शक्तीपीठ आहे. श्रीमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या जिल्ह्याचे ठिकाणी आहे .कोल्हापूरला प्राचीनकाळी गौरवाने दक्षिणकाशी म्हटले जाते असे. महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परीसरात पश्चिमाभिमुख आहे या मंदिराचे उल्लेख ईस च्या सुरवाती पासून मिळतात. या मंदिराच्या चारी दिशांना प्रवेश दरवाजे आहेत ईस ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व येथील अतिबलेश्वर मंदिर यांचे काम झाले.
पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला ’महाद्वार’ असे म्हणतात ईस 1218 मध्ये यादव तौलम याने हे महाद्वार बांधले. मंदिराबाहेरील खांबांवर केलेलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे . मुख्य मंदिरचे काम दगडी असून मंदिर बाहेरुन तारांकित आकाराचे आहे. सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. ६०० ते ७०० या शतका मधील असुन. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्नोधार केला. व येथील महाकालीचे मंदिर बांधले. मुख्य महालक्ष्मी मंदिरास एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे मंडपास अनेक खांब आहेत. मुख्य मंदिराला जोडून गरूड मंडप आहे. मंदिराच्या गर्भगृहात दगडी चबूतऱ्यावर श्रीमहालक्ष्मीची मूर्ती उभी आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून ती चक्रावर उभी आहे, मूर्ती काळ्या रंगाच्या शिलेपासून बनविलेली आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असुन मूर्ती चतुर्भुज आहे तिचे वरच्या उजव्या हातात गदा तर डाव्या हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातात मातुलिंग व डाव्या हातात पानपात्र आहेत. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेष नागाने छाया धरली आहे. उत्तराभिमुख योनी व लिंग आहे मागील बाजूस सिंह आहे. मागील बाजूचे चांदीची प्रभावळी वर चंद्रसूर्याच्या दोन आकृत्या आहेत.
महालक्ष्मी विषयी काही कथा प्रचलित आहेंत
गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णू चे भेटीस आले, विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला.हर ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्ती साठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थाना विषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.
पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्याचे नावा वरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले.कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता,ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते.
मंदिराचा प्रदक्षिणेचा मार्ग जवळपास स्वस्तिकाच्या आकाराचा असून सोळा काटकोनातून प्रदक्षिणा घालावी लागते. मुख्य मंदिराच्या दोन्ही
बाजूला श्रीमहाकाली व श्रीमहासरस्वती या देवींची मंदिरे आहेत.
या परिसरात सूमारे २५० देवी-देवतांची मंदिरे आहेत.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेपासूनचा नवरात्र उत्सव मोठा असतो. प्रतिपदेला बैठीपूजा, द्वितीयेला खडीपूजा, त्र्यंबोलीपंचमी दिवशी हत्तीच्या अंबारीतील, रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा, अष्टमीला महिषासूरमदिर्नी, सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजा साकार होतात.
अष्टमीला घागरी फुंकण्या पद्धत आहे मध्यरात्रीपर्यंत धामिर्क सोहळे होतत. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन, शस्त्रपूजा होते. तिरुपती मंदिराकडून आलेला शालू त्या दिवशी नेसवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते. संध्याकाळी तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते. दसरा चौकात शिलंगणाचा होणारा हा सोहळा संपन्न होतो. तिथे सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखी परत मंदिराकडे निघते. व नवरात्र सोहळा संपन्न होतो.
-- निखिल आघाडे
October 5, 2016
गंधर्व संगीत
श्री वरदविनायक सिध्दगणेशा
हे मंगलमुर्ती हे श्रीगणराया
घेऊनी सोबत सप्तसुरांना
यावे तुम्ही हो श्रीगणराया ।
शब्द माझीया हृदयी वसती
अर्थ शब्दांना तुम्हीच द्यावा
द्यावे सूर तुम्ही मम शब्दांना
संगीतही द्यावे त्यांना गाया ।
नाही सूर अन् नाही संगीत
काय अर्थ मग मम शब्दांना
करितो विनती हात जोडूनी
सूरसंगीत तुम्ही द्या गणराया ।
देता संगीत तुम्ही मम शब्दांना
सूर मिळेल गंधर्वांचा त्यांना
यास्तव विनती हे गौरीनंदना
झडकरी या हो श्रीगणराया ।
सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
१४ जुलै. २०१८
July 26, 2018
भारताची शस्त्रसिद्धता किती मागे पडली आहे यावर पूर्वीही अनेकदा लेख लिहिले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण ही गोष्ट चर्चेचा नवा विषय नाही. पारंपरिक युद्ध क्षमता, शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण, रस्ते, रेल्वेमार्ग बांधणे आणि सर्व शस्त्रे – रणगाडे, तोफा आणि इतर शस्त्रास्त्रे यांचे मेक इन इंडिया अंतर्गत आधुनिकीकरण करण्याची गरज आहे.
January 21, 2020
दिल्लीमध्ये नुकतेच झालेले तीन भूकबळी. त्याबद्दलची अस्वस्थता मांडण्याचा केलेला प्रयत्न
August 4, 2018
अमेरिकेतल्या अस्वलांमधे ग्रीझली बेअर्स आणि ब्लॅक बेअर्स हे दोन प्रकार. ग्रीझली अस्वलं कॅनडामधे आणि अमेरिकेच्या वायव्येकडच्या राज्यांमधे प्रामुख्याने आढळतात. कॅनडा आणि अमेरिकेमधली सीमा रेषा ही उघडीच असल्यामुळे या सीमेलगतच्या भागात ग्रीझलीज मोकळेपणाने दोन्ही देशांमधे ये जा करत असतात. एकंदर ग्रीझलीजची संख्या सुमारे ६०,००० असावी असा अंदाज आहे. त्यांतील बहुतेक कॅनडातच आहेत तर अमेरिकेच्या वायोमींग, मॉंटेना, आयडॅहो, वॉशिंग्टन या राज्यांमधे मिळून १५०० ग्रीझलीज असावेत.
काळ्या अस्वलांच्या मानाने ग्रीझलीज आकारमानाने खूपच मोठे असतात. ४००-५०० किलो वजनाच्या या ग्रीझलीजना काळ्या अस्वलांप्रमाणे सराईतपणे झाडावर झरझर चढता येत नाही. अशा प्रकारे पलायनाचा मार्ग खुंटल्यामुळे संकटाची थोडीशी जरी शंका आली तरी ग्रीझलीज आक्रमक बनतात. विशेषत: लहान बच्चे बरोबर असले तर मादी फारच आक्रमक बनते. ग्रीझलीजच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणार्या लोकांपैकी सुमारे ६०% मृत्यू हे अशा चवताळलेल्या माद्यांमुळे होतात. ग्रीझलीज शक्यतो माणसांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. ग्रीझलीजच्या परिसरात कॅंपींग करण्यासाठी जाणार्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते. ग्रीझलीजचे घ्राणेंद्रीय फारच तीक्ष्ण असते, आणि कॅंपच्या जवळपास निष्काळजीपणाने टाकलेलं खाद्य किंवा डबे म्हणजे संकटाला निमंत्रणच ! एकदा का ते कॅंप्सच्या जवळ यायला चटावले की ते धीट बनतात आणि माणसावर हल्ले करायला मागे पुढे पहात नाहीत. बर्याचदा अशा ग्रीझलीजना गोळी घालून ठार मारण्याशिवाय पार्क रेंजर्सपुढे काही उपाय रहात नाही. त्यामुळे अशा कॅंपसमधे दोन झाडांच्यामधे उंचावर एक दोरी लावून त्यात शिंकाळ्यासारखं खाद्य बांधून ठेवण्याची पद्धत असते.
