वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मराठी लोकांची आणि या लोकांच्या घराघरात पोचलेली एक राष्ट्रीयीकृत बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रची एक वेगळी ओळख आहे. तिचे मुख्यालयही पुण्यासारख्या शहरात दिमाखदारपणे उभे आहे.
September 16, 2021
भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय.
October 9, 2021
मानवी जीवन म्हणजे एक कोडेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा थांग पत्ताच लागत नाही असे अनेकवेळा म्हटले जाते एव्हढेच नव्हे तर तशी प्रत्यक्ष प्रचिती देखील जीवन जगताना येते. मानवी मन हे गुणअवगुणांचा महासागर आहे. इथे चांगुलपणा आहे वाईटपणा देखील आहे.
May 2, 2023
माघ कृष्ण नवमी रोजी समर्थ रामदास स्वामींनी आपला अवतार संपविला. तेव्हापासून या नवमीला रामदास नवमी असे म्हणतात.
October 1, 2023
उन्हाळ्याच्या वेळी वेगवेगळी वन्य उत्पादने गोळा करण्यासाठी आदिवासी तसेच अन्य बांधव जंगलात जातात. डिंक,तेंदूपत्ता, मोहफुले,हिरडा बेहडा तसेच रानमेवा गोळा करून, त्यांच्या विक्रीतून आपले जीवन जगत असतात. वन्य उत्पादने गोळा करण्यासाठी काही वेळा स्वच्छ जागेची गरज असते, ती जागा स्वच्च्छ करण्यासाठी जंगलांना आग लावून दिली जाते.त्या आगीचे वणव्यात रुपांतरण होता आणि वणवा पसरत जातो. अल्प शिक्षणामुळे जंगलांवर अवलंबून असलेले बांधव,' होणाऱ्या हानीबाबत व्यापक व दूरगामी विचार करू शकत नाही. या सर्व जंगलांच्या परिसरात राहणाऱ्या बांधवाना जागरूक करण्याची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे.
वन्य प्राण्यांची तस्करी करणारे लोक जंगलांना आग लावून देतात,आगीच्या भीतीने पळणाऱ्या वन्य प्राण्यांची शिकार करणे तस्करांना यामुळे सोपे होते.अश्या बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून ती माहिती वनविभागापर्यंत येत नाही, किवा आली तर जलद गतीने यावर कारवाही होत नाही.या प्रकाराबाबत लोकांची जागरुकता वाढविणे आवश्यक आहे.
सगळे प्रकार होताना आपण बघ्यांची भूमिका घेतो, मला काय त्याचे , माझ्या एकट्याने काय बिघडणार आहे ? अशी आपली मानसिकता असते.अश्याप्रकारचा विचार करण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत.
-- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
March 17, 2011
दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरीलीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥
आई जगदंबेचे वैभव वेगवेगळ्या अंगाने प्रस्तुत करताना आचार्यश्री म्हणतात,
दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी- दृश्य अर्थात दिसू शकणारे आणि अदृश्य अर्थात न दिसणारे. आपल्या आकलनाच्या ही पलीकडे असणारे. विभूती अर्थात वैभव. संपत्ती. आपल्या भक्तांना जी दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील अद्वितीय वैभव प्रदान करते त्या आदिशक्तीला दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी असे म्हणत असतात.
ब्रह्माण्डभाण्डोदरी- या संपूर्ण ब्रह्मांडांचा पसारा जिच्या उदरात राहतो, अर्थात जिच्या उदरातून जन्माला येतो त्या विश्वजननीला ब्रह्माण्डभाण्डोदरी असे म्हणतात.
लीलानाटकसूत्रभेदनकरी- या संपूर्ण जगाच्या संचालनासाठी जसा एखादा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा आपल्या हातातील दोऱ्यांचा वेगवेगळ्या उपयोग करतो. हालचाली करतो. भेद म्हणजे बदल करतो. त्यानुसार खालील बाहुल्यांना आपल्या तालावर नाचवतो. त्याप्रमाणे विश्वाचे संचालन करणारी.
विज्ञानदीपाङ्कुरी- विज्ञान अर्थात विशेष ज्ञान. ब्रह्मज्ञान. त्याचा दीपाचा अंकुर असणारी. अर्थात जिच्या आधारावरच ब्रह्मज्ञान उजळते अशी. समाधीदायक कुंडलिनी शक्ती स्वरूपिणी.
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी- भगवान श्री विश्वनाथांच्या मनाला अत्यंत आनंद प्रदान करणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती, ज्ञान,वैराग्यरूपी भिक्षा प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 2, 2020
पुण्याच्या एका नामांकित कंपनीत (BSNL) सोनल कामावर होती. खूप हुशार आणि मेहनती मुलगी. वयाच्या बाविसाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरविले होते. त्यामुळे आईनेच सांभाळ केला. सोबत एक लहान बहीण सुद्धा आहे. सोनल शांत आणि सुस्वभावी होती. तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झालेले. तिचा संसार सुखाचा चालू होता.
September 13, 2023

ए२बी ही खूण आढळणारे हे सर्व कुत्रे, सायबेरिआतील कुत्र्यांच्या पूर्वजांपासून सुमारे तेवीस हजार वर्षांपूर्वी निर्माण झाले असल्याची शक्यता या संशोधकांना दिसून आली.
April 3, 2022
जगात भाषाच नसती तर? भाषेशिवाय जगाची कल्पनाच होऊ शकत नाही. माणसाला भाषा अवगत नसती तर माणसात आणि जनावरात फरकच उरला नसता…
June 23, 2011
अँटी बायोटिक्स हा शब्द माहीत नसलेला मनुष्य आज घडीस सापडणे अवघड आहे! 1930 साली अपघाताने लागलेल्या या शोधाने औषधोपचाराची दिशा बदलली!
मात्र जनक फ्लेमिंग, यांच्या "या अस्त्रा चा वापर जपून करा" या सांगण्याला अक्षरशा हरताळ फासत, मनुष्य आणि प्राण्यावर याचा मारा करण्यात आला! आणि आज सुपर बग्स आणि अँटिबोटिक्स रेजिस्टन्स नावाचा भस्मासुर आपल्या वर उलटू लागला आहे!
हे कसे रोखता येईल!
पेशंट म्हणून जाताना
1) योग्य डॉक्टर/प्याथि निवाडा.
2) डॉक्टर मला लवकर बरे व्हायचे आहे,स्ट्रॉंग औषधे द्या असा बाल हट्ट धरू नका.
3) शरीरातील रोग प्रतिकार शक्तीस थोडा वाव द्या.
4) डॉक्टरांनी अँटी बायोटिक्स लिहिली असतील तर त्याचा कोर्स पूर्ण करा. अर्धवट सोडलेला कोर्स आपणास ड्रग रेजिस्टन्स कडे पावला पावलाने ढकलत असतो.
बॅक्टरीया अर्थात जिवाणू अतिशय हुशार असतो,अँटी बायोटिक्स चे स्वरूप ओळखून त्याच्या कामाच्या पद्धती पाहून आपले स्वरूप बदलतो,
आणि मग पुढील दर खेपेस नवे अँटी बायोटिक या प्रमाणे तो यशाची नवी शिखरे पादाक्रांत करतो !
आताच सापडलेला एक जिवाणू इतका शक्तिशाली निघाला की त्याला सुपर बग हे नाव देण्या वाचून गत्यंतर राहिले नाही.
अजिंक्य मी! अमर्त्य मी! अशी दर्पोक्ती करत आपल्या ला ड्रग रेजिस्टन्स च्या गर्तेत ढकलत जातो!
मागील एका वर्षात 7 लाख लोक अँटी बायोटिक चा प्रभाव न चालल्याने मृत्यू मुखी पडले आणि प्रति जैविकांचा वापर असाच चालू राहिल्यास ही संख्या काही काळात एखाद्या देशाची असणार आहे हे सांगायला ज्योतिषी नको!
सर्व सामान्य माणूस याकरता काय करू शकतो
1) स्वच्छता राखणे.
2) हात धुण्याच्या सवयी लावून घेणे.
3) खाद्य पदार्थाचे स्रोत तपासून पाहणे.
फार्मासिस्ट म्हणून आपली जबाबदारी काय?
1) काउंटर ला कोणतेही अँटी बायोटिक न देणे.
2) योग्य डॉक्टर च्या प्रिस्क्री.वर च औषध विक्री करणे.
3) जुन्या चिट्ठी वर परत परतअँटी बायोटिक्स न देणे.
4) विक्रीचा पूर्ण रेकॉर्ड ठेवणे.
5) अँटी बायोटिक्स च्या सुयोग्य वापरा बाबत पेशंट चे समुपदेशन करणे!
आपल्या येणाऱ्या पिढ्या करता काही सुयोग्य कृती करावी असे वाटत असेल तर फक्त त्यांच्या करता ही औषधे वापरण्यास शिल्लक ठेवा अन्यथा या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत!
November 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti