(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सौंदर्यवर्धक संत्री साल

    हल्ली स्त्री असो व पुरुष दोघांनाही शारीरिक सौंदर्य हवे असते.यासाठी स्पा, युनीसेक्स सलोन, ब्युटी पार्लर अशा ठिकाणी हजारो रुपये उधळताना आजची तरुण पिढी दिसते.बाजारातबरेच फेसवॉश मिळतात त्याऐवजी दोन चमचे संत्री साल + एक चमचा दुध एकत्र करून चेहऱ्याला चोळले असता बाजारातल्या कोणत्याही फेस वॉश पेक्षा जास्त चांगला गुण येतो .

      February 8, 2019


  • महालयारंभ

    भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे.

      September 29, 2023


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकतीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेसदतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? -भाग एकतीस

    बाबा सांगतात...

    देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये आणि कठोर शब्दांनी बोलू नये.

    गाय या शब्दाने सर्व गोवंश घ्यावा. पूजा म्हणजे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा नाही. तर त्यांना योग्य तो मान द्यावा. गोवंश हा मानवाच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत असतो. केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य देखील सांभाळत असतो. म्हणून गोवंश संवर्धन झाले पाहिजे. पूर्वीच्या काळी जो गोवंश राखला जात होता, तो हळूहळू कमी होत जातोय. ही धोक्याची घंटा आहे. म्हणून गोवंश संवर्धनाबरोबरच गोवंश रक्षणदेखील करायला हवे. अस्सल भारतीय गो वंश आज भारतातच उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त भारतीय गोवंश हा औषधीगुणांनी युक्त आहे. अन्य हायब्रीड पशू हे फक्त गायींसारखे दिसतात, पण औषधी गुणांनी शून्य. उलट अपाय करणारे अनेक रोग वाढवणारे एक विषारी प्रथिन त्यांच्या दुधामधे दिसते. म्हणून हायब्रीड दूध जसे, जर्सी, हाॅस्टन, एच एफ इ. अजिबात वापरू नये.

    आयुर्वेदात गाईचे दूध आणि दही औषधी म्हणून सांगितले आहे. ते औषध म्हणूनच वापरावे. पण दह्या दुधाचा आहारात समावेश झाला की ते मधुमेहासारख्या आजारांना वाढवते, हे पण लक्षात ठेवावे. अगदी देशी गाईंचे दूध आवर्जुन पिणाऱ्या आणि पोरांना बळेबळे पाजवणाऱ्या माता पिता पालकांनी हे लक्षात घ्यावे, की दूध हे कष्टाचे काम करणाऱ्या श्रमजीवी वर्गासाठी आहे. खुर्चीत बसून, मान खाली घालून, केवळ बटनांशी चाळा करीत, काम करणाऱ्या काटकोनी बुद्धीजीवींना नाही. आहारात जे अत्यंत आवश्यक आहे,असे ताक, लोणी आणि तूप मात्र आम्ही कटाक्षाने टाळू लागलो आहोत. हा बुद्धीभेद कोण करतंय, या विषयी सविस्तरपणे मागे लिहिले होतेच.

    वृद्धांना योग्य तो सन्मान द्यावा. इथेदेखील सर्व जाती धर्माचे वृद्ध असेच अपेक्षित आहे आणि योग्य तो सन्मान करावा हे अनादि कालापासून सांगितले जात आहे, याचे स्मरण करून देतो. पाश्चात्य संस्काराचा परिणाम म्हणून जी मानसिकता बदलत गेली, त्याचा परिणाम म्हणून, वृद्धांचा समावेश असलेली एकत्र कुटुंब व्यवस्था लयाला गेली आणि प्रत्येकाचे छोटेखानी कुटुंब जन्माला आले. ते सुद्धा हम दो हमारा एक. आता तेही नाही. आणि जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आश्रम ! भारतीय संस्कृतीला अत्यंत लाजीरवाणे असलेले हे वृद्धाश्रम भारतात झपाट्याने वाढताहेत हे चांगले लक्षण नाही. आता दत्तक वृद्ध घ्यायची नवीन परंपरा सुरू झाली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

    कृपया या वाक्यातून यातून सोयीस्कर अर्थ काढू नये. जेव्हा हे वृद्धाश्रम बंद होतील आणि पुनः एकत्र कुटुंब व्यवस्था सुरू करण्याची भारतीय मानसिकता निर्माण होईल तो सुदिन !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

      August 27, 2017


  • बिहार दिन

    स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा २५ टक्के वाटा, तांदूळ, गव्हाचे २९ टक्के उत्पादन होते. फळ-फळावळांचा ५० टक्के उत्पादनाचा वाटा बिहारचा ! ताग, कापड, तंबाखू उत्पादन करणारा गंगेच्या खोऱ्यातील प्रांत होता.

      March 22, 2022


  • एका बेटावरचा हवेत उडणारा कोल्हा

    1982 सालची गोष्ट.  रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही.

      January 7, 2025


  • फिल्मी कानोसा – टाइमपास

    या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषकांच्या पुरेपूर टाइमपास होईल (म्हणजे उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून मनोरंजन होत राहील) याची काळजी घेतली आहे. टाइमपास या चित्रपटाची कथा आहे दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर)ची ; तारुण्यात नुकतच पदार्पण केलेल्या दोन मुलांच्या भावविश्वाभोवती फिरणारी ही कथा;

      January 9, 2014


  • मालदीवमधे चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्याची गरज

    भारताने तूर्त मालदीववर कठोर निर्बंध घालून तेथे लवकरात लवकर निवडणुका होतील याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून तेथील लोकशाही जिवंत राहू शकेल. चीन व पाकिस्तान यासारख्या शत्रूंची तेथील उपस्थिती आपल्याला घातक ठरेल. त्यामुळे परराष्ट्र नीती हे आव्हान ठरते आहे. मालदीवमधील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवत भारत सावधगिरीने पावले टाकील यात शंका नाही.

      March 10, 2018


  • कल्याणवृष्टिस्तव – ११

    ह्रीं ह्रीमिति प्रतिदिनं जपतां तवाख्यां
    किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासॆ ।
    मालाकिरीटमदवारणमाननीया
    तान् सॆवतॆ वसुमती स्वयमॆव लक्ष्मीः ॥ ११ ॥

    आई जगदंबेच्या कृपा प्रसादाचे वैभव सांगतांना आचार्य श्री पुढे म्हणतात,

    ह्रीं ह्रीमिति - ह्रीं, ह्रीं अशा स्वरूपात,

    प्रतिदिनं - नित्यनियमाने, अनवरत.

    जपतां तवाख्यां- तुझे नाव जपले असताना.
    अर्थात ही आई जगदंबे जो रोज तुझ्या नावाचा असा जप करतो त्याला. यातील प्रतिदिन हा शब्द फार महत्त्वाचा आहे.
    सामान्यतः लोक भगवंताचे नाव त्याच वेळी घेतात ज्या वेळी त्यांच्यावर काहीतरी संकट येते. अशा तात्कालिक भक्तांना भगवान पावत नाही असे नाही. पण त्याचे आवडते भक्त तेच असतात जे प्रतिदिन भजन करतात. संकटाचा मागमूस नसतानादेखील भगवंताचे नामस्मरण करतात.

    अशा भक्तांचे भाग्य सांगताना आचार्य म्हणतात,

    किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासॆ- हे त्रिपुराधिवासिनी ! तुझ्या अशा भक्तांना या जगात दुर्लभ असे काय आहे? अर्थात त्यांना सर्व काही सहजतेने प्राप्त होते.

    काय काय प्राप्त होते? याची एक झलक दाखवताना आचार्य श्री म्हणतात,

    माला- मोत्यांच्या माळा, अर्थात सर्व प्रकारची रत्ने,

    किरीट- मुकुट अर्थात साम्राज्य.

    मदवारण- मदोमत्त हत्ती. संपत्तीचे हे सगळ्यात मोठे प्रतीक वर्णिले आहे. दारात झुलणारा असा हत्ती अफाट श्रीमंतालाच परवडू शकतो.

    माननीया- या सगळ्याने सन्मानित झालेली,

    तान् सॆवतॆ वसुमती स्वयमॆव लक्ष्मीः- अशी देवी लक्ष्मी त्यांना स्वतःहून प्राप्त होते.
    वर वर्णन केलेले सर्व वैभव देवी लक्ष्मीचे असले तरी अशी लक्ष्मी मिळाली की हे सर्व त्याला आपोआपच मिळते.
    दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी देवी लक्ष्मी म्हणजे वैभव त्याला स्वतःहून प्राप्त होते. त्यासाठी तो काहीही प्रयत्न करीत नाही.

    भक्त केवळ आई जगदंबेची उपासना करतो. त्याला या सर्व गोष्टी आई स्वतःहून देते. हे आचार्य कथन मोठे मर्म पूर्ण आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 22, 2020


  • देवपूजेतील साधन – निरांजन

    निर म्हणजे नाही व अंजन म्हणजे मळ किंवा काजळी. निरांजनातील तुपाच्या ज्योतीवर काजळी किंवा धूर दिसत नाही. म्हणूनच त्याला निरंजन म्हणतात.

    निरंजन याचा अर्थ ओवाळणे असाही आहे. देवाच्या पूजेची सांगता आरतीने होते. या आरतीमध्ये प्रज्वलित निरंजनाने देवाला ओवाळणे हा एक प्रमुख उपचार आहे.

    निरंजनाने देवाला ओवाळतात तेव्हा त्यात तुपात भिजवलेली वात असते तर स्त्री पुरुषाला ओवाळताना तेल वात असते तिला कुरवंडी असे म्हणतात. हा प्रकार म्हणजे औक्षण होय. औक्षण म्हणजे उत्तम क्षणांनी आयुष्याची वाढ व्हावी असा आशीर्वाद यात अभिप्रत असतो.

    सर्वसाधारणपणे निरंजनाला पाच पाळी असतात यात प्रामुख्याने कापसाच्या वातीने प्रज्वलित झालेल्या पंचारतीच्या निरंजनातील पाच ज्योती म्हणजे मानवी शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंचप्राणाची प्रतीके आहेत. देवाची आरती म्हणजे गायनातून केलेली देवाची स्तुती असल्यामुळे देवाची आपल्यावर कृपा होते.

      January 30, 2016


  • प्रा. एम. एम. शर्मा

    १९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले.

      October 10, 2023