शक्यतो काळी अस्वलं, ग्रीझलीजच्या प्रदेशात फिरकत नाहीत परंतु पाईन नट्स, एकॉर्नस, बेरीज असा काही शाकाहारी आहार दोघांच्याही आवडीचा असल्यामुळे, त्याच्या शोधार्थ ग्रीझलीज कधी कधी काळ्या अस्वलांच्या प्रदेशात प्रवेश करतात. कधी ग्रीझलीज आणि काळ्या अस्वलांची आमने सामने गाठ पडलीच तर ग्रीझलीजच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमतेमुळे, काळी अस्वलं घाबरून पळ काढतात. वायोमींग राज्यातल्या यलोस्टोन नॅशनल पार्क या जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानामधे ग्रीझलीज आणि लांडगे ह्या कट्टर शत्रूंची अनेकदा एकमेकांशी गाठ पडते. बहुतेक वेळा लांडग्याच्या कळपाने एखाद्या एल्कची शिकार केलेली असते आणि शिकारीच्या वासानं एखादं ग्रीझली ऐनवेळी तिथे येऊन टपकतं. मग लांडग्यांचा कळप आणि ग्रीझलीचा, उंदीर-मांजराचा खेळ चालतो. ग्रीझलीच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे, लांडगे ग्रीझलीवर समोरासमोर हल्ला करण्याचं धाडस करत नाही. कधी गनिमी कावा करून एखादा लांडगा ग्रीझलीचं लक्ष विचलीत करतो आणि तोवर बाकीचे लांडगे भक्षाचे लचके तोडून पळ काढतात. तर कधी कधी दोन तीन लांडगे एकत्र येऊन ग्रीझलीच्या पुठ्ठ्यावर पाठीमागून हल्ले करून त्याला बेजार करून सोडतात. ग्रीझलीचा आहार शाकाहारी, मांसाहारी असा संमिश्र असतो. मूस, हरीण, एल्क, बायसन, करीबू अशा प्राण्यांची शिकार करण्यात ग्रीझलीचा हातखंडा असतो. कधी कधी काळ्या अस्वलांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडायला देखील ते मागे पुढे पहात नाहीत. ग्रीझलीजना मासे देखील फार आवडतात, त्यामुळे नद्या, ओढ्यांच्या उथळ भागात उभं राहून, पंजाच्या फटक्याने सामन, ट्राउट, बास जातीचे मासे मारून ते खातात. ग्रीझलीजना मेलेल्या प्राण्यांचं मांस खाण्याचं देखील वावडं नसतं.
थंडीचा मोसम जवळ येऊ लागला की ग्रीझलीज भरपूर खाऊन शरीरामधे चरबीचा संचय करून घेतात. थंडीच्या ऐन कडाक्यात ६००० फुटांवर, उत्तरेकडच्या डोंगर उतारांवर, खोबणी, बीळांमधे जाऊन ग्रीझलीज झोपी जातात (hibernation). थंडीचे हे काही महिने ते पूर्णपणे झोपूनच काढतात. परंतु काही ठिकाणी मात्र जिथे वर्षभर अन्न मिळतं, तिथे ग्रीझलीजना असं थंडीमधे झोपी जावं लागत नाही.
ग्रीझलीजचा संचार कॅनडा आणि अमेरिकेच्या उत्तरेकडच्या राज्यांपुरता सिमीत असला तर त्यामानानं काळी अस्वलं सर्वत्र आढळतात. अलास्कापासून खाली मेक्सिकोपर्यंत आणि अटलांटिक पासून पॅसिफिकपर्यंत सर्वत्र त्यांचा संचार असतो. तपकिरी रंगाची अस्वलं (त्यात ग्रीझलीज देखील आले) ही युरेशियातून आलेली तर काळ्या अस्वलांचा उगम सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वी अमेरिकेतच झाला. काळी नर अस्वलं १५०-१७५ किलो वजनाची असतात (काही थोराड नर चक्क ३००-३५० किलो वजनाचे असतात) तर माद्या १००-१५० किलो वजनाच्या असतात. काळी अस्वलं साधारणपणे जंगलात आणि झाडाझुडपांच्या गर्दीमधे रहाणं पसंत करतात. परंतु कधी कधी शेतांच्या कडेला, माळरानात देखील ही आढळतात.
