वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मानवी जीवनात प्राप्तव्य अशा चार अत्यंत श्रेष्ठ गोष्टींना पुरुषार्थ असे म्हणतात. अर्थ म्हणजे मिळवण्याची गोष्ट. पुरुष अर्थात जीवाने मिळवण्याच्या या चार गोष्टी. धर्म-अर्थ-काम-मोक्ष अशा या चारही पुरुषार्थांना प्रदान करणाऱ्या आई जगदंबेचे वैभव आचार्यश्री या श्लोकात वर्णन करीत आहेत.
February 12, 2020
“प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना वारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..?
August 19, 2019
गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. महाराजांचे चरीत्र वाचन करताना आपल्याला त्याची अनुभूती येईलच. हे सर्व संत माहात्म्ये हे गुरुतत्त्वाचेच अवतार आहेत. जे मनुष्याला अध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी स्वतः खडतर असे जीवन जगून कुठल्याही परिस्थितीत साधना करून परमार्थिक उन्नती करुशकतो याचे मार्गदर्शन करीत असतात. सर्व सामान्यपणे जीवन जगत साधे उपदेश देत प्रत्येक जीव आनंदी कसा होईल या साठी प्रयत्न करीत असतात. गुरुतत्त्व हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे. जे एकाच वेळी वेगवेगळ्या स्वरुपात सर्वत्र कार्यरत असते. मुख्य ईश्वराकडे जाणारे चार मार्ग व त्याचे उप मार्ग या सर्व मार्गाचे जे प्रमुख आहेत ते गुरुतत्त्वाचेच अवतार असतात. ज्या प्रकारे हे विश्व विविध प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांनी व्याप्त आहे. त्याच प्रकारे गुरुतत्त्व सुद्धा तितक्या मार्गाने कार्यरत आहे. प्रत्येक जीव हा साधना करीत शिवाशी एकरूप व्हावा. यासाठीच हे गुरुतत्त्व पंचमहाभूतांचे शरीर धारण करून मार्गदर्शन करीत आहेत. म्हणून कधीही संत, महात्मे, अवतारी पुरुष याच्यावर टीका टिप्पणी करू नये. त्यानी केलेल्या मार्गदर्शनाचे चिंतन केले तर त्याच्या तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ कळून येईल. गुरुतत्त्व मासिका तर्फे दर महिन्याला एक एका संतांची माहिती प्रकाशित करण्यात येत आहे. संतांनि जन्म घेऊन कश्या प्रकारे साधना केली आणि गुरु पदापर्यंत पोहोचून समाजाला कसे मार्गदर्शन केले याविषयी माहिती देतो. तेवढी जरी माहिती आपण वाचली तरी त्यांचे कार्य लक्षात येईल. पुढे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी व गुरूतत्त्व सगळ्यांना कळावे हाच उद्देश आहे.
दिनांक ३१ जानेवारी २०२१ ला सिंधुदुर्ग जिल्हयातीलपिंगुळी ता. कुडाळ येथे सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या समाधीला ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. फेब्रुवारी महिन्याचे ३९ वे पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करीत आहोत.
करा करा हो जयजयकार राऊळबाबांचा जयजय कार पिंगुळीचा ब्रह्मयांगी हा दत्तांचा अवतार या वरील ओळी शब्दश: सार्थ करणाऱ्या आहेत. सद्गुरुंचा जन्म १६ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सौ सावित्रीबाई आणि अप्पाजी राऊळ यांच्या पोटी झाला. पाळण्यातील नाव “श्रीकृष्ण" असले तरी पुढे ते "कृष्णाजी" आणि "आबा" या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले व पुढे श्री राऊळ महाराज याच नावाने त्यांची प्रसिद्धी झाली. पिंगुळी गावचं ग्रामदैवत श्री देव रवळनाथ याचे मानकरी असलेले राऊळ कुटुंब हे अतिशय गरीब शेतकरी कुटूंब. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य आणि अशा गरीब परंतु ईश्वर भक्तीपरायण कुटूंबात साऱ्या विश्वाचा उद्धार करण्याची क्षमता असलेला हा द्वारकाधीश “कृष्ण" च जणू अवतरला. त्यांचा लहानपणापासूनच परमार्थाकडे ओढा होता. त्यांच शिक्षण तिसरी इयत्तेपर्यंत झालं होते. पण चार भिंतीच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनाच्या खुल्या विद्यापीठात ते शिकले. कारण त्यांच्या जीवनाचे लक्ष्य “अध्यात्म” हेच होतं. देवाच्या नामस्मरणात ते रंगून जात असत. त्यांना ज्ञानदेव, तुकाराम आदी संतांचे अभंग तोंडपाठ होते. ज्ञानेश्वरीही त्यांना मुखोग्दत होती. लहानपणी गुरे राखताना ते भजनात दंग व्हायचे, तसेच मोठे झाल्यावरही ते खड्या आवाजात अभंग म्हणत असत. अखंड हरिनाम हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासापायी त्यांनी मुंबईतील आपल्या नोकरीलाही रामराम ठोकला. सौ. राधाबाई यांच्याशी लग्न झाल्यानंतरही ते संसारात कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिले. संसारातील भवताप पचवताना स्थितप्रज्ञ राहिले.
सद्गुरु राऊळ महाराज म्हणजे प्रखर योगी पुरुष. त्यांनी त्यांनी १९४५ ते १९७२ अशी २७ वर्षे कठोर ध्यानसाधना केली. त्यासाठी ते कुठे हिमालयात किंवा रानावनात गेले नाहीत. तर स्वत:च्या आईच्या दुकानाला लागून असलेल्या लहानशा खोलीत ते ध्यानाला बसत. ध्यान करताना खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद करीत. जवळजवळ ६ महिने हे ध्यान सुरु असताना ते हळूहळू खाणे-पिणे कमी करत व नंतर तर काहीच घेत नसत. एवढी प्रखर ध्यानसाधना केलेल्या या योग्याची योग्यता त्यांचे गुरु प. पू.
बाळकृष्ण महाराजांनी अचूक ओळखली व त्यांनी प पू. राऊळ महाराजांना स्वत:ची अध्यात्मिक गादी चालविण्याची विनंती केली. परंतु जीवनात कशाचीच आसक्ती नसलेल्या श्री राऊळबाबांनी ती नम्रमणे नाकाराली. महाराज हे जरी जन्मत:च संत असले तरी ज्ञानेश्वर महाराजांसारख्या अनेक संतांप्रमाणे त्यांच्याही वाट्याला अनेक दुःख, अवहेलना, जननिंदा आली. पण शेवटी बाबांचीच किर्ती अजरामर झाली. कारण राऊळबाबांसारख्या सत्पुरूषाचा जन्म हा स्वतःपुरता नसून सर्व समाजाच्या उद्धारासाठी होता. त्यांनी आपले समग्र जीवन भाविक भक्तजनांच्या कल्याणासाठी आजन्म व्यतीत केले. त्यांच वागण, बोलण अगम्य व अतर्क्य होतं. सर्वाविषयी त्यांना कळवळा होता. त्यांनी पेट्रोलशिवाय गाडी चालवली. एवढेच नव्हे तर स्वतःच्या आईला तिच्या मृत्युनंतर ९ तासांनी जिवंत करून तिला रात्रभर ज्ञानेश्वरी ऐकवून मग तिची मोक्षाकडे वाटचाल सुरु करून दिली. हे सर्व करताना 'चमत्कार करावा” अशी त्यांची धारणा नव्हती. तर सामान्य मनुष्य जीव या योगे सन्मार्गी लागावा, ही तळमळ त्यामागे असे.
सद्गुरु राऊळबाबांनी अनेक लोकांना उपदेश, ज्ञानबोध दिला. परंतु त्यांच्याकडून खरा “गुरुप्रबोध” कोणीच संपादन करू शकला नाही. कोणी त्यांची अखंड सेवा करू शकला. सद्गुरु राऊळ महाराजांसारख्या प्रखर अवलिया व जमदग्नीचा अवतार असलेल्या सत्पुरुषांची प्रत्यक्ष सेवा करणे सोपही नव्हतं. हे शिवधनुष्य पेललं प. पू. विनायक अण्णा महाराजांनी. विनायक अण्णा महाराज हे प. पू. राऊळबाबांचे रूढ अर्थाने पुतणे व आध्यात्मिक वारसदार. असं म्हणण्याचं कारण म्हणजे अण्णा महाराज हे गेली ६० वर्षे अखंडपणे आपले गुरू श्रीराऊळ महाराज यांच्या सेवेत आहेत. पहिली २५ वर्षे प्रत्यक्ष गुरुसेवा आणि १९८५ साली प. पू. बाबांनी देह ठेवल्यानंतरची ३५ वर्षे जनसेवेच्या माध्यमातून गुरुसेवा करीत आहेत.
सद्गुरु राऊळबाबांनी माघ शु. दशमी ३१ जानेवारी १९८५ या दिवशी देह ठेवला. त्यांनतर गेल्या ३५ वर्षामध्ये श्री अण्णांनी रात्रंदिवस अवरित कष्टांनी पिंगुळी या प. पू. राऊळबाबांच्या जन्मभूमी, तपोभूमी आणि कर्मभूमीचे रुपांतर जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रमध्ये केले. परमपुज्य राऊळबाबांनी “कृष्ण" रूपाने श्री अण्णांकडून ही सुदाम्याची नगरी आज निर्माण करून घेतली आहे. प. पू. बाबांच्याच आज्ञेने श्री अण्णा महाराज पिंगुळी क्षेत्री आजतागायत अन्नदान करत आहेत. समाधी मंदिर परिसर, पिंगुळी गांव व भाविकांच्या मनावरची जळमटे काढणारे श्री अण्णा महाराज स्वत:चे “झाडुवाला" हे बिरूद सार्थ ठरवत आहेत सद्गुरु राऊळबाबांनी पिंगुळी येथे लावलेले औदुंबराचे लहानसे रोप आज भव्य कल्पवृक्ष बनले आहे. प. पू. बाबांची लाडकी माऊली ही आज मोठ्या मंदिरामध्ये दिमाखात विराजमान झाली आहे. आणि पिंगुळीक्षेत्री असलेली प. पू. राऊळ महाराजांची संजीवन समाधी आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनली आहे. अण्णांनी आपल्या सद्गुरु राऊळबाबांची दिव्य स्पंदने समस्त भक्तांसाठी जणू काही या समाधीमध्ये जतन करून ठेवली आहेत. सद्गुरु राऊळबाबा आजही या समाधीमध्ये, पिंगुळीमध्ये व प्रत्येक भक्ताच्या हृदयात चैतन्याने वास करून आहेत. सद्गुरु राऊळ महाराजांचे जीवनचरीत्र आपल्याला नक्कीच अवडेल यात शंका नाही.
गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे गुरुतत्त्वसेवा साधना आनंदकुटी, नेरळ कर्जत येथे गेल्या दत्त जयंती पासून अखंड अग्नी प्रज्वलीत आहे. त्यात गेल्या वर्षभरात अनेक मोठी यज्ञ सामुदाईकरीत्या झालेली आहेत व होत आहेत. यात आपण सुद्धा सहभागी होऊ शकता. यासाठी सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा.
।। जय गुरुदेव ।।
-– श्री. संतोष शामराव जोशी
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ४ थे, अंक ०३ रा, (अंक ३९)
September 8, 2022
गणपतीला दुपारचा नैवेद्य अगदी साग्र संगीत असतो. नाव देवाचे आणि नैवेद्याचे ताट जेवतो आपणच.
पण रात्रीचं काय ? सायंपूजेला गणेशजींना काय नैवेद्य दाखवला जातो ? पुनः फुल्ल राईसप्लेट ?
नाऽही.
फक्त एक लाडू किंवा एखादा मोदक किंवा एक करंजी किंवा जास्तीत जास्त वाटीभर दूध.
"बास्स,
हे लंबोदरा, सायंपूजेला तुला एवढंच मिळणार !
आमच्या घराण्याच्या चालीरितीत असेच आहे."
.
.
.
. आणि असं प्रत्येक घरात सुरू आहे.
जेव्हा या परंपरा सुरू झाल्या, तेव्हा पासून ते आजमिती पर्यंत यात काहीही बदल झालेला नाही. संध्याकाळी नैवेद्य हा अगदी मोजकाच असतो. ही भारतीय परंपरा असून, मागील फक्त तीस चाळीस वर्षात आपण बदललो.
जेव्हा पासून मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण झाले, घराघरात दूरदर्शन आणि नंतर केबल नंतर डिश बसली, त्यानंतर.....
देवाच्या नावाने सुरू असलेली एक चांगली आरोग्य परंपरा आपण विसरत गेलो.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी ,
या नियमातही काही बदल संभवू शकत नाही. हे त्रिकालाबाधीत सत्य देखील आम्ही नाकारले.
आणि ते अर्धसत्य बनवले.
म्हणजे देवासाठीचा दुपारचा नैवेद्य पूर्ण ताट भर आणि रात्रीच्या वेळी फक्त वाटीभर.
नैवेद्याची प्रथा तीच ठेवली, पण त्यामागील आरोग्यशास्त्र आणि व्यवहार यांची सांगड घालणे आम्हाला जमले नाही. सायंपूजेला
देवाला जरी वाटीभर दिले तरी आम्ही मात्र ताटभर खाणे सुरू ठेवले.
नैवेद्य दाखवण्यातील ज्ञानमार्गाचा मूळ अर्थ बदलूनच गेला आणि फक्त आंधळी आणि सोयीस्कर भक्तीचे केवळ कर्मकांड शिल्लक राहिले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
08.09.2016
September 8, 2016
कलावंतांशी तुलना करताना आम्हा राजकारणी लोकांचे जीवन हे अगदी सामान्य आहे. आपल्या लोकांचे जीवन थोडेफार अधिक सुखकारक करण्याचे काम आम्ही करत आहोत. अशा विश्वासापोटी काळाच्या वाळूर आम्ही आमची नावे कोरण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो, पण त्यात काही अर्थ नाही. कलाकार, संगीतकार, कवी, लेखक हेच केवळ अजरामर राहतात.
January 27, 2023
आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वर्चस्ववादी भूमिका घेणा-या चीनचे व्यापारीही आता दादागिरी करू लागल्याचे दिसते. आपल्या वस्तू घेण्यास भाग पाडायचे आणि नंतर पैशाच्या वसुलीसाठी पठाणी मार्ग अवलंबायचा. शांघायजवळील यिवू शहरात एस. बालचंद्रन या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा झालेला छळ हा त्याच मानसिकतेचा परिपाक म्हटला पाहिजे.
January 17, 2012
१९ जानेवारी १९५६ मध्ये भारतातील आयुर्विम्याचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयकरणाच्यावेळी भारतामध्ये जवळ जवळ १५४ भारतीय विमा कंपन्या, १६ अभारतीय कंपन्या आणि ७५ दूरदर्शी कार्यरत होत्या. राष्ट्रीयकरण दोन टप्प्यांमध्ये साध्य करण्यात आले, सुरवातीला कंपन्यांचे व्यवस्थापन अध्यादेशाच्या साधनाने ताब्यात घेण्यात आले, आणि नंतर सर्वसमावेशक विधेयकाच्या साधनाने मालकी सुद्धा.
भारतीय संसदेने १९ जुन १९५६ रोजी आयुर्विमा महामंडळ अधिनियम पारित केला, आणी भारतीय आयुर्विमा महामंडळ १ सप्टेंबर १९५६ रोजी आयुर्विम्याचा सर्वदूर अधिक व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने विशेषकरून देशाच्या ग्रामीण भागातील सर्व विमायोग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण योग्य किमतीत पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आले एल.आय.सी.ची १९५६ मध्ये तीच्या कार्पोरेट कार्यालयां व्यतिरिक्त ५ प्रादेशिक कार्यालये, ३३ विभागीय कार्यालये आणि २१२ शाखा कार्यालये होती. पॉलिसी चालू असण्याच्या काळात आयुर्विमा करार दीर्घकालीन करार असल्याने तीच्या विविध सेवांच्या गरजा पुढील वर्षांमध्ये कार्यविस्तार करण्यसाठी आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालयामध्ये एक शाखा कार्यालय ठेवण्यासाठी भासू लागल्या. एल.आय.सी.ची पुनर्रचना करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर नविन शाखा कार्यालये उघडण्यात आली. पुनर्रचनेचा एक परिणाम म्हणून सेवा देण्याची कार्ये शाखा कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि शाखा या लेखा युनिटस करण्यात आल्या.
महामंडळाच्या कामगिरीने हे अद्भुत कार्य केले. हे फक्त सन १९५७ मध्ये २०० कोटी रूपयांपासून महामंडळाने वर्ष १९६९-७० मध्ये ओलांडलेल्या १००० कोटींच्या नविन व्यवसायावरून लक्षात येते आणि एल.आय.सी.ला नविन व्यवसायाचे २००० कोटींचे उद्दिष्ट पार करावयाला पुढील १० वर्ष लागली. परंतू ऐंशीच्या सुरवातीला घडत असलेल्या पुनर्रचनेमुळे, वर्ष १९८५-८६ पर्यंत एल.आय.सी.ने आधीच नविन पॉलिसींवरील ७०००सम एशुअर्ड चा आकडा पार केला होता.
आज एल.आय.सी.ची २०४८ संपूर्ण संगणकीकरण केलेली शाखा कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, ८ प्रादेशिक कार्यालये, १३८१ उपग्रह कार्यालये आणि कार्पोरेट कार्यालयांसहीत कार्यरत आहे.
एल.आय.सी.च्या वाईड एरीआ नेटवर्कने ११३ विभागीय कार्यालये व्यापली आहेत आणि मेट्रो एरीआ नेटवर्कच्या मार्फत सर्व शाखा जोडण्यात आल्या आहेत. काही निवडक शहरांमध्ये ऑनलाईन विम्याचे हप्ते गोळाकरण्याची सोय देऊ करण्यासाठी एल.आय.सी.ने काही बॅंका आणि सेवापुरवठादारांशी संधान साधलेले आहे. ग्राहकांच्या सोईसाठी एल.आय.सी.ची इसीएस आणि एटीएम मार्फत विमाहप्ता भरणा सोय ही अतिरिक्त आहे.
ऑनलाईन किऑस्क आणि आयव्हीआरएसच्या खेरीज मुंबई, अहमदाबाद, बंगळूरू, दिल्ली, पुणे आणि इतर अनेक शहरांमध्ये माहिती केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. पॉलिसीधारकांना त्यांच्या सहज प्रवेश पुरवण्याच्या हेतूने एल.आय.सी.ने उपग्रह संपर्क कार्यालये सुरू केलेली आहेत. उपग्रह कार्यालये छोटीशी, आटोपशीर आणि ग्राहकाला अधिक जवळची असतात. भारतीय विम्याच्या उदारीकरणाच्या परिस्थीतीत सुद्धा एल.आय.सी. नविन वाढीच्या दिशेने वेगाने स्वत:चीच मागील सर्व रेकॉर्ड मोडत कार्यक्रमण करताना आघाडीवर आहे.
एल.आय.सी.ने ब्रिटन, फिजी, नेपाळ, श्रीलंका आदी देशांमध्ये कारभार सुरू केला. तसेच विमा क्षेत्राबरोबरच पेन्शन, गृहकर्जे, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, वित्त उत्पादनांचे वितरण आदी क्षेत्रात एल.आय.सी. काम करीत आहे. आत्तापर्यंत एल.आय.सी.ने अनेक मैलाचे टप्पे ओलांडले आहेत आणि आयुर्विमा उद्योगाच्या दृष्टीकोनातून अभूतपूर्व कामगिरीचे अनेक मानबिंदू प्रस्थापीत केलेले आहेत. हा तोच हेतू ज्याने आमच्या पूर्वजांना विमा या देशात प्रत्यक्षात आणण्यासाठी, आम्हाला एल.आय.सी.मध्ये हा संरक्षणाचा निरोप घेऊन सुरक्षेचा दिवा शक्यतितक्या घरांमध्ये लावण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या कुटुंबांसाठी सुरक्षा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी प्रेरणा दिली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 19, 2017
आतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात.
October 13, 2018
रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण तालुक्यात डोंगराच्या कुशीत १२ वाडींचे मसुरे गाव असून,या ठिकाणी वरदगढ हा किल्ला आहे.या गडाजवळच भगवंतगढ तसंच रामगढ स्थित आहेत.अश्या माऊली गावातील माउलीदेवीचं देऊळ वसलं असून,ते सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज आहे.
October 5, 2013
इ. ११वी, १२वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भूगोल, कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान (phy, che, bio, maths, geography, agricultural science and technology) या प्रमुख विषयांसह सुमारे ६५ विषय इंग्रजीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही, त्यांची इच्छा असेल तर या विषयांची १२ वीची परीक्षा मराठीतून देण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केली आहे.
October 6, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti