(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीक्षेत्र नरसोबावाडी

    श्रीनरसोबावाडी हे एक परमपावन सुंदर महाक्षेत्र आहे! कृष्णा व पंचगंगा ह्या दोन नद्यांच्या संगमामध्ये एक चौरस मैल क्षेत्रामध्ये बसलेले आहे. हे महाक्षेत्र कृष्णेच्या पश्चिम तीरावर विराजमान असून दोन्ही नद्यांच्या तीरांना हे शोभनीय आहे. कृष्णेच्या एक्कावन पायऱ्यांच्या भव्य घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षातळी सुंदर शीलामय मंदिर आहे.

      June 12, 2023


  • निवडणुका नोकरशाहीच्या पथ्यावर!

    सध्या संपूर्ण जगालाच मंदीची समस्या भेडसावत आहे. अमेरिकेसारखा धनाढ्य देशही या मंदीच्या तडाख्यातून सुटलेला नाही. इतर विकसित देशांचीही अवस्था फारशी चांगली नाही.

      February 22, 2009


  • राजकारण्यांचे नाकाने कांदे सोलणे

    कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…!!

      December 27, 2018


  • लिटमस टेस्ट !

    आता बालसाहित्याचे आयाम बदलले आहेत! कारण आता मुलांच्या भोवतालचं विश्वच झपाट्याने बदलत आहे. त्यांची 'जगण्याची भाषा' ही आता वेगळी आहे!

    -- जागतिकीकरणाचा पहिला परिणाम म्हणजे 'मूल' हे मार्केटिंगचा विषय झालं! मुलाला काय पाहिजे ह्याचा सारासार विचार न करता, कुठला माल खपला पाहिजे ह्याचाच विचार करुन त्याचा आकर्षक धबधबा मिडीयाच्या मदतीने ग्रामीण तसेच नागरी भागातून वाहू लागला. वर्तमानपत्रात रविवारच्या पुरवणीत असणारं मुलाचं पान त्यांनी बंद केलं आणि दर महिन्याला 'मूल ह्या ग्राहकराजासाठी' खास प्रायोजित पुरवणी सुरू झाली!! पॉकेमॉन ची कार्डस्, चिटोस,चॉकोस, बेबलेड ही त्याची उदाहरणं आहेत.

    -- दूरदर्शनवर सतत वाढत असणाऱ्या वेगवेगळ्या चॅनल्समुळे मुलांमधे नकळत एक प्रकारचा 'सामाजिक चतुरपणा' आला. स्त्री पुरुष संबंधातला मोकळेपणा ही घरच्यांबरोबर जेवताना पाहण्याची गोष्ट झाली. आणि मालिकांमधे होणारे घटस्फोट, अनैतिक संबंध, खोटारडेपणा, फसवेगिरी ह्याबाबत घराघरातून चालणारी रसभरीत चर्चा मुलांच्या कानावर सहजी येऊ लागली. पर्यायाने मुलांचे खेळ व मुलांची भाषा बदलली! 'चिटींग,लफडा,लोचा, पंगा,घटिया,सही' हे आणि असे शब्द मुलांच्या बोली भाषेत जमा झाले; जे त्यांनी मालिकांतून व घरातल्या मोठ्या माणसांच्या संवादातून उचललेले आहेत.

    -- शहरातून टॉवर्स उभे राहू लागले तसे जिल्ह्याच्या ठिकाणी अपार्टमेंटस व ब्लॉक संस्कृती येऊ लागली. मैदानी खेळ कमी होऊ लागले व सायबर कॅफे मधली गर्दी वाढू लागली. क्लास सुटल्यावर सायबर मधे जाऊन तासभर खेळून,मस्त फ्रेश होऊन मुले घरी येऊ लागली.

    -- घराघरात संगणकाचा शिरकाव झाला. मग घराततच मिनी सायबर कॅफे सुरू झाले. संगणक कशासाठी घेतला होता ह्याचा विसरच पडला,आणि सिनेमा,गाणी,खेळ व शक्य असेल तिथे इंटरनेट चॅटींग साठीच त्याचा अधिक उपयोग व्हायला लागला.

    -- संगणक आवाक्यात येतो आहे,त्याच सुमारास पालकांना इंग्रजी माध्यमाचे आकर्षण वाटू लागले. आणि मग बालवाडी पासूनच मुले क्लास,ट्युशन,वर्कशीटस ह्या चा*ात भरडली जाऊ लागली.

    ह्या आणि अशा गोष्टिंचा एकत्रित परिणाम असा झाला की जीवनाची गती वाढली व त्यातूनच सुरू झाली स्पर्धा. जे काही करायचं ते स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व इतरांवर मात करण्यासाठी. चांगलं आहे म्हणून वाचायचं नाही तर स्पर्घेत राहण्यासाठी वाचायचं.

    मुलांच्या अभ्यासात, खेळात,वाचनात,सहलीत किंबहुना त्यांच्या एकंदर जगण्याचा स्पर्धा हाच अविभाज्य घटक झाला!!
    मुलांच्या मानसिकतेचा विचार करताना त्याच्या पाठीमागचा कॅनव्हास हा सध्यातरी असा आहे, असा विचार करुनच पुढे जावे लागेल.

    सुमारे वीस वर्षापूर्वीची ही घटना आहे.

    पुण्याला “बालसाहित्त्यकारांचं आंतरभारती साहित्य संमेलन' भरलं होतं. मी त्यावेळी मुलांसाठी नव्यानेच लिहायला सुरुवात केली होती. काही बंगाली लेखकांना भेटलो. गप्पा मारताना त्यांना विचारल की 'मुलांसाठी ते काय नवीन लिहीत आहेत? लेखन संदर्भात काय नवीन प्रयोग करत आहेत?”
    त्या बंगाली लेखकाने अत्यंत सहजतेने आणि मिश्कीलपणे मला उत्तर दिलं.

    त्याच्या त्या सहजतेने मला नवीनच गोष्ट समजली! आपण मुलांसाठी कशाप्रकारचे लेखन केले पाहिजे ह्याची स्पष्टता आली. आणि त्याने बोलताना मिश्कीलपणेच, पण आम्हा सर्व मराठी बालसाहित्यिकांना एक सणसणीत थप्पड पण लगावली!

    तो बंगाली लेखक म्हणाला,“अजी,उस रवींद्रनाथ ठाकूर ने तो हमारी गोची ही कर दी है! हम कुछ भी लिखना चाहे,कुछ भी नया प्रयोग करना चाहे तो भी हम कर नही पातें! क्योंकी हमारे पहले ही ठाकूरजीं ने वो किया ही है! और हम से शतगुना बेहतरीन किया है!! हम उनसे अच्छा क्या कर सकते है? मानो,ठाकूरजींने बालसाहित्य के बारें में एक मापदंड सा बनाया है। नही हम उस हद तक जा सकते, नही उसे पार कर के आगे जा सकते! यही तो गोची है। लेकीन बेटे,क्या तुम्हारे मराठी भाषा में,ऐसा कोई ठाकूरजी जैसा लेखक है,जो तुम्हारी गोची कर सकता है?” त्यावेळी मी त्यांना उत्तर देऊ शकलो नाही. त्याचं एक कारण म्हणजे, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहितच होतं! आणि म्हणूनच त्यांनी तो गुगली बॉल माझ्याकडे टाकला होता! दुसरं कारण म्हणजे, त्याक्षणी मी अंतर्मूख झालो होतो! कमीत कमी वेळात किती प्रचंड काम करावं लागणार आहे ह्याचा अंदाज येऊ लागला होता.

    ह्या घटनेनंतर रवींद्रनाथांचे बालसाहित्य जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागलो. त्यांचे बालसाहित्य आणि आजचे आपले बालसाहित्य (काही सन्मानीय अपवाद वगळून) ह्याच्या मूळ संकल्पनेतच प्रचंड फरक आहे ह्याची जाणीव झाली. आपल्या बालसाहित्यात उपदेश,शिकवण,संस्कार,तात्पर्य हे सारं ठासून भरलेलं. इतकंच नव्हे तर, समोरचा मुलगा हा 'अडाणी किंवा मातीचा गोळा' आहे असं समजूनच जबरदस्तीने त्याच्यावर शिकण्याचा बोजा टाकलेला. शरीर गोष्टीचं किंवा कवितेचं पण त्याचा आत्मा मात्र 'मुलांना काहीतरी शिकवणं!' बिचारी मुले 'त्या शरीराला' फसून गोष्ट किंवा कविता वाचायला जातात आणि मग त्यातील 'आत्मा' मुलांवर शिकवणीचा मारा करत!! त्यामुळे अवांतर वाचनाविषयी एक नफरत मुलांच्या मनात नकळत निर्माण होते. रवींद्रनाथांचं सर्वात मोठं योगदान हे की,त्यांनी शिक्षणातच बालसाहित्याचा समावेश केला. बालसाहित्य आणि मुलांचं शिकणं ह्याचा अतिशय गंभीरपणे विचार करुन,त्याबाबत प्रयोग करुन त्याचा अनोखा समन्वय साधला! त्यामुळे शरीर शिक्षणाचे पण त्याचा आत्मा म्हणजे गोष्टी,गाणी,कविता,संगीत आणि गमती जमती!!
    'मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं,शरीराशी नाही' ह्याची रवींद्रनाथांना जाणीव होती.

    मुले गोष्टी वाचत, कविता- गाणी म्हणत,गमती जमती करत नकळत कधी शिकली हे त्या मुलांना कळतच नसे. (संदर्भ : सहज पाठ.)
    रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या 'सहज पाठ' ह्या तीन पुस्तिका लिहिल्या (आधी तिसरा भाग लिहिला,मग दुसरा व पहिला) त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून!!
    'करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे' असा रवींद्रनाथांचा दृष्टीकोन होता.
    आम्ही बालसाहित्यिक ह्या पासून काही धडा घेणार का?

    साहित्य ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातील एक आहे,'जे हितकारी आहे ते.' दुसरा अर्थ आहे,'सोबत करणारा किंवा सोबत चालणारा.'

    आजपर्यंत अनेक बालसाहित्यिक हे एकतर मुलांना आशीर्वाद देण्याच्या किंवा त्यांना शिकविण्याच्या भूमिकेतून तरी लिहित होते किंवा आत्ममग्न असल्याने आपल्याच मस्तीत लिहित होते! पर्यायाने ते सारे मुलांच्या भावविश्वापासून अनेक योजने दूर गेले होते!! मी देणारा आणि आणि मुले घेणारी,ह्या असल्या लेखकाच्या भूमिकेतून कधी चांगले बालसाहित्य निर्माण होत नाही व माझीच 'लेखन मस्ती सही!' ह्या भूमिकेतून तर नाहीच नाही! कुठल्याही प्रकारची भूमिका घेऊन लिहिणं हे चांगल्या बालसाहित्याचं लक्षण असूच शकत नाही.

    चांगल्या बालसाहित्याची जर लक्षणंच ठरवायची असतील तर असं म्हणता येईल की :

    -- लेखक आणि त्याचं साहित्य मुलांच्या भावविश्वाशी एकरुप झाले आहे का? म्हणजेच ते मुलांसोबत चालते का?
    -- त्या लेखकाची भाषा,मुलांना 'आपली भाषा' वाटते का?
    -- मुलांच्या परिसरात-भावविश्वात घडणाऱ्या घटना, मुलांचे आपापसातील मानवी संबंध-नाती हे सारं, तो लेखक मुलांच्या नजरेतूनच समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे का? आणि त्याच तळमळीने त्यावर काही भाष्य करतो आहे का?
    -- आणि सर्वान महत्वाचं म्हणजे, त्या लेखकाच्या ह्रदयातील मूल जागे आहे का? आणि तो लेखक 'त्या मुलासाठी' स्वत: मूल होऊन लिहितो आहे का?

    जर ह्या सर्वच प्रश्नांची उत्तरे 'हो' असतील तर ते खचितच चांगले बालसाहित्य असेल!!

    मराठीतल्या प्रस्थापित साहित्यिकांनी मुलांसाठी ही लिहिले आहे. (पण काही सन्मानिय अपवाद वगळून) त्यांनी काही जाणीवपूर्वक प्रयोग केले आहेत, लेखनाचे वेगवेगळे फॉर्मस् हाताळले आहेत, विविध माध्यमांसाठी लेखन केलं आहे, आपल्या सोबत मुलांना घेऊन ते पुढे जात आहेत असे काही जाणवत नाही. वानगी दाखल निव्वळ कथा हा प्रकार जरी निवडला तरी मुलांसाठी संवाद कथा, रहस्य कथा, गूढ कथा, प्रवास कथा, विज्ञान कथा, परी कथा, फँटसी कथा, अक्षर कथा, चित्र कथा, विनोदी कथा, जंगल कथा, प्राणी कथा, साहस कथा, रुपक कथा, लोककथा, आठवणीतल्या कथा, व्यक्ती कथा....ही यादी खूप वाढविता येईल ही, प्रश्न असा आहे की, 'आपल्या मुलांना मराठी साहित्यातील विविध प्रकार वाचायला मिळावेत ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे साहित्यिक, एका हाताच्या बोटंावर मोजता येतील इतके तरी आहेत का? आणि नसतील तर का नाहीत?' मराठीत मुलांसाठी संख्यात्मक लेखन करणारे चिक्कार साहित्यिक आहेत. प्रश्न आहे गुणात्मक साहित्याचा!! विंदांची कविता आहे,'माकडाचे दुकान.' त्यानंतर ह्या कवितेची नक्कल करत मग अनेक (महा) कवींनी पोपटाचे दुकान,कोल्हयाचे दुकान,गाढवाचे दुकान अशी आपापली दुकाने थाटली. हॅरी पॉटरला प्रसीध्दी मिळताच एका (महा संख्यात्मक) लेखकाने हरी पाटकर असे पुस्तक लिहिले. नकला केल्याने ह्या साहित्यिकांचं हसं तर होतंच पण वाईट ह्याचं वाटतं की, आपल्या मुलांना हिणकस दर्जाचं साहित्य मिळतं!! बालनाट्य,बालचित्रपट,एकांकीका,एकपात्रीका,द्विपात्रीका,नाट्यछटा,पपेट शो,निबंध हे तर आपल्या मुलांसाठी उपेक्षित साहित्य प्रकार! ह्याचा तर वेगळाच ताळेबंद मांडावा लागेल.
    जेव्हा हॅरी पॉटरच्या पहिल्या पुस्तकाची तडाखेबंद विक्री होऊ लागली,एकाच पुस्तकाच्या दोन कोटी प्रती संपल्या तेव्हा सारेच हादरले! सगळ्यांचे सारेच आडाखे चुकले होते!! काहींना असं वाटत होतं की,'ही पुन्हा पुन्हा घडणारी घटना नसून केवळ मिडियाने घडवलेला हा एक चमत्कारच आहे.' 'एका बैठकीत मुले सातशे पानं वाचतात,ही लोणकढी थाप आहे!'
    आपल्याच डबक्यात रमणाऱ्या आणि त्यालाच विश्व समजणाऱ्या काही बालसाहित्यिकांना असं वाटत होतं की,'ज्या अर्थी आपल्या साहित्याला मुलांकडून मागणी नाही त्याअर्थी संपूर्ण जगात अशीच परिस्थिती आहे.'

    'चोवीस तास काळा चष्मा लावून जग ओळखता येत नाही' अशी एक चिनी म्हण आहे! हॅरी पॉटर हा काही निव्वळ चमत्कार नाही,हे जेव्हा सर्वांना समजू लागलं,त्याची ताकद जाणवू लागली तेव्हा ह्या मातीतली मुलेच विचारू लागली,'आपल्या भाषेत का नाही असा हॅरी पॉटर? केव्हा येणार?' त्यावेळी सगळेच हडबडले!! आणि त्यावेळी दोन पंथ तयार झाले.
    एक,जे हॅरी पॉटरची बालप्रियता आणि लोकप्रियतेचे रहस्य,त्याची शक्तीस्थाने ह्याचा कसोशिने शोध घेऊ लागले. दोन,ज्यांनी काळा चष्मा घातला होता ते विसरुनच गेले की तो आपला चष्मा आहे. त्यांना वाटू लागलं तेच आहेत आापले डोळे!! (ह्या दुसऱ्यंा विषयी लिहून मी माझा आणि तुमचा वेळ बरबाद करत नाही.)

    हॅरी पॉटरची इमारत 'टॉम अॅण्ड जेरी' व 'पॉकेमॉन' च्या मजबूत पायावर भक्कम पणे उभी आहे. लहान मुले टॉम अॅण्ड जेरी अत्यंत आवडीने,तन्मयतेने पाहतात ह्याची चार प्रमुख कारणं असू शकतात. एक,टॉम अॅण्ड जेरी हे त्या मुलांसारखेच छोटे आहेत. त्या मुलांसारखेच ते खोडकर,व्रात्य व उपद्व्यापी आहेत.काही-काही वेळा ते हरतात पण बहुतेक वेळा त्यांचा विजयच होतो. टॉम अॅण्ड जेरी पाहणाऱ्या मुलांच्या बाबतीत सुध्दा काहीसं असंच होत असतं. फक्त फरक इतकाच की, काहीवेळा मुलांचा विजय हा मोठ्या माणसांच्या नजरेतून 'पराजय' असतो. दुसरं कारण म्हणजे टॉम अॅण्ड जेरी हे त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या प्राण्यांना कधीही त्रास देत नाहीत,सतावत नाहीत किंवा त्यांच्याशी झगडत नाहीत.
    टॉम अॅण्ड जेरी हे नेहमीच त्यांच्यापेक्षा शक्तीवान,ताकदवान प्राण्यांशीच भांडतात झगडतात आणि ते ही खुलेआम त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याशी पंगा घेतात.

    ह्यातली सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे टॉम अॅण्ड जेरी हे,त्या मोठ्या प्राण्यांच्या मागे-मागे कधीही धावत नाहीत,त्यांची कधी समजूत काढत नाहीत किंवा त्यांना कुठल्या ही विनवण्या करत नाहीत. पण टॉम अॅण्ड जेरी असे काही उद्योग करतात किंवा त्या मोठ्या प्राण्यांच्या अशा काही खोड्या काढतात की त्या मोठ्या अवाढव्य प्राण्यांना,नाईलाजाने त्या छोट्यांच्या मागे धावावं लागतं! आणि हे छोटे हाती न आल्याने त्यांच्या हुशारीला,त्यांना दाद पण द्यावी लागते. प्रत्येक मुलाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यात 'अगदी असंच व्हावं' असं वाटत असतं!! आपलीच स्वप्नं तो पडद्यावर पाहात असतो. तीसरं कारण अगदी साधं व सरळ आहे. पुढचा प्राणी कितीही मोठा असला,ताकदवान असला तरीही त्याच्यावर मात करण्यासाठी हे टॉम अॅण्ड जेरी आपल्या अक्कल हुशारीचाच उपयोग करतात. त्यांच्या समोरचा प्रसंग कितीही कठीण असो,प्रचंड मोठे संकट समोर असो अशावेळी टॉम अॅण्ड जेरी कधीही वाइट मार्गांचा उपयोग करत नाहीत. लबाडि करत नाहीत. ते त्या संकटातून सहीसलामत सुटतात ते आपल्या हूशारीनेच!! ह्यामुळे मुलांना सहजच जाणवतंतं की 'कुठलीही समस्या जरी असली तरी त्यातून आपण हुशारीने नक्कीच मार्ग काढू शकू!!' चवथं कारण हे सापेक्ष आहे. खूप मुले कार्टून पाहताना अतिशय तन्मय होतात, आजूबाजूच्या जगाचे त्यांना भानच राहात नाही. घरातल्या,शाळेतल्या ताण तणावापासून थोडावेळ तरी मुक्ती मिळावी म्हणून मुलांनी शोधलेला हा उपाय असू शकतो.

    टॉम अॅण्ड जेरी पाहणाऱ्यांचा गट जिथे संपतो बहुधा तिथूनच पॉकेमॉन पाहणाऱ्यांचा गट सुरू होतो.

    ह्या दोन प्रकारात एक महत्वपूर्ण फरक आहे. टॉम अॅण्ड जेरी कुठलेही काम करू शकतात! आणि ते कशाला ही घाबरत नाहीत. उदा. आग,पाणी,वादळ,वीज इ.
    पण प्रत्येक पॉकेमॉनची जशी बलस्थानं वेगवेगळी आहेत तशी त्यांची काही कमकुवत स्थानं पण आहेत. उदा. एका पॉकेमॉनचं आग हे बलस्थान असेल तर तो वादळाला घाबरत असतो. दुसरा वादळांचा बादशहा असतो पण आग पाहताच त्या लोळागोळा होतो. पॉकेमॉनची आणखी एक खासियत म्हणजे,ते मुलांप्रमाणे विकसित होत जातात.
    ह्यामधे जादू आहे,रहस्य आहे! खरं तर ही एक अनोखी फँटसी आहे. आणि ह्या फँटसीतला हा पॉकेमॉन बिलकूल मुलांसारखाच आहे!! 'तुम्ही कार्टून पाहता का?ठ असा प्रश्न जर मोठ्या माणसांना विचारला तर फारच कमी जणं त्याचं उत्तर 'हो' असं देतील. बाकीचे फक्त नाकं मुरडतील. ह्याचं मुख्य कारण म्हणजे, कार्टून फिल्ममधे घडणाऱ्या घटनांचा वेग इतका भन्नाट असतो की, 'पुढच्या क्षणी काय होईल ह्याचा तर्क करणे,मोठ्या माणसांसाठी केवळ अशक्य असते!' पण हीच गोष्ट लहान मुलांसाठी सहज शक्य असते!!

    ह्याची पण दोन कारणं आहेत.

    एक,एखाद्या घटनेचाचा वेध घेत आणि त्यासोबत विविध अंगांनी पण सुसंगतपणे त्याबाबत विचार करण्याची गती ही मोठ्यांपेक्षा लहान मुलांची अधिक असते. किंबहुना वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीशी चटकन समायोजन साधण्याची कला मुलानाच चांगली अवगत असते. दोन,अपेक्षित शेवटाची अपेक्षा करणारी माणसं,कार्टून पाहू शकत नाहीत. अशा माणसांना 'क' पासून सुरू होणाऱ्या मालिका अधिक आवडतात. मोठ्यांच्या मानाने मुलांच्या मनात विशिष्ट घटनांबाबत पूर्वग्रह फारच कमी असतात त्यामुळे साहजीकच त्यंाच्या अपेक्षा ही कमी असतात. मुले गोष्टींना म्हणजेच घटनांना साक्षी राहतात, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय ती घटना समजून घेण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत असतात. खरं सांगायचं तर हीच मुलांची सहजता असते! हॅरी पॉटरमधे हे तर सारं आहेच पण त्याशिवाय आणखी ही अशा काही खुबी आहेत ज्यामुळे सारे चक्रावून जातात. कुठल्याही कथेचा किंवा कादंबरीचा प्लॉट म्हणजे त्याचं शरीर आणि कथाबीज म्हणजे त्याचा आत्मा. हॅरी पॉटरची खासियत म्हणजे,त्याचा प्लॉट हा वास्तवाशी,मुलांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे पण त्याचं कथाबीज ही एक अफलातून फँटसी आहे!! हे अनोखं रसायनंच मुलांना पागल करुन टाकतं.

    कारण,फँटसी आणि वास्तव ह्यातील सीमारेषा ओळखण्याची व इथून तिथे जाण्याची संधी कथालेखीका मुलांना कथेतच देत आहे. हे ह्या लेखीकेचे सर्वात मोठे बलस्थान आहे!
    जगातल्या कुठल्याही मुलाच्या शाळेचे प्रतिबिंब आपल्याला हॅगवॉर्डच्या जादू शाळेत पडलेले दिसते. किंबहुना ही हॅगवॉर्डची शाळा प्रत्येक मुलाच्या शाळेचं प्रतिनिधीत्व करते! तरीही ही शाळा जादू शिकविणारी आणि फँटसी मधली आहे हे विशेष!! गंमत म्हणजे अशा शाळेत घडणाऱ्या घटना,शाळेतील मुलांचे आपापसातील नाते संबंध हे मुलांच्या भावविश्वाशी निगडीत आहेत,मग तो मुलगा जगात कुठेही राहात असो. हॅरी पॉटर हे केवळ स्वप्नरंजन नाही किंवा पलायनवाद पण नाही तर ही एक वैश्विक सदाबहार साहित्यकृती आहे!!

    एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,'मुलांसाठी सहज सोपं लिहिणं, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता स्वच्छं सकारात्मक दृष्टीकोनातून लिहिणं आणि हे लेखन मुलांच्या भावविश्वाशी त्यांच्या रोजच्या जगण्याशी नुसतं संबंधित नाही तर त्यात मिसळून जाणारं असणं...हे सर्वार्थाने कठीण काम आहे!! कठीण आहे कारण,एखादी घटना आपण समजून घेणं आणि त्या घटनेचा मुलाने त्याच्या नजरेतून अन्वयार्थ लावणं ह्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मुलांच्या नजरेतून एखादी गोष्ट पाहणं,त्यांच्या मानसिकतेचा विचार करुन ती समजून घेणं किंबहुना पूर्णत: बालकेंद्री विचार करण्याची ताकद सर्वांजवळ नसते, कठोर परिश्रम करुन ती कमवावी लागते. पण, ही शक्ती प्राप्त झाल्यानंतर त्याविषयी मनात जरा जरी इगो निर्माण झाला,त्याबाबत इवलासा जरी गर्व झाला तरी,प्रचंड परिश्रमाने कमावलेली ही शक्ती क्षणात विरघळून जाते.... .......आणि त्याक्षणी तो लेखक मुलांपासून खूप लांब निघून जातो!! पण जो बालसाहित्यिक आपण कमावलेल्या शक्तीची पुन्हा पुन्हा 'लिटमस टेस्ट' करण्याची हिंमत दाखवतो व रिझल्ट नकारात्मक येईल अशी पुसटशी शंका जरी आली तरी तो स्वत:त सकारात्मक बदल घडवून आणतो; तोच खरा बालसाहित्यक.

    ही 'लिटमस टेस्ट' अगदी सोपी आहे.

    मुलांसाठी काम करणारी, त्यांच्यासाठी लेखन करणारी मोठी माणसं कधीच एकटी एकलकोंडी नसतात. त्यांच्या ह्रदयातलं मूल सदैव जागं असतं, सजग असतं, नवनवीन गोष्टी शिकून घ्यायला उत्सुक असतं. आणि ती मोठी माणसं 'त्या आतल्या मुलाला' साक्षी ठेवून समोरच्या मुलांसाठी काम करत असतात, लिहित असतात. जेव्हा कुणी अनोळखी मुलगा ह्या मोठ्या माणसांना भेटतो तेव्हा तो 'त्या आतल्या मुलाला' ओळखतो, 'त्याला' साद घालतो व 'त्याची ओळख पटली की' तो अनोळखी मुलगा 'त्याच्याशी' बोलू लागतो,मैत्री करतो......त्या मोठ्या माणसाच्या माध्यमातून !!
    तुम्ही अशी “लिटमस टेस्ट” कधी अनुभवली आहे का?

    तुमची लिटमस टेस्ट एखादवेळेस वेगळी असेल किंवा त्याचे रिझल्ट ही वेगळे असतील. पण लिटमस टेस्ट करण्याची हिंमत दाखविणार्‍या मित्रांशी मैत्री करायला मला आवडेल.

    -- राजीव तांबे

      July 23, 2015


  • बालपणातील खुब्याच्या सांध्यांचे विकार

    पूर्वी या सांध्याला प्लॅस्टरमध्ये ठेवावे लागे. आता निरनिराळे स्पिण्टस् पट्टेही उपलब्ध आहेत. बरेच महिने योग्य प्रकारे बांधून ठेवल्यास हे सांधे पुन्हा योग्य प्रकारे तयार होऊन सर्वांसारखे होतात. बरेच महिन्यांनी जर उखळीची वाढ व्यवस्थित होत नसेल तर शस्त्रक्रियाही करतात. जन्मानंतर नाळ कापल्यावर येथे जंतूसंसर्ग होऊ शकतो. हे जंतू जर रक्तावाटे खुब्याच्या सांध्यात गेले तर तेथे पू निर्माण होऊन सांधा दुखू लागतो. याचे निदान त्वरित करून हा पू शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो नाहीतर हा सांधा पूमुळे कायमचा खराब होऊन निखळतो त्यानंतर आयुष्यात याची वाढ खुंटते.

      May 21, 2023


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – अंतिम भाग पंचवीस

    निरोगी कोण ?

    आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
    आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या 'देवदत्त' प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.

    यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.

    जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.

    जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.

    प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
    कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा "नाॅर्मल" वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.

    आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.

    म्हणजे एखाद्याला "तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल " असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.

    पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?

    या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.

    आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
    पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.

    आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?

    सकाळी हलकेच जाग यावी.
    उठल्यावर लगेच "ती" जागा आठवावी.
    पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
    समाधानाची अनुभूती घ्यावी.
    सणसणीत भूक लागावी.
    मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
    दिवसभर गाडी पळवावी.
    तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
    शक्ती पुरवून वापरावी.
    विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
    पुनः भुकेची जाणीव व्हावी.
    हलक्या आहाराने ती पुरी करावी.
    झालेली कामे सहज आठवावी.
    ही ईश्वराची कृपा समजावी.
    आणि मस्त झोप यावी.
    निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
    "तो" मला उठवणार, याची खात्री असावी.
    आणि सकाळी हलकेच जाग यावी.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.04.2017

      April 9, 2017


  • श्रीहरी स्तुति – ३०

    अशा स्वरूपात करीत असलेले आपले ही विवेचन कसे शास्त्रशुद्ध आहे? याचे प्रतिपादन करताना, परमपूज्य जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे उपनिषदाचा आधार घेत आहेत. ते म्हणतात,

      November 20, 2020


  • असा पदर पदर

    असा पदर पदर

    माझं बऱ्याच लग्नसमारंभातून, सोशल गॅदरींगमधून किंवा अशाच काही विशेष घरगुती सोहळ्यांना जाणं होत असतं. बऱ्याच वर्षांपासून मला असं दिसतं की, अगदी फेटेबंद मराठमोळा असलेल्या या कार्यक्रमातून बऱ्याच कुमार-तरुण ललना मला गुजराती पद्धतीची साडी नेसून दिसतात.

      November 2, 2018


  • अधूरी एक कहाणी’

    राधा.. ठाकूर बलदेवसिंगची विधवा सून.. लग्न होउन अजून अंगाची हळदही उतरली नव्हती.. तोवर तिच्या संसारावरच वीज कोसळली.. त्या राक्षसाकडून तिच्या सासरची सारी लोक मारली गेली.. त्यात तिचं कुंकू देखील पुसले गेले.. जन्मभरांच वैराग्य गाठीशी घेउन जगणं नशीबी आलं होतं तिच्या.. पण अशा वैराण वाळवंटात एक सुखद वा-याची झुळूक आली.. जय च्या रुपाने..

    ठाकूरने गब्बरला जेरबंद करण्यासाठी आणलेली दोन माणसे.. त्या दोघातला हा शांत, संमजस, प्रेमळ तरुण.. दोघांची नजरानजर झाली..नजरा झुकल्या.. अनाहुतपणे त्यांचे समोर येणे, बोलणे होत गेले.. ती गार वा-याची झुळूक कुठे तरी आतपर्यंत तिला स्पर्शून गेली.. हे चूक आहे, समाज मान्य नाही, हे ठाउक असूनही.. दोघे नकळतपणे एकमेकांकडे आकर्षिले गेले.. वाळवंटातली ही हिरवळ सुखद वाटून गेली.. रोज संध्याकाळी सुर्य मावळताना तो तिथे बसायचा.. त्या आउटहाउसच्या पाय-यांवर.. रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळीही तो बसून असायचा.. आपल्या माउथ आॕर्गनवर तीच धून वाजवायचा.. त्याचवेळी राधा पहिल्या मजल्यावरच्या उभी असायची..
    व्हरांड्यातले कंदील लावत असायची वा मालवत असायची.. जयच्या त्या धूनमधे एक अनाम वेदना होती..एक आर्त हाक होती..

    ती हाक जणू राधासाठीच होती..तिचे काळीज विदीर्ण करायची.. पण समाजाच्या बंधनांना तोडून ती कशी जाणार..? पण..असेच होते सारे.. नजरेनेच केलेले प्रश्न..नजरेनेच दिलेली उत्तरे.. आणि ती काळजात आरपार जाणारी धून.. बस्स..एवढच त्या अबोल प्रेमाच्या नशीबी होतं.. कारण.. या कहाणीचा अंत आधीच ठरला होता.. जय शेवटी म्हणतो तसं.. 'हे कहानी भी अधूरी रह गई....'
    'शोले' मधली जय-राधाची अधूरी राहून गेलेली ही प्रेमकहाणी.. समस्त भारतीय फिल्म प्रेमींची जणू दुखती रग आहे.. जयच्या मृत्युचा इतका त्रास होत नाही हो.. पण 'राधाला ही जन्मभराची शिक्षा का?' हा प्रश्न मात्र घोर लावून जातो.. राधा आणि जयचे या अबोल प्रेमाचे प्रतीक म्हणजे 'ती' धून. पंचमदा साठी ती वाजवली हार्मोनीका स्पेशालीस्ट भानू गुप्तांनी. भानूदांनी ही धून आपल्या हार्मोनीकाने अजरामर केलीय.. कश्मीर ते कन्याकुमारी कुठेही आर.डी. बर्मन नाइट असेल किंवा हार्मोनीका/माउथ आॕर्गन महोत्सव असेल..
    गेला बाजार ट्रेन मधे, मेट्रोमधे, बसेस मधे... तुम्हाला कुठेना कुठे ही धून वाजताना दिसेल.. कुठेही ऐका.. पहिली लकेर येताच दाद घेणारी धून आहे ही.. आमिताभनी अलिकडे एका मुलाखतीमधे सांगीतले होते.. जय ती हार्मोनीका वाजवताना राधा दिवे मालवत जाते तो सीन.. परफेक्ट शाॕट साठी रमेश सिप्पी आणि सिनेमॕटोग्राफर व्दारका व्दिवेचा यांनी तब्बल तीन वर्षे वाट पाहिली...

    त्यांना जो नैसर्गिक प्रकाश हवा होता त्यासाठी.. एका सीनसाठी केलेली किती ही धडपड..? पण म्हणूनच पहाना.. एक अजरामर सीन बनून गेला..!! या हार्मोनीका धूनला शोलेची 'लव्ह थीम' म्हणून संबोधले जाते.. पण मला वाटते ही खरे तर एक 'विरह थीम' आहे..
    जय आणि राधा च्या अबोल प्रेमाचे ते सारे कंदिल दिवे.. हळू हळू मालवत जाणारी.. अन.. शेवटी राधा आणि तिचा विरह, एवढेच मागे ठेउन जाणारी..

    -सुनिल गोबुरे

      April 16, 2023


  • “परी नेत्र रूपे उरावे”

    लेखकाने किंवा कवीने निसर्गाचे किंवा चित्राचे तसेच पदार्थाचे सोप्या भाषेत वर्णन केले असले तरी एखाद्या अंध व्यक्तीने ती गोष्ट आपल्या डोळ्यांनी जन्मताच बघितली नसेल अनुभवली नसेल ते फिलिंग नसेल तर त्या वर्णनाचा काय अर्थ आहे? ज्या व्यक्तीला दिसत होते पण अचानक अपघातात दृष्टी गेली तर त्या व्यक्तीला दैनंदिन जीवन जगताना त्या आठवणीने किती यातना होतील? जीव किती कासावीस होईल याचा विचारच करवत नाही. पाच मिनिटे लाईट (वीज) गेले तर आपली काय अवस्था होते ते सर्वांनी अनुभवले असेल ! खेळात आंधळी कोशिंबीर खेळतांना अनुभव घेतला असेल !

      July 4, 2011