वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आमच्या देशातून नेलेल्या लुटीवर तुमची श्रीमंती, तुमचा माज पोसला जात आहे आणि तुम्ही आम्हालाच कोहिनूर आमचा आहे, भवानी तलवार आमची आहे, असे सुनावणार आणि आम्ही ते षंढपणे ऐकून घेणार! कुठल्याच नेत्याने, कुठल्याच वर्तमानपत्राने किंवा अन्य मीडियाने कॅमरून यांच्या या मुजोरपणाचा निषेध केलेला नाही. खरे तर जालियनवाला बागप्रकरणी माफी मागण्यास कॅमरून यांनी नकार देताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळायला हवी होती; परंतु आमचे दुर्दैव असे, की कुठे संतापून उठावे आणि कुठे संयम दाखवावा, हेच आम्हाला कळत नाही.
March 2, 2013
महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग म्हणजेच राज्यालाच नव्हे तर देशालाही स्वर्गीय अनुभव देणारा असा हा भाग आहे. या भागास जैव विविधतेसह विशाल सागर लाभलेला आहे. निसर्ग संपन्न असा या भूप्रदेशात कुणालाही वास्तव्य करण्याची व या निसर्गाच्या अलौकिक साक्षात्काराची अनुभूती घेण्याविषयी आकर्षण वाटावे. यादृष्टीने दर्शनिका (गॅझेटिअर) विभागाने या भागातील विविध जिल्ह्यांचे दर्शनिका (गॅझेटिअर) बनविण्याचे काम हाती घेतले आहे.
April 7, 2023
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकरिता सरकारने शेतकर्यांच्या शेतीला सामूहिक कुंपण घालून द्यावे आणि त्याला मध्ये-मध्ये शेतकर्यांच्या सोयीनुसार फाटक लावून द्यावे. प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असेल, तर संभाव्य उत्पन्नाइतकी नुकसान भरपाई तातडीने शेतकर्यांना देण्याची एक सूत्रबद्ध योजना तरी सरकारने राबवावी. हा दुसरा उपाय करणे सरकार आणि नोकरशाहीला पैशा अभावी राबविणे शक्य नाही, याची मला खात्री आहे. त्यामुळे शेतकर्यांनाच या प्राण्यांना पाळण्याची परवानगी देणे आणि त्यातून सरकारने महसूल मिळविणे हा पहिला उपाय स्वीकारल्याशिवाय सरकार समोर पर्याय नाही याची मला खात्री आहे.
August 21, 2012

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
(सुरेश भट)
मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
(सुरेश भट)
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
(सुरेश भट)
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
(सुरेश भट)
केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा ,
स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
(सुरेश भट)
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
(सुरेश भट)
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
(सुरेश भट)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
July 8, 2024
गणपतीच्या चार हातात कुऱ्हाड, दोरी, मोदक आणि कमळ आहे. कुऱ्हाड, आध्यात्माच्या कुर्हाडीने इच्छेचा नायनाट करता येतो. दोरी हे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आपल्याला संसारापासून, भौतिक जगापासून दूर करण्यास मदत करते, ज्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. मोदक हे साधकाला आध्यात्मिक साधनेतून मिळणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे. आणि कमळ म्हणजे आत्म-साक्षात्काराच्या त्या दैवी अवस्थेसाठी ज्याची प्रत्येक मनुष्य जाणीवपूर्वक किंवा नकळत इच्छा करतो.
February 4, 2022

जीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले.
अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तणाव हा मनाच्या स्तरावर आहे आणि आपण मात्र शरीराला शिक्षा देतोय. देह संपतो पण मन आणि चेतना मात्र मुक्ती साठी तडफडत राहते. मरण्यासारख्या इतक्या मोठ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो तर बाकीच्या घटना किती छोट्याशा आहेत. प्रत्येकाच्या जीवनात समस्या तर आहेतच आणि प्रत्येक समस्या वेळेनुसार निघूनही जातात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. सोबत एक चिट्ठी ठेवा, “आजपर्यंत अनेक समस्या आल्या आणि गेल्या, हीपण निघून जाईल. मी एकटा नाही, माझ्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत.” भगवान श्रीकृष्णाचे जीवन ही पूर्ण संघर्षामध्येच गेले, पण त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येचे रुपांतर संधी आणि शेवटी उत्सवामध्ये केले. कदाचित संघर्षामध्येच ते अधिक शांत, प्रसन्न आणि दूरदृष्टीने जगले. म्हणूनच त्यांना पूर्णपुरूष म्हटले जाते. ज्या लोकांनी यशाचे शिखर गाठले त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येमध्ये संधीच पाहिली. एक वडील आपल्या मुलाला लहानपणापासून सांभाळतात आणि त्या मुलाने अचानक जर त्याच्या जीवनाचा शेवट अश्या पद्धतीने केला तर त्या वडिलांना कसे वाटेल ? त्यांना आवडेल का? मग त्या परमेश्वराला पण कसे आवडेल कि त्याची ही मुल आपले जीवन आत्महत्या करून संपवतात…!
सर्वांनी एकत्र येऊन समस्यांवर उपाय ही शोधता येतील, असे आवाहन वैभवीश्रीजी यांनी केले.
Read Online on Deshonnati: http://deshonnati.digitaledition.in/c/4074440
April 25, 2016
संत, महात्मे, सद्गुरु हे पृथ्वीतलावर जन्म घेऊनी प्रचार-प्रसार करीत आहे. त्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक जीव हा शीव व्हावा म्हणजे आनंदी व्हावा त्यासाठी त्याने साधना करावी यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक संत मार्गदर्शन करीत असतो. असेच मार्गदर्शन करुन परमपूज्य आईंनी भक्तांना “भक्ती करीत भगवंत” होण्यासाठी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे साधना करून घेतली.
July 28, 2022
प्रकाशन दिनांक :- 28/03/2004
नित्य नवीन बदलांना स्वीकारीत काळ झपाट्याने पुढे सरकत आहे. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य कोणता तरी नवा बदल घेऊन येत आहे. काही बदल अगदी सहज जाणवण्याइतपत ठळक आहे तर काही बदलांची प्रक्रिया अतिशय सुक्ष्म आहे.
March 28, 2004
बौद्धिक क्षमता ज्या भगवान गणेशांच्या कृपेने प्राप्त होते त्यांना याच कारणाने सुमेधानाथ असे म्हणतात.
February 2, 2022
स्वातंत्र्यपूर्व काळात दिल्ली-लाहोर एक्सप्रेस एक अतिशय लोकप्रिय गाडी होती. खचाखच प्रवाशांनी भरलेली ही गाडी हिंदू मुस्लिम समाजाच्या एकोप्याचे प्रतीक होते. ६० वर्षांनंतर दिल्ली-लाहोर समझोता एक्सप्रेस सुरू झाली आहे तिचे भवितव्य काळच ठरविणार आहे.
February 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti