(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गुजरातच्या सक्षम सागरी सुरक्षेकरता

    नऊ सप्टेंबरला समुद्राकडून गुजरातच्या कच्छच्या रणात दहशतवादी हल्ला करण्याकरता ५० दहशतवादी तयार आहेत असा इशारा बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सने दिला. भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्य जनरल सैनी यांनी पण कच्छच्या रणात मध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला आहे.आठवत असेल की दोन आठवड्या पूर्वी नौदल प्रमुख यांनी समुद्रातून पाण्याखालून दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला होता.

      September 13, 2019


  • नवग्रह स्तोत्राचा मराठी अर्थ

    १) जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.

    २) दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणार्या, क्षिरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणार्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.

    ३) धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.

    ४) अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.

    ५) देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.

    ६) हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.

    ७) निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.

    ८) अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.

    ९) पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.

    १०) याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.

    ११) नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.

    १२) ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.

    अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.

    -- मराठीसृष्टी टिम

      July 6, 2016


  • वेगवान युगाचा प्रारंभ

    इ.स. १८०० ते १८२० यादरम्यान इंग्लंड या देशात रेल्वेमार्ग बांधण्याचे आराखडे आखले जात होते. प्रयत्नांना आकार येत गेले आणि १८२५ साली ३८ डब्यांची जगातली पहिली वाफेच्या इंजिनाची प्रवासी रेलगाडी इंग्लंडमध्ये स्टॉकटोन ते डार्लिंग्टन मार्गावर धावली. वाफेच्या इंजिनाचे जनक जॉर्ज स्टीफन्सन यांनी या गाडीचं उद्घाटन केलं. एका नव्या वेगवान युगाचा तो प्रारंभ होता, पण प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये मात्र रेल्वेच्या विरोधात मोठा गहजब माजला.

      March 15, 2019


  • माका अर्थात भृंगराज

    ।।गणधिपाय नम: भृंगराजपत्रं समर्पयामि।।

    भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते.

    औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.

    आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :

    जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो.

    केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.

    केस व हाडांचा आयुर्वेदा मध्ये जवळचा संबंध आहे. केस हा अस्थिधातूचा मल मानला जातो. त्यामुळे जर माका केस बळकट करतो तर त्याचे कार्य हे आपल्या हाडांची बळकटी करायला देखील होणारच ना!

    माका हा यकृत, प्लिहा ह्या अवयवांचे कार्य सुधारतो त्यामुळे रक्ताची कमतरता, भुक न लागणे, अजीर्ण, ह्यात ह्याचा चांगला उपयोग होतो.

    त्वचा रोगात ज्या मध्ये स्त्राव येतो जसे गजकर्ण, इसब, ह्यात देखील ह्याच्या सेवनाने लाभ होतो.

    ज्यांची दृष्टी क्षीण आहे त्यांनी ह्याचे नियमीत सेवन केल्यास दृष्टी सुधारते. त्यामुळेच ह्याला नेत्र्य असे म्हटले आहे.

    माक्याचे बीज हे वाजीकर आहे अर्थात कामशक्ती वाढविते.

    असा हा माका आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९६०६९९७०४

      August 4, 2017


  • कल्याणवृष्टिस्तव – १२

    संपत्कराणि सकलॆन्द्रियनन्दनानि
    साम्राज्यदाननिरतानि सरॊरुहाक्षि ।
    त्वद्वन्दनानि दुरिताहरणॊद्यतानि
    मामॆव मातरनिशं कलयन्तु नान्यम् ॥ १२ ॥

    मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी.

    सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी.

    येथे केवळ आकाराच नव्हे तर गुणांचाही विचार आहे. ते कमळ जसे भुंग्यांना आकर्षित करते तशी जिची कृपादृष्टी साधकांना आकर्षित करते, अशी.

    त्वद्वंदनानि- तुला केलेली वंदने अर्थात नमस्कार, प्रार्थना.
    कशासाठी करायची ही प्रार्थना? तरीही प्रार्थना अलौकिक फलदायी आहे.
    ही प्रार्थना काय काय देते? याचे वर्णन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,

    सम्पत्कराणि- सकल संपत्तीला उपलब्ध करून देणारी. जिच्या कृपेने बाह्य जगतातील धनसंपत्ती आणि अंतर्मनातील शम,दम इत्यादी षट् संपत्ती, साधकांना प्राप्त होते अशी.

    सकलेन्द्रिय नन्दनानि- सकल इंद्रियांना आनंद देणारी. बाह्य जगतातील पंचकर्मेद्रिये, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतर्गत इंद्रिय मन अशा अकराही इंद्रियांना आनंद देणारी.

    शब्द, स्पर्श इ. पाचही पद्धतीने प्राप्त होणारे सर्व आनंद प्रदान करणारी. त्या आनंदाला साधनीभूत होणारी साधने प्रदान करणारी.

    साम्राज्यदान विभवानि- आपल्या भक्तांना साम्राज्य दान देण्याचे वैभव असणारी.

    दुरिताहरणोद्यतानि- दुरित अर्थात पाप, वाईट ,अमंगल. त्याचे हरण करण्यास म्हणजे नष्ट करण्यास उद्यत म्हणजे कायम सिद्ध असणारी.

    अशी ही आईची वंदना,

    मामेव- माझ्यावरच, मलाच.

    मातरनिशं - हे माते अनिश अर्थात सतत.

    कलयन्तु- प्राप्त होत राहो.

    अर्थात अशा सर्व अद्वितीय गुणांनी युक्त असणारी ही वंदना सतत करण्याची शक्ती मला प्राप्त होवो.

    नान्यम् - मला अन्य काहीही नको.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 23, 2020


  • अश्रुधूर (टीअर गॅस)

    दिल्लीच्या रामलीला मैदानावर योगगुरू रामदेवबाबा यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, त्याला टीअर गॅस असेही म्हणतात. दंगल नियंत्रणाच्या वेळी जमावाला पांगवण्यासाठीही अश्रुधुराचा वापर केला जातो.अश्रुधुराला लॅक्रिमेटर असेही म्हणतात.

      October 15, 2023


  • शब्दनाद – ‘स्कुल (School)’ शब्दाची जन्मकहाणी

    स्कुल’ शब्द जरी इंग्रजी वाटत असला तरी त्याची जन्मदात्री ‘संस्कृत’ भाषा आहे असं मला ठामपणे वाटतं. तसं इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्तीच्या शब्दकोषात इंग्रजी स्कुल शब्दाच्या लॅटीन schola, ग्रीक skhole, फ्रेन्च escole अशा अनेक व्युत्पत्ती स्पष्ट केलेल्या असल्या तरी मला जास्त पटलेली व्युत्पत्ती संस्कृतमधील आहे.

      August 15, 2016


  • नवे शुद्र!

    आता आर्थिक आधारावर नवे शूद्र आम्ही निर्माण करीत आहोत. जेव्हा हा आधार जातीगत होता तेव्हाही समाजातील एेंशी टक्के लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि आताही समाजातील एेंशी टक्के लोकांना उच्चशिक्षण नाकारले जात आहे. प्राथमिक शिक्षण मात्र सगळ्यांनाच उपलब्ध आहे, कारण प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारतर्फे केली जाते.

      June 14, 2009


  • मनाचे श्लोक – १८१ ते १९०

    नव्हे चेटकी चाळकू दःव्यभोंदू | नव्हे निंदकू मत्सरू भक्तीमंदू |
    नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू | जनी ज्ञानिया तोचि साधू अगाधू ||181||

    नव्हे वाउगी चाऊटी काम पोटी | किःयेवीण वाचाळता तेचि मोठी |
    मुखी बोलिल्यासारिखे चालताहे | मना सदगुरू तोचि शोधूनि पाहे ||182||

    जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी | कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी |
    प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे | तयाचेन योगे समाधान बाणे ||183||

    नव्हे तेचि जाले नसे तेचि आले | कळो लागले सज्जनाचेनि बोले |
    अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे | मना संत आनंत शोधीत जावे ||184||

    लपावे अती आदरे रामरूपी | भयातीत निश्र्चीत ये सस्वरूपी |
    कदा तो जनी पाहताही दिसेना | सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ||185||

    सदा सर्वदा राम सन्नीध आहे | मना सज्जना सत्य शोधून पाहे |
    अखंडीत भेटी रघूराजयोगू | मना सांडि रे मीपणाचा वियोगु ||186||

    भुते पिंड ब्रम्हांड हे ऐक्य आहे | परी सर्वही सस्वरूपी न साहे |
    मना भासले सर्व कांही पहावे | परी संग सोडूनि सूखी राहावे ||187||

    देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे | विदेहीपणे भक्तीमार्गेचि जावे |
    विरक्तीबळे निंध सर्वे त्यजावे | परी संग सोडूनि सूखे रहावे ||188||

    मही निर्मिली देव तो ओळखावा | जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा |
    तया निर्गुणालागि गूणी पहावे | परी संग सोडूनि सूखे रहावे ||189||

    नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता | परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता |
    तया निर्विकल्पासि कल्पीत जावे | परी संग सोडूनि सूखे राहावे ||190||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 26, 2016


  • इन्फंट्री डे

    २६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराज हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली खरी पण त्याआधीच पाक पुरस्कृत टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने कूच करून येत होते आणि ते उरी पर्यंत पोचले देखील होते.
    पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच “ऑपरेशन गुलमर्ग” या नावाने कारवाई चालू केली होती.

      October 27, 2023