(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जंतासाठी घरगुती उपचार

    मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांमध्येही जंत होऊ शकतात. त्यांच्यावर वेळीच इलाज केला पाहिजे. मुळात अस्वच्छता व अशुद्धी यापासून दूर राहायला हवे. जंत झाल्यानंतर त्यांचा नाश करण्यावरच थांबता नये, तर त्यानंतर जंतनाशक औषधे घेऊन त्याचे मुळापासून निर्दालन करायला हवे. तसेच जंत का होतात याच्या कारणांचा शोध घेऊन तीही दूर केली पाहिजेत.

    घरच्या घरी करता येण्याजोगे साधे उपचार

    रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंतांचे त्रास कमी होतात.

    जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.

    कारल्याच्या पानांचा रस पिणे, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेणे, यामुळे जंत पडण्यास मदत मिळते.

    टाकळ्याचे बी चावून खाऊन वरून एरंडेल घेतल्यास जंत पडतात.

    ताकामध्ये पळसपापडीचे पाव ते अर्धा चमचा चूर्ण घेतल्यासही जंत कमी होतात.

    कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.

    डाळिंबाचे साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्या् प्रमाणात घेतले तर जंतांची प्रवृत्ती कमी होते.

    शेवग्याच्या शेंगा उत्तम कृमिनाशक असतात. शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरेपूड टाकून घेण्याने जंत कमी होतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ.मधुरा भिडे

      January 8, 2017


  • रिमोट कंट्रोल

    ज्या एका हातात मावण्यासारख्या यंत्राच्या मदतीने आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण लांबूनच नियंत्रित करू शकतो, त्याला रिमोट कंट्रोल म्हणतात. टी.व्ही., मोबाईल फोन, मोटार, व्हिडिओ कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा असंख्य साधनांचे नियंत्रण या पद्धतीने करता येते. टीव्हीचा रिमोट कुणाच्या हातात असावा यावरून तर भांडणेही होतात. थोडक्यात, हे साधन छोटे असले तरी त्याच्या अंगी नाना कळा आहेत.

      August 17, 2023


  • श्रीमुद्गलपुराण – ५

    श्रीमुद्गल पुराणातील आठ खंडातील या आठ कथा आपण जर वरपांगी केवळ वाचत गेलो तर आपल्याला एक गोष्ट विचित्र वाटू शकते ती अशी की वर वर पाहता या आठही कथा सारख्याच आहेत.

      September 6, 2019


  • लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

    बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा – दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले.

      June 16, 2022


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – अळू

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – अळू

    साधारणपणे पावसाळयात अगदी भरपूर उगवणारी हि पालेभाजी तशी सगळ्यांच्याच पुष्कळ आवडीची.अगदी खमंग चुरचुरीत अळुवड्या म्हणा,अळुचे फतफते म्हणा किंवा हरतालिकेला केली जाणारी ऋषिची भाजी ह्या सगळ्याच पदार्थांची चव अगदी लाजवाब लागते त्यामुळेच आपले सर्वांचेच विशेष प्रेम ह्या भाजीवर आहे(तसे काही महाभाग असतील ज्यांना हि भाजी आवडत हि नसेल पण ती संख्या तशी नगण्यच समझावी).

    अळुचे रोप हे ११/२ -२ फुट लांब उगवते,ह्याची पाने मोठी व पसरट असतात.आणि ह्यावर पावसाचे पाणी चिकटून रहात नाही त्यामुळेच काही क्षणभंगुर गोष्टींना अळवावरचे पाणी ह्या म्हणीने संबोधले जाते.

    ह्याचे काळा,पांढरा,हिरवा,गर्द हिरवा असे अनेक प्रकार असतात.त्यातील फिकट हिरवा पातळ पानांचा प्रकारास तेर असं म्हणतात आणी ह्याच्या पानांची भाजी आंबट चिंचेचा वापर न करता केल्यास भरपूर खाजते.

    खायला काळा व गर्द हिरवा अळु उत्तम.अळुची चव हि तुरट गोड असते आणी हा थंड असतो त्यामुळे हा शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.

    ह्या अळुचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत बरंका ते आता थोडक्यात पाहूयात:

    १)गळु फुटण्यास अळुची पाने व देठ वाटून त्याचा पोटीस गळूवर बांधावा.

    २)बाळंतीणीस दुध वाढायला जेवणामध्ये नियमीत थोडी अळुची भाजी खायला द्यावी.

    ३)जखमेवर अळुच्या पाल्याचा रस वाटून लावल्यास त्यातील रक्त स्त्राव बंद होतो व जखम लवकर भरते.

    ४)अळुच्या पानांचे देठ मीठासोबत वाटावेत व बंद व सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करावा.

    ५)सर्वांगाची आग होत असल्यास अळुची भाजी,फुल्के व तुप ह्यासोबत खावी.

    अळुची भाजी जास्त खाल्ल्यास पोटात वात धरतो व बद्धकोष्ठाचा त्रास होतो.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 21, 2016


  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली विद्यार्थी संघटना आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली होती. देशातील विविध विद्यापीठांमधील डाव्या विचारांचा पगडा कमी करणं हा अभाविपच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता.

      July 9, 2021


  • तंत्रविश्व – भाग ७ : ऑनलाइन कोर्सेसच्या विश्वात

    कोरोनामुळे बदलत असलेल्या  परिस्थितिमुळे  विविध साधक बाधक बदल आपल्या जीवनशैलीवर झाले व होत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ऑनलाईन शिक्षण हे केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहीले नसून स्वतः चा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिणारे व्यावसाईक, स्वतःचे कौशल्य व ज्ञान वाढवून  वरीष्ठ पद मिळवू इच्छिणारे नोकरदार,स्पर्धात्मक युगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहणारे महत्वाकांक्षी विदयार्थी अशा समाजातील बहुतांश गटाला सध्या ऑनलाईन शिक्षण आणि त्या बाबतीतील कोर्सेसची आवश्यकता भासतेय.

      December 20, 2020


  • भव्य देवालय आणि भक्त (रूपक कथा)

    भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा.

      April 8, 2019


  • मूळव्याध

    गुदद्वाराच्या आतील भागास असलेल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे तेथील आंतरवर्णासह सैल सुटते त्या वेळी हाताला कसला तरी कोंब किंवा मोड लागतो. ब-याचदा यामध्ये वेदना व रक्तस्राव प्रकट होतो. या स्थितीलाच मूळव्याध असे म्हणतात. मूळव्याधीचे दोन प्रकार करण्यात आलेले आहेत. 1. आंतर मूळव्याध व 2. बाह्य मूळव्याध. मोड किंवा अंकु र किंवा व्रण गुदद्वाराच्या आतील भागात निर्माण झाले असतील तर त्याला आंतर मूळव्याध असे म्हणतात. हेच अंकुर जेव्हा आणखी खाली सरकून गुदद्वाराच्या बाहेर येतात तेव्हा त्याला बाह्य मूळव्याध, असे म्हणतात. एकाच व्यक्तीला वरील दोन्ही प्रकारचा त्रास असू शकतो.

    मूळव्याधीची लक्षणे : मलत्यागाच्या वेळी जळजळणे, वेदना होणे आणि रक्तस्राव होणे हे या आजाराचे प्रारंभिक लक्षण होय. याशिवाय मलाच्या वरील भागावर लालसर रेषा प्रकट होणे, थेंब थेंब रक्त पडणे, मलाशयातून रक्तस्राव होऊन अॅ निमिया निर्माण होणे इत्यादी लक्षणे प्रकट होतात.

    योगासने व व्यायाम : योगासने ही मूळव्याधीवर अतिशय उपायकारी व्यायाम पद्धती आहे.

    रोज सकाळी २-३ किलोमीटर चालणे. सकाळ-संध्याकाळ सर्वांगासनाच्या स्थितीमध्ये राहून सायकल चालवण्यासारखा व्यायाम करावा. या उपचाराने पूर्णपणे मूळव्याधी बरी झाली असता नैसर्गिक जीवन पद्धतीची कास सोडू नये.

    ऑपरेशनच्या नावाखाली मूळव्याधीला जाळण्याचे व कापण्याचे प्रयोग चालतात. यामुळे वरवर फायदा निश्चितच दिसून येतो, परंतु चुकीच्या आहाराविहारात सुधारणा न केल्याने मोठ्या आतड्याचे इतर विकार उद्भवतात. दुसरे विकार होऊ नयेत म्हणून ऑपरेशननंतरही नैसर्गिक उपचार पद्धती अमलात आणली पाहिजे.

    आहार चिकित्सा व उपचार रोज १०-१२ ग्लास पाणी प्यावे. हिरव्या पालेभाज्या जास्त आहारात असाव्यात. चिकन, मटन, मसाल्याचे पदार्थ, तेलकट, बाजरीची भाकर, जास्त गरम पदार्थ टाळावेत. ओवा, जंगली ओवा, खुरासणी ओवा यांचे बारीक चूर्ण करून थोड्याशा लोण्यात कालवून सकाळ-संध्याकाळ मूळव्याधीच्या फोडांवर लावावे. वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.
    होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथिक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. यापासून कोणतेही दूष्परिणाम होत नाही. रुग्णाचा सर्वांगीण अर्थात शारीरिक आजाराचा व मानसिकतेचा अभ्यास करून रुग्णाला औषध दिले जाते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 21, 2016


  • काश्मीर एक जाणीव – भाग दोन

    काश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती .

      April 30, 2023