हिवाळ्यात, झाडांच्या मोठ्या ढोल्यांमधे, मोठ्या दगडांच्या किंवा ओंडक्यांच्या खाली, नद्यांच्या सुकलेल्या पात्रांमधे तयार झालेल्या खबदाडीमधे, बीळांमधे, ती झोपी जातात. पेनसिल्व्हेनियामधे डोंगराळ, दाट झाडींच्या भागामधे काळी अस्वलं खूप आहेत. काही वेळा स्थानिक वर्तमानपत्रांमधे त्यांच्या बातम्या यायच्या. काही वेळा या डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमधे, एखाद्या घराच्या डेक खाली, अडगळीमधे जागा शोधून, एखादं काळ अस्वल झोपी गेलेलं हिवाळ्यात आढळून यायचं. मग वनखात्याचे लोक येऊन त्याला गुंगीचं औषध देऊन पकडायचे आणि दूर जंगलात सोडून यायचे. कधीतरी कोणाच्यातरी आवारामधे अस्वलांचे ठसे दिसणं, बागेच्या कुंपणांच्या खांबांवर, झाडांच्या बुंध्यांवर त्यांच्या नखांचे ओरखाडे दिसणं हे देखील बरेचदा व्हायचं. आडवाटेच्या रस्त्यानं जाताना तर बरेचदा एखादं एकांड अस्वल किंवा मादी आणि एखाद दुसरं पिल्लू दुडक्या चालीने रस्त्याच्या कडेच्या गवतातून चालताना दिसायचे.
स्प्रिंग सीझनमधे नव्यानेच जन्मलेले बछडे बिळांतून, ढोल्यांतून बाहेर पडून हिंडा फिरायला लागतात. बछड्यांच्या जवळपासच त्यांची आई देखील असते आणि संकटाची चाहूल लागताच ती बछड्यांना झाडावर चढायला लावते. पहिला हिवाळा संपेपर्यंत बछडे सततच आई बरोबर असतात आणि साधारणपणे दीड वर्षांचे झाले की स्वतंत्रपणे हिंडू लागतात. काळ्या अस्वलांचा आहार देखील संमिश्र असतो. छोटी फळं, बिया, यांच्याच बरोबरीने कीटक, वाळवी, मुंग्या, मधमाश्या वगैरे देखील त्यांच्या आहारात असतात. खारी, उंदीर सश्यांसारख्या छोट्या प्राण्यांबरोबरच हरणाची छोटी शावकं देखील ते मारतात. मरून पडलेल्या प्राण्यांचं मांस देखील त्यांना वर्ज्य नसते. ग्रीझलीज प्रमाणे काळ्या अस्वलांना देखील सामन, ट्राउट हे मासे पकडून खायला आवडतं. ग्रीझलीजच्या मानाने काळी अस्वलं मनुष्यवस्तीच्या बरीच जवळ येतात. कॅंप साईट्सवर येऊन तंबूंच्या आसपास पडलेलं खाणं धुंडाळणं हा त्यांचा आवडता उद्योग असतो. गावांमधे येऊन कचर्यांचे डबे शोधायला किंवा शेळ्या, मेंढ्या, वासरांवर हल्ले करायला देखील हे मागे पुढे पहात नाहीत.
अमेरिकेतल्या वन्यप्राणी जीवनाच्या मानाने भारतातले वन्यप्राणीजीवन कैकपटींनी अधिक वैविध्यपूर्ण आणि रोमांचक आहे, यात काही वाद नाही. गीरच्या जंगलात उरलेले थोडेफार एशियन वंशाचे सिंह, एशियन हत्ती, वाघ, काझीरंगाच्या जंगलातले गेंडे, उडत्या घारी, कच्छच्या वाळवंटातली वन्य गाढवे, हिमालयात आढळणारे स्नो लेपर्डस, नाना प्रकारचे पक्षी, साप, ….. किती नावे घ्यावीत? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या अद्भूत नैसर्गिक ठेव्याची आपण अक्षम्य अशी हेळसांड करत आहोत. जंगले नष्ट होत चालली आहेत. कित्येक पशूपक्षांच्या जाती नष्ट झाल्या आहेत, होत आहेत. जंगलांच्या आसपास रहाणार्या खेडुतांची जीवनप्रणाली आणि वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने यांच्यातील संघर्ष वाढतच जात आहे. शेती, नागरी वस्त्या आणि तथाकथित आधुनिकता आपले पाश फैलावून, निसर्गाचा आणि त्याच्याशी निगडीत नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करत आहे.
अमेरिकेची इतर अनेक बाबतीत नक्कल करण्याचा प्रयत्न करणारे आपण, त्यांच्याकडून, निसर्ग आणि वन्यप्राणीजीवनाच्या संवर्धनाच्या बाबतीत काहीतरी शिकणार आहोत का?
-- डॉ. संजीव चौबळ
December 24, 2016
भगवान श्रीशंकरांच्या अष्टतनुधारी तथा सर्वश्रेष्ठ, तुरीय स्वरूपाचे वर्णन करताना या श्लोकात आचार्य श्री म्हणतात…
September 2, 2020
तार्किकदृष्ट्या या आगींमागील कारणांचा वेध घेतल्यास अशा घटनांमागे मोठे अर्थकारण असल्याचे सहज स्पष्ट होते. कापूस खरेदी आटोपलेली असते, कापसाच्या गठाणी बांधून तयार झालेल्या असतात. बाकी असते ती केवळ प्रतवारी आणि मूल्यांकन.
April 24, 2005
ह्रींकारत्रयसंपुटॆन महता मन्त्रॆण संदीपितं
स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् ।
तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा लक्ष्मीश्चिरस्थायिनी
वाणी निर्मलसूक्तिभारभरिता जागर्ति दीर्घं वयः ॥ १६ ॥
कल्याणवृष्टिस्तवाच्या या शेवटच्या श्लोकात फलश्रुती वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,
ह्रींकारत्रयसंपुटॆन- तीन ह्रींकार संपुटित.
कोणत्याही मंत्राच्या मागेपुढे एखादी गोष्ट लावले जाते तेव्हा त्याला संपुट असे म्हणतात. ह्रीं या बीजाक्षराच्या आधी ओंकार आणि नंतर श्री लावला जातो. अशा संपुटाने त्याला मंत्रत्व प्राप्त होते.
आई जगदंबाच निर्गुण-निराकार परब्रह्म आहे आणि तीच परमशक्ती आहे.हे सांगण्यासाठी आधी ओंकार आणि पुढे श्री लावला जातो. त्याचवेळी हे तिन्ही जणु काही एकच आहे ते सांगण्यासाठी ह्रींकारत्रय म्हटले.
महता मन्त्रॆण संदीपितं- ॐ ह्रीं श्रीं या महान मंत्राने संपादित असणारे, युक्त असणारे.
स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् - हे स्तोत्र, हे आई जगदंबे ! जो रोज तुझ्यासमोर मंत्राप्रमाणे जपतो.
त्याला मिळणारे दिव्यलाभ सांगताना आचार्यश्री म्हणतात,
तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा- क्षोणी म्हणजे पृथ्वी तर भुज म्हणजे उपभोग घेणारा. अर्थात राजा. स्तोत्र वाचणाऱ्याला राजाही वश होतो. लक्ष्मीश्चिरस्थायिनी- स्थिर संपत्ती प्राप्त होते. संपत्ती इतरवेळा चंचल असते. पण आईचा कृपेने ती देखील स्थिर राहते. अर्थात लोकविलक्षण लाभ होतात.
वाणी निर्मलसूक्तिभारभरिता- सुंदर सुभाषितानि अलंकृत असलेली वाणी प्राप्त होते.
जागर्ति दीर्घं वयः- दीर्घकालिक आयुष्य प्राप्त होते.
जय जगदंब !
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 27, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti