वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दिनांक २७ जुलैला संध्याकाळी, टीव्हीवर आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या निधनाची दु:खद बातमी ऐकली आणि मन विषण्ण झाले. त्यांची आणि माझी मैत्री गेल्या ५२ वर्षांची! माझ्या मनात, डॉ. कलामांच्या अनेक आठवणी दाटून आल्या.
January 28, 2024
जया नावडे नाम त्या येम जाची | विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची |
म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे | मुखे बोलता दोष जाती स्वभावे ||101||
अती लीनता सर्वभावे स्वभावे | जना सज्जनालागि संतोषवावे |
देहे कारणी सर्व लावीत जावे | सगूणी अती आदरेसी भजावे ||102||
हरीकीर्तने प्रीति रामी धरावी | देहेबुध्दि नीरूपणी वीसरावी |
परदव्य आणीक कांता परावी | यदर्थी मना सांडि जीवी करावी ||103||
क्रियेवीण नानापरी बोलिजेते | परी चित दुश्र्चित ते लाजवीते |
मना कल्पना धीट सैराट धांवे | तया मानवा देव कैसेनि पावे ||104||
विवेके क्रिया आपुली पालटावी | अती आदरे शुध्द क्रिया धरावी |
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा | मना कल्पना सोडि संसारतापा ||105||
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा | विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा |
दया सर्व भूती जया मानवाला | सदा प्रेमळू भक्तीभावे निवाला ||106||
मना कोप आरोपणा ते नसावी | मना बुध्दि हे साधुसंगी वसावी |
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी | मना होइ रे मोक्षभागी विभागी ||107||
सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे | क्रिया पालटे भक्तीभावर्थ लागे |
क्रियेवीण वाचाळता ते निवारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||108||
जनी वादवेवाद सोडूनि द्यावा | जनी सूखसंवाद सूखे करावा |
जगी तोचि तो शोकसंतापहारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||109||
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे | विवेके अहंभाव याते जिणावे |
अहंतागुणे वाद नानाविकारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||110||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 10, 2016
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. बालसाहित्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहेच, पण अनिल अवचटांसारख्या समाजकार्यात रमलेल्या लेखकाच्या वेगळ्या प्रयत्नाला मिळालेली दाद म्हणूनही या पुरस्काराचे मोल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बालसाहित्याकडे वळलेल्या आणि कसदार साहित्य निर्मिती करणार्या डॉ. अवचटांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेले कौतुक.
September 8, 2010
बटाटा हा भारतामध्ये कधीच नव्हता. बटाट्याचे पीक स्पेनमध्ये येत असे व त्याला बटाटा असे म्हणत असत. स्पेनवरून हे पीक ब्रिटनमध्ये अगदी पहिल्या प्रथमआले आणि मग ते बटाटा जगभर पसरला. साधारण १६व्या शतकात पोर्तुगालने बटाट्याला यांनी पहिल्या प्रथम भारतात आणले. बटाटा हे पीक दर वर्षी घेता येते.
December 6, 2023
एकदा पेनसिल्व्हेनीयामधे असताना, आमच्या लॅबमधल्या टेरा नावाच्या एका टेक्नीशियन मुलीच्या लग्नाला जाण्याचा योग आला. तिचं गाव पेनसिल्व्हेनीया आणि न्यूयॉर्क या राज्यांच्या सीमेजवळ, न्यूयॉर्क राज्यात होतं. न्यूयॉर्क राज्याचा वरचा बराचसा भाग डोंगर, झाडी, शेती आणि कुरणांनी भरलेला असून हा भाग शेती आणि डेअरीसाठी प्रसिद्ध आहे. टेराच्या गावाला जायचा रस्ता असाच गर्द झाडीने भरलेल्या टेकड्यांमधून जाणारा होता. मधे मधे मोकळ्या जागेत, दुधाळ गाई लुसलुशीत गवतावर चरत होत्या. अधे मधे छोटी छोटी गावं लागत होती. टेराचं गाव देखील ४००-५०० वस्तीचं. गावातलं पांढरं सुबकसं चर्च चक्क एका मक्याच्या शेतात होतं. आजूबाजूला कापलेल्या मक्याचे खुंट शेतातून दिसत होते. चर्चमधे जेमतेम ६०-७० लोकांना दाटीवाटीने बसायला जागा. कसलं भव्य दिव्य वास्तूशिल्प नाही, प्रचंड मोठे घुमट आणि नक्षीदार कमानी नाहीत किंवा डोळे खिळवून ठेवेल असं रंगीत काचेरी कोरीव काम नाही. साधासा एक क्रॉस भिंतीवर लटकवलेला. मंद मेणबत्त्यांच्या उजेडात उभी असलेली फादरची गंभीर मूर्ती, खिडक्या-दारांतून येणारा बाहेरचा शेताचा, गवताचा वास, दूर अस्पष्टपणे ऐकू येणारं गायींचं हंबरणं आणि ट्रॅक्टरचा आवाज. अस्सल खेडवळ वातावरणातलं ते छोटंसं चर्च, लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग बनून, त्यांच्या आयुष्याला आकार देत होतं.
आयोवातल्या सू सेंटरला आल्यावर, ६००० वस्तीच्या त्या छोट्याश्या गावात फेरफटका मारताना, खूपशी चर्चेस बघून मी आश्चर्यचकित झालो. हळू हळू तिथल्या वास्तव्यात, गावात एकूण १६ चर्चेस आहेत असं समजलं. ही चर्चेस न्यूइंग्लंडमधल्या ठरावीक धाटणीच्या चर्चेसपेक्षा खूपच वेगळी वाटत होती. एकतर ही चर्चेस खूपच मोठी होती. त्यांची बांधणी देखील एखाद्या आधुनिक इमारतीसारखी होती आणि त्यांची प्रांगणे देखील प्रशस्त होती. सू सेंटर आणि बाजूचं ऑरेंजसिटी ही दोन्ही प्रामुख्याने डच लोकांची गावं. आजूबाजूला देखील डच लोकांचं प्राबल्य. त्यामुळे बहुतेक सारी चर्चेस ही Reformed churches. त्यात देखील नाना प्रकार. उदाहरणच द्यायचं झालं तर सू सेंटरमधील वेगवेगळ्या चर्चेसची यादी देता येईल - फर्स्ट रिफॉर्मड् चर्च, फ्रि ग्रेस रिफॉर्मड् चर्च, हेरीटेज रिफॉर्मड् कॉंग्रिग्रेशन, होप लुथर्न चर्च, नेदरलॅंड रिफॉर्मड् चर्च, न्यू लाईफ रिफॉर्मड् चर्च, पीस लुथर्न चर्च, युनायटेड रिफॉर्मड् चर्च, बेथल ख्रिश्चन रिफॉर्मड् चर्च, कव्हेनंट ख्रिश्चन रिफॉर्मड् चर्च, फेथ ख्रिश्चन रिफॉर्मड् चर्च, फर्स्ट ख्रिश्चन रिफॉर्मड् चर्च, ख्राईस्ट द किंग कॅथलिक कम्युनिटी चर्च, ख्राईस्ट कम्युनिटी चर्च, कॉर्नर स्टोन रिफॉर्मड चर्च आणि सेंट्रल रिफॉर्मड चर्च.
सू सेंटरमधली चर्चेस भली मोठ्ठी. ही चर्चेस म्हणजे फक्त धार्मिक प्रार्थनास्थाने नसायची. प्रत्येक चर्चमधे मोठमोठी सभागृहे, बर्याच खोल्या व इतर सोयी असायच्या. त्यांचा उपयोग community centres म्हणूनच अधिक व्हायचा. सगळे वरवर ख्रिश्चनच असले तरी प्रत्येकाचा आपल्या पंथाच्या किंवा चर्चच्या वेगळेपणाबद्दल ठाम विश्वास. इतर वेळी एकत्र येणारे सारे जण आपापल्या चर्चच्या घुमटाखाली एकत्र आले, की इतरांच्या चर्चेसना नाक मुरडणार. एकाच चर्चमधे जाणार्या लोकांच्यात जवळीक निर्माण व्हावी यात काही नवल नाही. मग अगदी मुलांमधे किंवा तरुणांमधे देखील ही चर्चेसची भाऊबंदकी रुजवली जाते. मग आपल्याच चर्चमधे जाणार्या मुलांशी खेळणे, आपल्याच चर्चच्या तरुणांबरोबर सहलीला जाणे वगैरे प्रकार सर्रास चालतात. आपल्या चर्चबांधवांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे ओघाने आलेच. मग नोकरी शोधणार्या कुण्या सोम्यागोम्याचा चुलत मेव्हणा जर तुमच्या चर्चमधे जात असेल, तर नोकरी मिळण्यासाठी एक मोठ्ठं qualification होऊन जातं.
सू सेंटरमधे आम्ही आणि आमच्या सहा महिने अगोदर आलेले सोळंकी अशी दोनच भारतीय कुटुंबं. मोठाल्या शहरांमधे, विविध देशांतल्या लोकांचा संपर्क येऊन, तेथील स्थानिक अमेरिकन्सच्या अनुभवाच्या कक्षा थोड्या विस्तारलेल्या असतात. परंतु मिडवेस्ट मधल्या छोट्या गावांत, तसे दुसर्या देशातून आलेले लोक विरळाच. त्यात काही असलेच तर मेक्सिको, कोलंबिया, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, कोस्टारिका वगैरे मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील देशांतून आलेले. बहुतांशी कॅथलिक. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत स्पेनने आपले साम्राज्य स्थापन केल्यावर, आपली भाषा आणि आपला कॅथलिक धर्म मोठ्या जबरदस्तीने स्थानिक जनतेवर लादला. एक ब्राझीलचा अपवाद वगळता (जो पोर्तुगीजांच्या अमलाखाली असल्यामुळे तिथे पोर्तुगीज भाषा रूढ झाली), सार्या मध्य आणि दक्षिण अमेरिकन देशांत, भाषा आणि धर्म हे समान धागे निर्माण झाले. त्यामुळे मिडवेस्टमधल्या छोट्याश्या गावात, मेक्सिकन लोकांसारखे दिसणारे, गव्हाळ वर्णाचे, काळ्या केसांचे, मध्यम चणीचे भारतीय आणि त्यात हिंदू म्हणजे अपूर्वाईची गोष्ट. सुरवातीला बरेचदा, कुठे रस्त्यावर किंवा दुकानात, एखादा मेक्सिकन आमच्या जवळ येऊन ‘होला’ (स्पॅनिश भाषेतलं “हॅलो”) म्हणून संबोधायचा आणि स्पॅनिशमधे वचावचा बोलायला सुरुवात करायचा. आम्ही गोंधळून अजागळासारखे त्याच्या तोंडाकडे बघायचो आणि मग, आम्ही “इंडियन, नो स्पॅनिश” असं सांगितल्यावर, तो चालू लागायचा.
-- डॉ. संजीव चौबळ
April 21, 2016
आपल्या भारत देशाला सर्वात जास्त जर, कुणी डिवचले असेल तर ते फक्त अतिरेकी कारवायांनी ! मग ह्या कारवाया दहशतवाद्यांचा असोत की नक्षलवाद्यांच्या भारताचे यामुळे फार मोठे नुकसानच झालेले आहे. भारताचे नुकसान अंतर्गत कलहाने जेवढे झाले नाही. तेवढे या कारवायांमुळे झालेले आहे.
October 26, 2010
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 13-पुष्प पहिले
तिलक लावल्यावर पुष्प देऊन स्वागत केले जाते. जसे व्यासपीठावरील पाहुण्यांचे, तसेच देवाचे पण !
यथा लाभोद्भव, कालोद्भव, सुगंधीत पुष्पं समर्पयामी । असं सांगून फुलं वाहिली जातात. "माझ्या शक्तीनुसार, ऋतुनुसार, जी काही शक्य होती ती सुगंधित फुले आणून, ती मी तुला वाहातो आहे, ती तू मान्य करून घे. आणि याच्या सुवासाने नेहेमी प्रसन्न रहा."
हे कोणाला उद्देशून सांगायचं? ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याला ? की, सृष्टीमधे फुलं निर्माण करणाऱ्याला ? की फुलांमधे सुगंध घालणाऱ्याला ? की एवढी किमया जो करू शकतो त्याला ? या सगळ्या उपचाराची आणि चार दोन फुलांची त्याला आवश्यकता असेल ? नक्कीच नाही. ही विनंती, प्रार्थना या सौंदर्याचा उपभोग घेणाऱ्यांसाठी आहे.
तुझेच तुजला अर्पण, हा भाव ठेवून हा पुष्पालंकार देवाला वहायचा.
विविधता म्हणजे काय हे ते या फुलांकडून समजून घ्यावे. त्यांचे रंग, सुवास, उमलण्याच्या वेळा, टिकून रहाण्याचे सामर्थ्य, पुनः नवनिर्मितीसाठी माता होऊन, फळात रूपांतरीत व्हायचं, सारंच अद्भुत !
हे सारं "तो" कोणासाठी करतोय ?
फक्त मानवासाठी करीत असेल तर जिथे मानव नाही, अशा ठिकाणी देखील फुले बहरत असतातच की ! पशु पक्ष्यांसाठी ? त्यांच्यासाठी पण नाही. कारण त्यांना तशी सौंदर्यदृष्टी नाही. काहीजण त्यातील फक्त मध घेतात, काहीजण पायाखाली तुडवून जातात.अत्यंत स्वार्थी आणि अरसिक !
मग ही अलौकिक पुष्प निर्मिती कोणासाठी ?
त्याच्या स्वतःसाठी !
त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी !
कोणी पाहो अथवा न पाहो....
तिथे कुणी येवो वा न येवो.....
देवाच्या चरणावर जावो अथवा सरणावर..
झाडावरच झुरायचे की कुठेतरी दूर जात लहरायचे....
औषधे टिकवण्यासाठी आंबवून घ्यायचे की गजऱ्यात जावून बसायचे....
गंधाने ओथंबून जायचे की गंध दिला नाही म्हणून अबोलीच रहायचे ....
प्रेमिकेसाठी पलंगावर पहुडायचे की गणिकेसाठी मनगटात जायचे....
काट्यावर उमलायचे की पाण्यावर डुलायचे...
उन्हात तापत गुलकंद होऊन घ्यायचे,
की
पाण्यात पडून पाणी सुगंधीत करायचे...
फुल होऊन फुलांकडे पहायचे....
आणि
प्रत्येक क्षणाला त्याला स्मरायचे !
या साऱ्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे. स्वतःला आनंद व्हावा, असं प्रत्येकालाच वाटतं, कारण प्रत्येकामधेच तो भरून राहिला आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.06.2017
June 6, 2017
जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे अलीकडेच निधन झाले. आयुका या विख्यात संस्थेची वास्तू ही चार्ल्स कोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. या निमित्ताने आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा. जयंत नारळीकर यांचा चार्ल्स कोरिया यांच्याशी निकटचा संबंध आला प्रा. नारळीकरांनी लेखणीबद्ध केलेल्या, चार्ल्स कोरिया यांच्या या काही आठवणी.
February 9, 2024
2011 मध्ये काँग्रेस सरकार असताना त्यांनी लक्ष्मीचंद जैन यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्म विभूषण दिले, हे तेच लक्ष्मीचंद जैन होते ज्यांनी स्वतःच्या देशाविरोधात आणि सरकारविरोधात राजदूत असताना देशाने अणूचाचणी घेतली म्हणून भूमिका घेतली होती.
October 29, 2018
दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देश पर्यटनासाठी लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी व्हिएतनाम हा देश विशेष वेगळेपण घेऊन उभा आहे. येथे एकीकडे हिरवीगार भातशेती, उंचसखल डोंगररांगा, मोहक समुद्रकिनारे तर दुसरीकडे आधुनिक शहरे, गजबजलेली बाजारपेठ आणि रंगीबेरंगी संस्कृती पर्यटकांना आकर्षित करतात. भारतीय प्रवाशांसाठी व्हिएतनाम हा तुलनेने किफायतशीर, जवळचा आणि सहज व्हिसा मिळणारा देश असल्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
April 17, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti