(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ८ – अशोक वृक्ष

    बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक. दोन्हींची कुळे वेगळी आहेत. सीता अशोक सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) व हिरवा अशोक अनॊनेसी कुळातील आहे. मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो.

      February 27, 2022


  • महाराष्ट्राचा कृषी दिवस

    शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते.

      July 1, 2021


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक पाच

    पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका - भाग 2

    घरातला तुरडाळ ठेवलेला डबा आठवतोय ? जेव्हा डब्यातील तुरडाळ संपतेय, तेव्हा मार्केट मधून तुरडाळ आणली जाते. तेव्हा डब्यात तळाला थोडी तुरडाळ शिल्लक असते. या शिल्लक असलेल्या तुरडाळीवर नवीन तुरडाळ ओतली जाते. असं जेव्हा वारंवार होईल, तेव्हा काय होतं ? तळातील जुनी तुरडाळ तशीच ठेवून जर त्यावर नवीन तुरडाळ ओतली गेली तर काय होईल ? जुनी तुरडाळ काही दिवसांनी खराब होईल. तिला दुर्गंध येऊ लागेल, अशी दुर्गंध येणारी डाळ डब्यात तशीच राहिली तर वरून पडणारी चांगली तुरडाळदेखील काही दिवसात दुर्गंधित होऊ लागेल आणि काही दिवसांनी डब्यातील सर्व तुरडाळ वास येणारी होईल.

    असं होऊ नये म्हणून काय करावे ?
    जी तुरडाळ तळात राहिलेली असते, तिला आधी एका ताटामधे काढून घ्यावी. नवीन तुरडाळ डब्यात भरावी. आणि डब्यात सर्वात वर जुनी तुरडाळ भरावी. त्यामुळे ती पहिल्यांदा वापरली जाईल. फुकट जाणार नाही.

    बेकरीवाल्याकडची बरणीतील शेव संपत आली की तो बेकरीवाला, ती बरणीतील तळातली शेव आधी वेगळी काढून मगच नवीन शेवेचं पाकीट बरणीत रिकामे करतो. आणि वर जुनी शेव परत भरतो, जेणेकरून पहिली शेव सहज संपून जावी.

    पहिलं संपल्याशिवाय दुसरं भरलं तर पहिलं पण फुकट जाते आणि दुसऱ्या पदार्थाचा आनंदही निघून जातो.

    अगदी तस्संच पोटामधे देखील होत असावं. आधी न पचलेल्या अन्नावर वरून कितीही सात्त्विक अन्न घातले तरी ते सर्व अन्न फुकट जाईल. कारण न पचलेलं अन्न म्हणजे आम. या आमामधे चांगले अन्न एकत्र झालं की, सर्वच अन्न "आममय" होईल.

    त्यामुळे पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न आत टाकलं तर नुकसान ठरलेलंच ! म्हणून पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका.

    नासलेल्या दुधात कितीही चांगले दूध ओतले तरी सर्व दूध नासणारच !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    02.05.2017

      May 3, 2017


  • नाट्य-चित्र कानोसा – आजचा दिवस माझा

    आजचा दिवस माझा – राजकीय “माणूस टिपणारा” चित्रपट. राजकीय पदाच्या अतिउच्च स्थानावर पोहोचण्याआधी व नंतर आपली माणूस म्हणून असलेली छबी कशी जपावी हे “आजचा दिवस माझा” मधून अधोरेखीत करण्याचा प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शकाने केला आहे.

      April 5, 2013


  • हयग्रीवोत्पत्ति

    श्रावण पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची उत्पत्ति झाली. हयग्रीवाच्या उत्पत्तिबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. याची मूर्ती कशी असावी याबद्दल पांचरात्रात सांगितले आहे. चार हातांचा, तीन हातात शंख, अक्षमाला, व चौथा हात व्याख्यान मध्ये. याच्या मूर्ती कर्नाटकांत नुग्गेहळ्ळी येथे आहेत. मूर्ती उभी, अष्टभुजा, पायाखाली राक्षसाला तुडवणारी आहे तर दुसरी चतुर्भुज, विश्वपद्मावर बसलेली आहे.

    -श्री करंदीकर गुरुजी

      August 30, 2023


  • श्रीहरि स्तुति – १७

    परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत.

      November 5, 2020


  • कॅल्शियमची कमतरता ह्या पदार्थांनी भरून काढा

    आपल्या शरीराची आणि मनाची जर आपल्याला योग्य तशी काळजी घ्यायची असेल तर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज विविध पोषकतत्त्वांची गरज भासते.ह्यामध्ये सर्वात महत्वाचा  कुठला घटक असेल तर तो आहे कॅल्शियम,  कारण हाडे व दात यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज कायमच लागते.

      April 30, 2019


  • परिक्रमा श्री अष्टविनायकांची

    भारताची भूमी आध्यात्मप्रवण आहे. भारतीय लोक स्वभावतःच धर्मनिष्ठ आणि पापभीरू आहेत. देवावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. इथे अनेक देवदेवता आणि त्यांची देवळे आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश-श्रीकृष्णा… प्रमाणेच इथे ‘श्रीगणपती’ या देवालाही लोकमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. गणांचा अधिपती म्हणून याला गणपती म्हणतात. कुणी सुखकर्ता तर आणखी कुणी विघ्नहर्ता असेही म्हणतात.

      April 29, 2024


  • डॉ विकास आबनावें – चार भेटींची कहाणी!

    मिरजेला रोटरॅक्ट क्लबने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी आणि सुधीर नेरुरकर वालचंद तर्फे तर तो आणि अविनाश भोंडवे बी. जे. मेडिकल तर्फे प्रतिस्पर्धी होतो. दोन दिवस स्पर्धा चालली. (होय त्याकाळी वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धा खरंच दोन दिवस चालत. ५० च्या वर स्पर्धक हिरीरीने आणि चुरशीने भाग घेत असत.) ती आमची पहिली भेट आणि मैत्रीची सुरुवात ! साल होतं -१९८०.

      July 21, 2021


  • मंदिरप्रवेश-लढा आणि स्त्री-पुरुष-समानता

    एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें.

    आठलेकरांच्या कांहीं वाक्यांना (statements) दुजोरा द्यायलाच हवा. उदा. ‘स्त्रीची दुय्यमता या धर्मशास्त्रांनी वारंवार अधोरेखित केली’ ; ‘लिंगभेदावर आधारित असलेल्या व्यवस्थेला निग्रहानें नकार दिलाच पाहिजे’. अशा स्टेटमेंट्स बद्दल त्यांच्याशी मतभेद असण्याचें कारणच नाहीं. प्रश्न आहे तो, त्यांनी मंदिरप्रवेशाच्या बाबीचा जो अर्थ लावला आहे, त्याबद्दल. मात्र, कांहीं मतभेद असले तरी, मी त्यांना ‘पुरुषधार्जिणी’ असें अभिधान देणार नाहीं.

    पुढे जाण्यापूर्वी मी हें स्पष्ट करूं इच्छितो की, मी कर्मकांड मानीत नाहीं, तसेच मी निधर्मी व बेसिकली निरीश्वरवादी आहे, आणि मी स्त्री-पुरुष समानता मानतो. हें स्पष्ट करायचें कारण म्हणजे, मला देव-धर्म-पुजारी वगैरेंची बाजू मांडायची नाहीं , किंवा पुरोगामी-प्रतिगामी या वादातही शिरायचें नाहीं. थोडक्यात म्हणजे, ‘आय् हॅव नो पर्सनल ऍक्स टु ग्राइंड’ . तसेच, हेंही स्पष्ट करायला हवें की, आठलेकर यांनी उल्लेखलेल्या तृप्ती देसाई व केवडकर यांच्याविषयी, त्यांच्या विविध विषयांवरील मतांविषयी, आणि त्यांच्या आपसातील-संबंधांविषयी मला कांहींही माहिती नाहीं. त्याचप्रमाणें, इलेक्ट्रॉनिक मीडियांसंबंधी कांहींही मतप्रदर्शन मला करायचें नाहीं. अशा गोष्टींमध्ये शिरल्यास, मूळ मुद्दा बाजूलाच पडेल. त्यामुळे त्या सगळ्यात न शिरतां, मी सरळ, आणि केवळ, मूलभूत मुद्यालाच स्पर्श करत आहे.

    आपण हें ध्यानात ठेवायला हवें की, शनि-शिंगणायुर हें फक्त, एक ‘पूजास्थळ’ आहे ; पण तिथें आहे तशीच स्थिती त्र्यंबकेश्वर, साबरीमाला , हाजी अली वगैरे अनेक ठिकाणीही होती व आहे. अहो, हिंदूधर्मात, एखादी पूजा जर जोडप्यानें करायची असेल, व पत्नी तिथें नसेल, तर पती तिच्या स्थानीं ‘सुपारी’ किंवा अन्य कांहींतरी ठेवून पूजा करूं शकतो (जसें, उत्तररामचरित्रात, रामानें , सीतेची मूर्ती ठेवून केलेलें आहे) . पण हा,अधिकार स्त्रीला नाहीं. मुस्लिमांमध्ये, पुरुष तीनदा ‘तलाक’ असें म्हणून ( हल्ली तर ई-मेल पाठवूनही) पत्नीला डायव्होर्स देऊं शकतो, पण अर्थातच, हा हक्क पत्नीला उपलब्ध नाहीं. खरें तर, स्त्रियांना मंदिर-प्रवेशाचा अधिकार मिळण्याचा मूळ प्रश्न, धर्माशी संबंधित नसून स्री-पुरुष-समानतेशी निगडित आहे. मंदिरात किंवा त्याच्या गर्भागारात प्रवेश मिळण्यासाठी लढणें, किंवा हाजी-अली दर्ग्यात प्रवेशासाठी झगडणें, म्हणजे स्त्री-पुरुष-समानतेसाठी झगडणें . मान्य आहे, अशा अनेक बाबी आहेत, जिथें समानतेसाठी लढा द्यायला हवा . तसा, अनेक-अंगीं, अनेक-पदरी लढा चालूच आहे, असें मला वाटतें. एके काळी, ‘तथाकथित- प्रगत’, अशा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्येसुद्धां महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी महिलांना लढा द्यावाच लागला. १९३० च्या सुमारास त्यांना तो हक्क प्राप्त झाला. महाराष्ट्रात, स्त्री-शिक्षणासाठी महात्मा फुले, महर्षि कर्वे यांना लढा द्यावा लागला. हल्लीहल्लीच, टेनिसच्या क्षेत्रात, ग्रँड-स्लॅम स्पर्धांमध्ये स्त्रियांना मिळणारी बक्षिसाची रक्कन ही पुरुषांएवढी असायला हवी, या समानतेसाठी, मार्टिना नव्हरातिलोव्हानें लावून धरलें. हाही स्त्री-पुरुष-समानतेच्या लढ्याचाच एक भाग आहे. तसेंच, मंदिरप्रवेश हाही या समानतेच्या लढ्याचा एक भागच आहे. आणि, आपण तसेंच त्याच्याकडे पहायला हवें.

    मंदिरप्रवेशासाठी लढणें या गोष्टीचा, ‘देव मानणें’ किंवा ‘धर्म मानणे’ आवश्यक आहे , असें नाहीं. साने गुरुजी हे समाजवादी होते. ही सर्व मंडळी निरीश्वरवादी, निधर्मी असतात. तरीही, साने गुरुजींनी १९४८-१९४९ च्या सुमारास, पंढरपुरच्या विठ्ठल-मंदिरात हरिजनांना (दलितांना) प्रवेश मिळावा म्हणुन लडा दिला, प्राणांतिक उपोषणही केलें. स्पष्ट आहे की, त्यांचा हा लढा सामाजिक-असमानतेशी निगडित होता. आठलेकर यांच्या, ‘हा हक्क नव्हता म्हणून स्त्रिया आयुष्यातल्या कोणत्या मोठ्या संधीपासून वंचित राहिल्या आहेत?’ ; ‘गाभार्‍यात प्रवेश हवा या मागणीत कोणती धर्मसुधारणा आहे?’ , या स्टेटमेंटस् ‘मिसप्लेस्ड’ आहेत, हें साने गुरुजींच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे. त्यावर अधिक टिप्पणी करायची आवश्यकता नाहीं.

    वैदिक काळात स्त्रियांना यज्ञ करण्याचाही अधिकार होता. त्या काळानंतर, शतकानुशतकें स्त्री पुरुषांमध्ये असमानताच होती, व तें अयोग्यच आहे. मध्य-युगात तर ती दरी भयानकच होती. पण १९ व्या – २०व्या शतकात स्त्री-पुरुष-समानतेच्या हक्कासाठी लढाईची ठिणगी पडली, आणि ती आतां, भिन्नभिन्न ठिकाणीं, विविध प्रश्नांच्या माध्यमांमधून, अनेक अंगांनी, प्रस्फुटित होत आहे ; मग तो लढा मंदिरप्रवेशाचा असो, लोकसभेत किती टक्के जागा स्त्रियांसाठी रिझर्व असाव्यात हा असो, मुलींच्या शिक्षणाचा असो, स्त्री-भ्रूणहत्येचा असो, सुनांवर अत्याचाराचा व सुनांना जाळण्याचा असो, ‘खटना’ ( female circumcision) चा असो, ‘Right to Pee’ चा असो, विनयभंगाचा असो, ‘मॅरिटल रेऽप’ चा असो, तलाकचा असो, पोटगीचा असो, हँडिकॅप्ड व चॅलेंज्ड स्त्रियांच्या संरक्षणाचा असो, किंवा अन्य कांहीं असो. प्रत्येक मुद्दयावर लढा हा व्हायलाच हवा, आणि सुजाण नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यायलाच हवा. समाजात दुसरे अनेक प्रॉबलेम्स आहेत, म्हणून एखाद्या मुद्दयवर लढा द्यायचा नाहीं, असें शक्य आहे काय ? साने गुरूजींना नक्कीच माहीत होते की विठ्ठल-मंदिरात प्रवेशासाठी लढा देऊन दलितांचे आर्थिक प्रश्न कांहीं संपणार नव्हते. पण, जिथे-जिथें असमानता आहे, तिथें-तिथें लढा द्यायला हवा, या भावनेनेंच त्यांनी विठ्ठलमंदिराचा लढा दिला. ते तो लढा जिंकले ; स्त्रियाही पूजास्थळांचे कांहीं लढे जिंकत आहेत, कांहीं नाही. पण, असेंच असतें. कांहीं कांहीं लढे जिंकले जातात, कांहीं हरले जातात ( उदा. १८५७ चें स्वतंत्र्ययुद्ध). पण ठिणगी पडली की, तिच्या शॉर्ट-टर्म परिणामांबरोबरच, दूरगामी परिणामही असतात, आणि त्यांचाही विचार व्हायला हवा. तरच अशा लढ्यांचें महत्व अधोरेखित होईल. साथ देतां आली तर उत्तमच ; पण तें जमत नसल्यास, किमान, ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ इतपत तरी सपोर्ट करायला हरकत नसावी.

    - सुभाष स. नाईक
    सांताक्रूझ, मुंबई
    M- 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in

      May 8, 2016