(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४७

    भगवान श्रीहरीच्या मस्तकावरील अद्वितीय अशा केसांचा विचार केल्यानंतर आचार्यश्री त्या केसांवर विराजित असणाऱ्या अतुलनीय सौंदर्यपूर्ण मुकुटाचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजिलेल्या उपमा देखील अतुलनीय अशाच आहेत.

      January 19, 2021


  • गरज दोघांच्याही आत्मपरिक्षणाची

    मराठी चित्रपटनिर्मितीचा वेग वाढत असतानाच आवश्यक त्या प्रमाणात चित्रपटगृहे उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली जाते.

    मुख्यतः मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट ‘प्राईम टाईम’मध्ये प्रदर्शित केले जावेत अशी निर्मात्यांची अपेक्षा असते. मात्र, याबाबत

    मल्टीप्लेक्सचालक सहकार्य करत नाहीत, असा सर्वसाधारण सूर आहे. या परिस्थितीत मल्टीप्लेक्सचालक आणि निर्माते या दोघांचेही आत्मपरिक्षण गरजेचे ठरते.

      September 10, 2010


  • आहारसार भाग ९

    अन्नावरचे संस्कार अन्नाचे गुण बदलून टाकतात. मक्याचे दाणे खायचे असतील तर, त्याअगोदर कणीस स्वच्छ तर करायला हवे. त्याच्यावरची आवरणे आणि तूस काढून टाकायला नकोत का ?

    तस्संच अन्नाचंही आहे. आपल्याला जसं हवंय तसं आपण शुद्ध करून घेतो, वरून खाली पोटात ढकललं की, आपली जबाबदारी संपली. मग शरीराला जसं हवं तसं, शरीर ते शुद्धकरून घेतं. ही सर्व जबाबदारी यकृतावर असते.

    वरून खाली आलेल्या अन्नातील भेसळ दूर करणे, त्यातील विषावर तात्पुरते आवरण घालून बाजूला करणे, चांगले अन्न पचनासाठी पाठवणे, हे पाचन होण्यासाठी जे जे अन्नरस आवश्यक आहेत तेते पुरवणे, नकोत ते पुनः शुद्ध करून घेणे, तयार झालेल्या अन्नरसातून रक्तनिर्मितीला आवश्यक ती तयारी करणे, तयार रक्तातील दोष शोधून ते मूत्र, रज, घामाद्वारे बाहेर काढणे इ. सर्व शुद्धीकरणाचे काम यकृत करीत असते.

    पुरवून पुरवून वापरणे, अत्यंत आवश्यक तेव्हाच नवीन उत्पादन करणे, नाहीतर टाकाऊतून टिकाऊ तयार करणे हा तर यकृताचा आवडीचा छंद !

    आपण जेवढे शुद्ध अन्न आतमधे देऊ, तेवढे यकृताचे काम कमी होते, त्याला पुरेशी विश्रांती देखील मिळते. काम करून दमल्यानंतर परत ताजेतवाने होऊ शकते. एकदम फ्रेश !

    नाहीतर हे यकृत, कामाच्या ओझ्याखाली एवढे दबून जाते की, स्वतःच्या मूलभूत गरजांकडेदेखील त्याला लक्ष देता येत नाही. अगदी एखाद्या राबराब राबणाऱ्या आदर्श गृहिणीसारखे. मग कधीतरी ठिणगी उडाली आणि स्फोट झाला तर दोष कुणाचा ?

    सावध तो सुखी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. वेळीच घातलेला एक टाका पुढील नऊ टाके वाचवतो, असे पाश्चात्य तज्ञ देखील म्हणतात.

    यकृताकडे आतून लक्ष देणे म्हणजेच घातक रसायनांपासून दूर रहाणे. आज एवढी विषे आपल्या अवती भवती आहेत, त्यातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर विवेकाने वागले पाहिजे.

    एकतर टोटल प्रिव्हेंशन, नाहीतर टोटल क्युयर

    काय योग्य, काय अयोग्य हे वेळीच ठरवता आले पाहिजे. अनावश्यक विषे टाळू शकलो तर आवश्यक ती विश्रांती आपण आपल्याच यकृत किडनी या अवयवांना देणार आहोत.

    हलाहल पोटात गेले तर, पुढे धोका आहे, हे वेळीच ओळखून, ते विष योग्य त्या ठिकाणी रोखून, शोषून, कंठामधेच धारण करणारे हलाहलधर, नीलकंठ व्हावे.
    हे झाले टोटल प्रिव्हेंशन

    आणि टोटल क्युयर करायचे असेल तर ...???

    वेळप्रसंगी प्रजेचे रक्षण झालेच पाहिजे, हा उदात्त हेतू लक्षात घेऊन, यमुनेतील कालीयाच्या विषारी डोहात उतरून, जमीन, पाणी आणि आसमंतामधे विष निर्माण करणार्‍या, या कालीयांच्या डोक्यावर थयथय नाचून, रक्त ओकेपर्यंत नामोहरम करून, त्याला त्याच्याच देशातून, दहशत निर्माण करणारा, आणि डोह सोडून जाईपर्यंत, पाठपुरावा करणारा गोपालक कालीयामर्दक बालकृष्ण तरी व्हायला हवे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    27.08.2016

      August 27, 2016


  • इलेक्ट्रिक जनरेटर

    इलेक्ट्रिक जनरेटर

    भारनियमनाच्या काळात कुठलेही कार्यालय किंवा खादे गृहसंकुलही वीज खंडित झाल्यानंतरही प्रकाशित राहू शकते, ते इलेक्ट्रिक जनरेटरमुळे इलेक्ट्रिक जनरेटरचा आता तर आवाजही येत नाही त्यामुळे त्याला सायलंट पॉवर असेही म्हटले जाते. लेक्ट्रिक जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत केले जाते.

      August 22, 2023


  • भारतीय पुराणे आणि स्वदेशी कल्पना

    काही दिवसांपूर्वी गौरी गणपतीसाठी आईकडे गेले होते. या वर्षी, मी गौरीसाठी माहेरी आल्याने आईला खूपच आनंद झाला आणि एरवी ती जे शॉर्टकटमध्ये करत असे ते आता दोघी होतो म्हणून आम्ही दोघींनी मिळून सगळं अगदी साग्रसंगीत केले. आईकडे गौरी येते ती पाणवठ्यावरून. माझी आजी पूर्वी असा कलश नदीवरून भरून आणत असे.

      November 17, 2023


  • ऋषि पंचमी

    भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी स्त्रियांनी करावयाचे व्रत. यात सप्तऋषिंची व अरुंधतीची पूजा करण्यास सांगितले आहे.

      September 20, 2023


  • श्यामला गोपीनाथ – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

    श्यामला गोपीनाथ ह्यांचा  जन्म २० जून १९४९ रोजी झाला  ह्या  बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कर्जदाता असलेल्या एचडीएफसी बँकेची अध्यक्षा आहेत सुश्री गोपीनाथ ह्या  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या माजी डेप्युटी गव्हर्नर आहेत , त्यांनी हे पद सात वर्षे भूषवले.

      September 13, 2025


  • भारतीय नागरिक नसताना कसाब न्यायालयात जातोस कसा?

    भारतात न्यायव्यवस्था आहे, या व्यवस्थेत प्रत्येक आरोपीला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाते; परंतु ती सुविधा केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे, हे या दहशतवाद्यांना सांगायचे असेल तर पकडलेल्या दोन-चार दहशतवाद्यांना गोळ्या घालणे गरजेचे आहे. इथे देशद्रोह्याला चिरडलेच जाते, हा देश स्वाभिमान आणि सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही, असा संदेश जोपर्यंत दहशतवाद्यांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत इथल्या दहशतवादी कारवायांना लगाम बसणार नाही आणि तोपर्यंत आमच्या स्वातंत्र्यालाही पूर्णत्व येणार नाही. भीत-भीत जगायला लावणारे हे स्वातंत्र्य काय कामाचे?

      August 14, 2011


  • मी पाहिलेला होक्काइदो – साप्पोरो (जपान वारी)

    हाकोदाते पाहिल्यानंतर पुढे ओढ लागली ती म्हणजे होक्काइदोची कॅपिटल सिटी पाहण्याची. “साप्पोरो” हे होक्काइदो मधील सर्वात मोठे शहर असुन इकडे येण्याचा सगळ्यात सोयीस्कर मार्ग म्हणालं, तर हवाई मार्ग.साप्पोरो Planned City असल्यामुळे, शहराची रचना पद्धतशीर आहे.

      May 16, 2020


  • ई-कोलाय

    माणसाच्या शरीरात अनेक जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सगळेच जिवाणू हे घातक नसतात, तर काही मानवाचे मित्रही असतात. ई-कोलाय या जिवाणूचे मात्र तसे नाही. तो आरोग्यास घातक असतो, पण त्याच्या सगळ्या जाती या हानिकारक नाहीत. त्याचा शोध जर्मनीतील बालरोगतज्ज्ञ थिओडोर इशरिच यांनी १८८५ मध्ये लावला.

      November 8, 2023