(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही-भाग अकरा

    आयुर्वेदीय औषधांना लवकर गुण का येत नाही ?

    इंग्लिश औषधांप्रमाणे आयुर्वेदीय औषधांना झटपट गुण दिसत नाही, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वेधन, अग्निकर्म, यासारख्या काही चिकित्सा इतक्या जलद काम करतात, की अॅलोपॅथीमधील, कोणतेही वेदनाशामक वा भूल देणारे द्रव्य देखील एवढ्या जलद काम करत नसावे. आश्चर्य वाटण्याएवढ्या चमत्कारिक चिकित्सा ग्रंथात वर्णन केल्या आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव जवळच्या वैद्याकडून घेणे महत्त्वाचे आहे.

    आयुर्वेद म्हणजे एक जीवनप्रणाली असल्याने, त्यात औषधांपेक्षा, आहार विहार जास्ती महत्त्वाचा ! तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आधीच पाणी शोधून ठेवावे, तसे रोग झाल्यानंतर उपाय शोधत बसण्यापेक्षा, रोग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगणारे हे शास्त्र !

    आयुर्वेद ही कोणतीही 'पॅथी' नाही. हे पुनः एकदा लक्षात घ्यावे. त्यामुळे 'औषधे' हा चिकित्सेतील गौण भाग आहे. औषधे ही पूरक म्हणून वापरली जातात. ( तशी वापरली जावीत. )

    जसजसा काळ बदलत गेला तसे आयुर्वेदातील औषधांमधे भर पडत गेली. सुरवातीला केवळ वनौषधींनी समृद्ध असलेली ही संपदा रसौषधींनी आणखीनच बहरत गेली. शरीरातील दोष ( पंचकर्माचा वापर करून ) काढून टाकून नंतर औषधांचा वापर केला गेला तर औषधे कमी पुरतात, हे अभ्यासले गेले. किंवा औषधे पुनः लागतच नाहीत, हे पण लक्षात आले. आणि रोग पुनः उद्भवू नयेत, यासाठी आहारविहारातील पथ्यापथ्य सांगितले गेले. व्यवस्थित पथ्यापथ्य पाळले तर औषधांची गरज कमी होते.

    औषधे मग ती कोणत्याही पॅथीची असोत, ती विकतच घ्यावी लागतात, दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. पण पथ्यापथ्याचे तसे नसते. माझा माझ्या मनावर विशेषतः जीभेवर संयम आणता आला की, बाहेरील अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत नाही. बाहेरील सर्व परिस्थितीवर मनःस्थितीने नियंत्रण आणता येते.

    काही वेळा औषधांची मात्र कमी पडते, काही वेळा अनुपान चुकते. अनुपान म्हणजे औषध ज्याच्या बरोबर घ्यायचे ते द्रव्य. अनुपानासोबत जर औषध घेतले की औषधांची क्षमता वाढते. आजच्या भाषेत सांगायचे तर कॅटेलिस्ट. जसे, कफाच्या आजारात मधासोबत, पित्ताच्या आजारात तुपाबरोबर, आणि वाताच्या आजारात तेल हे पूरक औषध म्हणून वापरले तर रोगाची लक्षणे झपाट्याने कमी होताना दिसतात. काही वेळा तर औषधांची गरजच उरत नाही, अनुपान हेच औषध ठरते. पित्तामुळे डोके दुखते, या आजारात केवळ सकाळी रिकाम्या पोटी तूप खाऊन वर दोन घोट गरम पाणी पिणे, हा घरगुती उपाय देखील चमत्कार घडवतो. (तूप म्हणजे गाईचे. आणि गाय म्हणजे भारतीय, हे पण विसरायचे नाय्ये हं. ) प्रकृतीनुसार किती काळपर्यंत हे घृतपान सुरू ठेवावे लागेल, याचा सल्ला अर्थातच वैद्य चांगला देऊ शकेल. { वैद्य म्हणजे सरकारी नोंदणीकृत आयुर्वेद पदवीधारक, ज्याचा अनुभव आणि ग्रंथाचा अभ्यास देखील उत्तम आहे, असा आप्त (आप्त म्हणजे ओळख असलेला, घरचा. पैशासाठी औषधांचा व्यापार न करणारा ) ही व्यक्ती देखील योग्य सल्ला देऊ शकतो. आज हे मुद्दाम सांगावेसे वाटते कारण वाॅटसपच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे असे आरोग्याचे संदेश देणाऱ्या स्वयंघोषित वैद्यांचे पेव खूप आलेले आहे. त्यात विश्वास कसा आणि कोणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मग तो नागरमुन्नळीचा असो वा मुरगुडचा, कोल्हापूर सारख्या शहरातला असो वा अन्य कोणत्याही खेड्यातला. }

    आपली प्रकृती काय आहे, कोणते औषध, कोणते अनुपान, किती दिवसांसाठी, कधी घ्यायचे आहे, त्याचे पथ्यापथ्य काय आहे, हे हे जाणकार वैद्यच चांगलं सांगू शकेल ना !

    नाहीतर घेतलेल्या औषधाचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी पुनः दुसरा वैद्य असे व्हायला नको !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    29.04.2017

      April 29, 2017


  • आत्मपूजा उपनिषद : ३ : निःसंशय जाणणं हेच आसन !

    आत्मपूजा उपनिषदाचं हे सूत्र सांगतं की नि:संशय जाणणं  हेच आसन !  फक्त तीन शब्दात पातंजलीच्या संपूर्ण अष्टांग योगाला, हे एकच सूत्र पार करून जातं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी; असा उभा जन्म जाईल इतका आणि क्लेशदायी प्रवास करण्यापेक्षा; फक्त ठामपणे स्वतःला जाणलं आणि त्यावर स्थिर राहिलं की विषय संपला !

      January 3, 2020


  • दीपीका पदुकोन आणि गुंतवणूक

    विजय मल्ल्या यांची " किंगफिशर एरलाइन" एकदम फॉर्म मधे असण्याचा तो काळ होता . त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खुष होते . त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेकजण देत होते . मी मात्र त्याच्याशीबिलकूल सहमत नव्हतो . मला माझे अनेक मित्र - सहकारी - वाचक - श्रोते ते शेअर्स तेंव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा , अगदी सतत , विचारत होते . आणि मी " माझे मत तरी नाही असॆ आहे . याउपर पैसे आणि निर्णय तुमचाअसल्याने खरेदी करायची तर करा " असे उत्तर देत असे .

    त्यावर वैतागून एकदा माझ्या तरुण सहकाऱ्यांनी मला घेरावच घातला . " मी किंगफिशर बाबत पूर्वग्रहदूषित आहे का ? " , " विजय मल्ल्या मला आवडत नाहीत का ? " " त्यांनी मला किंगफिशर चे प्रसिद्ध कॅलेंडर दिले नाही का ? " "आणि म्हणून मी किंगफिशर चे शेअर्स घेऊ नाहीत असे सांगतो का ? " अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली . मी हसून वेळ टाळण्याचा खूप प्रयत्न केला . पण ते काही पिच्छा सोडेनात . त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितले की मला हे शेअर्सखरेदियोग्य वाटत नाहीत . त्यांनी त्यामागचे कारण विचारले . तेंव्हा मी त्यांना म्हणले की तुम्ही पेपर्स वाचत नाही का ? वर्तमानपत्राचा कोणता भाग हा त्यावर त्यांचा पुढचा प्रश्न . " सीने जगताविशयि ची पाने " या माझ्या उत्तराने त तरअक्षरशः चक्रावले . तेंव्हा एक सुप्रसिद्ध सीने अभिनेत्री आणि किंगफिशर च्या विजय मल्ल्या यांचा मुलगा यांच्या " मैत्रीची " चर्चा रंगात होती .

    माझ्या आधीच्या उत्तराने गोंधळून गेलेल्या तरूण सहकाऱ्यांना त्याचा संदर्भ देत मी म्हणले की " माझा त्या अभिनेत्री वर जास्त विश्वास आहे . तिचे आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे बिनसले अशी काही वर्तमान पत्रात बातमी फिरत आहे . हेबिनसन्याचे खरे कारण काही वेगळे असेल ; पण त्याचा एक अर्थ आता किंगफिशर मधे Profitability ही राहिली नसावी आणि Liquidity ही राहिली नसावी . किंवा तीला ही मंडळी संबंध राखण्याजोगि वाटली नसावी . ही अभिनेत्री इतकीसमन्जस , हुशार , चाणाक्ष आहे की मला तिच्या gut फीलिंग बद्दल खात्री आहे . त्यामुळे मला या समूहातील कंपनीचे शेअर्स खरेदियोग्य वाटत नाहीत . "

    माझ्या या उत्तराने माझ्या सहकार्यान्चे समाधान झाले की नाही आणि त्यांनी किंगफिशरच्या शेअर्सची तेंव्हा खरेदी केली की नाही हेही मला माहीत नाही .

    पण अशा बादरायण कारणातून आपण आपल्या गुंतवणूकीबाबत निर्णय घेऊ शकतो . असे अपारंपारीक घटक, अप्रचलित अशी विश्लेषणाची तर्हा अनेकदा फार उत्तम संदर्भ ( आपल्या सोप्या मराठीत Clues हो ) देऊन जातात . आपणत्यांचा योग्य आणि वेळच्या वेळी उपयोग करण्याचे धाडस दाखवतो का हा खरा प्रश्न आहे .

    असा काहीसा अपारंपारीक विचार आपल्या गुंतवणुकीबाबत करायचा झाला तर आपण प्रसिद्ध सीने अभिनेत्री दीपीका पदुकोन सारखे असावे असे मला अनेकदा वाटते . आजपर्यंत प्रसार - माध्यमांनी तिचे नाव निहार पंड्या ते रणवीर सिंगपर्यंत कितीजणांशी जोडले . पण ते खरे आहे की खोटे याबाबत ती कधीही एक चकार शब्द जाहीरपणे बोलत नाहि . तिचा हा संयम आपण आपल्या गुंतवणुकीला उपयोगात आणू शकू का ? जर हे खरे आहे असे क्षणभर मानले तर इतक्यामोकळेपणाने आपण गुंतवणूकीची इतकी साधने उपलब्ध असतात त्यांचा साधक - बाधक विचार करतो का ?

    दीपीका पदुकोन आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण आणि मग विभक्त होणे याचीही चर्चा प्रसार - माध्यमात रंगली होती . पण त्याचा परिणाम स्वतःच्या कारकीर्दीवर होऊ न देण्याची खबरदारी दीपीका पदुकोन ने उत्तम प्रकारे घेतली .अगदी रणबीर कपूर बरोबरच्या सिनेमात काम करतांनासुध्दा . यांतून योग्य तो बोध घेत आपले भावनिक विश्व आणि व्यावसायिक निर्णय यांत गल्लत न करण्याची व्रुत्ती आपण अंमलात आणणार का ? एकंदरीतच व्यावसायिक क्षेत्रात ,आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत होण्यासाठी या गुणांची अत्यंत आवश्यकता असते .

    दीपीका पदुकोन या अभिनेत्रीचा गुंतवणूक क्षेत्रासंबंधी विचार करावा असे मला वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही काळापूर्वी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्याचे अनुचित चित्रण एका नामांकीत चित्रं - वाहिनिने केले .दीपीका पदुकोन सिनेस्रुश्तित कार्यरत असूनही तीने त्या वजनदार समूहांच्या वाहिनीला ज्या पध्दतीने फैलावर घेतले त्याला तोड नाही . असे वागायला धाडस लागते . स्वतःच्या decency ची चाड लागते . आणि प्रचंड आत्मविश्वास आणिस्वतःच्या हक्कांविशयी जागरूकता लागते . आपण गुंतवणूकदार अशी जागरूकता , धाडस , आत्मविश्वास आपल्या गुंतवणूकदार म्हणून असणाऱ्या हक्कांबाबत कधी दाखवणार ?

    दीपीकाने अगदी अलीकडे अतिशय मोकळेपणाने तिला आलेल्या औदासिन्याबाबत ज्या पध्धतिने चर्चा केली ते तर केवळ स्तिमित करणारे आहे . अतोनात मनोबल हवे त्यासाठी ! आपण गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणूकीबाबत विचारकरतांना इतक्या मोकळेपणाने निदान विचार , अगदी स्वतःशीच तरी करू शकतो का ? करतो का ? त्याची आवश्यकता सतत जाणवत असताना तरी ? कारण गुंतवणूक क्षेत्र , त्यातही विशेषतः शेअर - बाजार हे क्षेत्र असे आहे की तिथेभल्या - भल्यान्चे निर्णय चुकू शकतात . अशा चुकलेल्या निर्णयाने आर्थिक नुकसान ही होऊ शकते . तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य लहान गुन्तवनुकदारान्ची अशी आर्थिक क्षमता मुळातच बेताची असते . त्यामुळे असा धक्का सहनकरणे कठीण जाते . पण अनेकदा आपण त्यातच गुरफटून पडतो . दीपीका ने जाहीरपणे स्वतःच्या डिप्रेशनची कबूलि दिली . अगदी तीही आपणहून . आपण निदान स्वतःशीच ते मान्य करून आपला निर्णय दुरुस्त करणार की नाही ? तसेचअशी चूक आपल्या हातून पुन्हा होणार नाही अशी खबरदारी बाळगणार ना ?

    दीपीका जशी स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेत सहजतेने पेश करत राहते आणि तरीही ती कधीही cheap वाटत नाही ; तसे आपण गुंतवणूक क्षेत्राची स्थिति काहीही असली तरी स्वतःला सावरून घेतो का हाही एक प्रश्नच आहे नाहीका !

    प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या हातून काही महिन्यान्पुर्वी पारितोषिक स्वीकारताना दीपीका ने तिचे वडील नामवंत खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी तीला लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते . अशी आचार - संहिता आम्ही आमच्या गुंतवणुकीला लावूशकलो तर ?

    दीपीका , तुझे हे रूप पाहिले ना की तू भारतीय बॅडमिंटन चा पहिला चम्पियन , ऑल इंग्लेंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय सुस्वभावी प्रकाश पदुकोन ची मुलगी आहेस हे मनोमन सुखावत राहते . अशी पिढीजात सम्रुध्धीआमच्या वाट्याला आमची पुढची पिढी आणि गुंतवणूक क्षेत्र . . . .

    दीपीका , तू माझी आवडती अभिनेत्री असण्यात तुझ्या अभिनय - सौंदर्य - व्यक्तिमत्व याच्या बरोबरीने याही गुणांचा समावेश आहे ग ! आणि म्हणून तर तुझी तुलना आपल्या गुंतवणूक क्षेत्राशी करण्याचा मोह आवरता नाही आला मला.

    चंद्रशेखर टिळक
    ४ सप्टेंबर २०१६ .

    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-mail . . . tilakc@nsdl.co.in

      September 30, 2016


  • ऑक्टोबर ०९ – मियाँ जावेद, मि. पीटर आणि लॅम्बचा तडाखा

    ९ ऑक्टोबर १९७६ हा दिवस प्रतिस्पर्धी संघांमधील दोन कसोटीपदार्पणवीरांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला.

      October 5, 2010


  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ३

    समस्तलोकशङ्करंनिरस्तदैत्यकुञ्जरं !
    दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् !!
    कृपाकरं क्षमाकरं
    मुदाकरं यशस्करं !
    मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् !! ३!!

    समस्तलोकशङ्कर- शम् म्हणजे कल्याण. ते कल्याण जे करतात ते शंकर. समस्त लोक अर्थात सर्व लोकांचे किंवा सर्व विश्वाचे कल्याण करतात म्हणून मोरयांना समस्तलोकशङ्कर असे म्हणतात.

    निरस्तदैत्यकुञ्जर- कुंजर म्हणजे हत्ती. दैत्यकुंजर अर्थात हत्तीप्रमाणे अत्यंत बलशाली असणारे दैत्य.
    भगवान श्रीगणेश आणि आपल्या विविध अवतारात देवांतक- नरांतक, सिंधू, सिंदुर, कमलासुर इ. अनेक राक्षसांचा निःपात केला. त्यामुळे त्यांना निरस्तदैत्यकुञ्जर असे म्हणतात.

    दरेतरोदर- दर शब्दाचा अर्थ आहे घट्ट. मजबूत. परिदृढ. त्याचा इतर म्हणजे विपरीत अर्थात लवचिक, परिवर्तनीय ते दरेतर. असे ज्यांचे उदर अर्थात पोट ते दरेतरोदर.

    भगवान श्री गणेशांना लंबोदर असे म्हणतात. त्यांच्या उदराततून ही अनंत कोटीब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि शेवटी त्यातच लय पावतात. त्यामुळे त्यांना लंबोदर म्हणतात. भगवान गणेश असे लंबोदर असल्याने त्यांचे उदर सगळ्यांना सामावून घेणारे लवचिक आहे म्हणून ते दरेतरोदर.

    वर म्हणजे सर्वश्रेष्ठ.

    वरेभवक्त्रमक्षर- वर म्हणजे श्रेष्ठ. इभ म्हणजे गज अर्थात निर्गुण निराकार. असे निर्गुण-निराकार तत्व आहे ॐ कार ब्रह्म. त्याला अक्षर असे म्हणतात. तेच ज्यांचे वक्त्र अर्थात मुख ते वरेभवक्त्रमक्षर.

    मुख ही आपली ओळख आहे. चेहऱ्यावरूनच आपण एकमेकांना ओळखतो. निर्गुण, निराकार ॐ कार हीच मोरया ची ओळख म्हणून मोरया,वरेभवक्त्रमक्षर.

    कृपाकर अर्थात भक्तांच्या जीवनात कृपेचा अखंड वर्षाव करणारे.

    क्षमाकर अर्थात प्रार्थना करणाऱ्या, क्षमा याचना करणाऱ्या भक्तांच्या चुकांना माफ करणारे.

    मुदाकर अर्थात भक्तांच्या जीवनात सर्वोत्तम आनंद निर्माण करणारे.

    यशस्कर- अर्थात उपासकांना त्यांच्या मन इच्छित कार्यात यश प्रदान करणारे.

    नमस्कृतां मनस्कर- अर्थात धर्म संमत रीतीने वागणाऱ्यांच्या, श्री गणेश चरणावर नत असणाऱ्या सर्व भक्तांच्या मनात येणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करणारे.

    अशा भास्वर अर्थात परम तेजस्वी भगवान गणेशांना मी नमस्कार करतो.

    -- -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      January 3, 2020


  • फडताळ-गाठोडी-वॉर्डरोब ते फोल्डर

    फडताळ हा शब्द कधीच कालबाह्य झालाय. तसे मराठीतले अनेक सुंदर आणि नेमके शब्द आज विस्मृतीत गेलेयत म्हणा. तर फडताळ म्हणजे साधारणपणे दोन दरवाजे असलेलं लाकडी कपाट. पूर्वी हे फडताळ स्वयंपाकगृहातही असे तसंच माजघरातही असायचं.

      December 25, 2021


  • जागतिक स्वमग्नता दिवस

    नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आजूबाजूचे लोक यांच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. स्वमग्न मुलांमध्ये प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे भाषा संप्रेषणाची, वैचारिक देवाण-घेवाणीची. सोप्या शब्दात समजावयाचं म्हणजे, जर आपल्याला एखाद्या अनोळखी प्रदेशात, अनोळखी लोकात एकटे नेऊन सोडले तर? आपण गोंधळून जाऊ, आपल्याला त्या लोकांची भाषा समजणार नाही वा आपली त्यांना! अशावेळी आपली जी स्थिती होईल नेमकी तशीच स्थिती या स्वमग्न मुलांची असते. म्हणूनच ही मुलं परिसराशी संपर्क नसल्यासारखी वागतात. बाह्य जगाशी यांचा काहीही संबंध नसतो.

      April 2, 2022


  • हिमोग्लोबिन

    रक्तात लोह वाहून नेणारं प्रोटिन असतं, त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन हे एक प्रोटिन आहे. हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य आहे, सर्व पेशींना रक्तातून शुद्ध ऑक्सिजन पुरवणं आणि पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा रक्ताद्वारे फुफ्फुसांपर्यंत आणणं. हे हिमोग्लोबिन आपल्या रक्तातील लाल रक्त पेशींमध्ये असतं. रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य मात्रा आपलं जीवनकार्य सुरळीत ठेवते. प्रौढ पुरुषांच्या रक्तातील हिमोग्लोबिन हे १३.५ ते १७ gms/dL, तर स्त्रियांच्या रक्तातील हिमोग्लोबिन १२ ते १५ gms/dL एवढं हवं. रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाली, की त्या अवस्थेला अॅनिमिया म्हणतात (यालाच रक्तक्षय किंवा पंडुरोग असंही म्हटलं जातं). अॅनिमियाचेही बरेच प्रकार आहेत; परंतु रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आपल्याकडे जास्त लोकांमध्ये आढळतो. लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुली, तरुण मुली, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांमध्ये याचं प्रमाण खूप आहे. लोहयुक्त पदार्थांची आहारातील कमतरता हे अॅनिमियाचं महत्त्वाचं कारण आहे.

    बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातील लोहयुक्त पदार्थांचं प्रमाण घटतंय. अॅनिमियाचं दुसरं कारण म्हणजे आहारातून मिळणाऱ्या लोहाचं रक्तातील शोषण रोखणाऱ्या काही घटकांचं सेवन आपल्याकडून कायम केलं जाते. त्यामुळे लोहयुक्त आहार घेऊनही त्याचं योग्य प्रमाणात शोषण न झाल्यानंही अॅनिमिया होतो. इतर कारणं म्हणजे अति रक्तस्त्राव, आतड्याचे रोग, इन्फेक्शन, रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, बी १२ ची कमतरता, लिव्हरचे काही आजार, किडनीचे काही ठराविक आजार, गरोदरपणात होणारी लोहाची कमतरता अशी बरीच कारणं आहेत. थकवा येणं, अंधारी येणं, कामात लक्ष न लागणं, हातापायातील त्राण कमी झाल्यासारखं वाटणं ही अॅनिमियाची काही मुख्य लक्षणं आहेत. हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं लोहाच्या गोळ्या सुरू करणं हाच योग्य उपाय आहे. परिस्थिती खालावली, तर शरीराला जास्तीचं रक्तही पुरवावं लागू शकते. बऱ्याचदा रक्तातील लोहाची पातळी अतिरिक्त कमी होईपर्यंत ही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करा.

    हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार
    बीट, टोमॅटो, गाजर आणि अशा लाल रंगाच्या पदार्थांमधून लोह मिळतं किंवा त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं हा निव्वळ गैरसमज आहे. चिकन, अंडी, मासे, इतर मांसाहारी पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, काही डाळी, उसळी, सुका मेवा, हळीव, खजूर, नाचणी, पोहे, राजगिरा या पदार्थांमधून शरीराला लोह मिळतं. अन्नावाटे मिळणाऱ्या लोहाचेही दोन प्रकार आहेत. हिम आणि नॉन हिम. हिम प्रकारचे लोह सर्व प्राणिज स्रोतांमधून मिळतं, ज्याचे रक्तातील शोषण सहज होऊ शकतं. नॉन हिम प्रकारचे लोह सर्व वनस्पती स्रोतांमधून मिळतं, ज्याचं शोषण सहजासहजी होत नाही. याचाच परिणाम म्हणजे मांसाहारी लोकांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये अॅनेमियाचे प्रमाण जास्त आढळतं; कारण शाकाहारातून मिळणाऱ्या लोहाचं शोषण बऱ्याचदा योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांना आहारातील लोहाचं शोषण व्हावं यासाठी लोहयुक्त पदार्थ खाताना व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्त्व असलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे. यामुळे रक्तातील नॉन हिम प्रकारच्या लोहाचं शोषण होण्यास मदत होते. अन्नावाटे मिळणारे फायटेट आणि टॅनिनयुक्त पदार्थ, कॅल्शियम आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ, अँटासिड्सचे अतिरेकी प्रमाणात सेवन, चहा, कॉफी असे पदार्थ शरीरातील लोहाचं शोषण होऊ देत नाहीत. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचं सेवन करत असताना त्याचवेळी वर दिलेल्या या पदार्थांचं सेवन करणं जाणीवपूर्वक टाळलं, तर तुम्ही खाल्लेल्या लोहाचं शोषण योग्य प्रमाणात होऊ शकतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 2, 2017


  • फास्टफूड किंवा जंकफूड म्हणजे नक्की काय ?

    ज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात.

      June 5, 2023


  • पाकिस्तान : माझी साहसयात्रा

    पाकिस्तान : माझी साहसयात्रा

    मी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो.

    मला काही बेनझीर ओळखत नव्हत्या, ओळखणार तरी कशा ? पण भारतीय वृत्तपत्रातून तेही पुण्यातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी लगेचच हो म्हटले आणि मी काही मिनिटातच तिथे पोहोचलो. दरवाजावर असलेल्या दारवानाने माझी चौकशी केली. बेनजीर यांच्या सचिवाने त्याला ‘इंडिया’तून एक गेस्ट येणार आहेत हे सांगितलेले असल्याने त्याने मला आत सोडले. मी मागे वळून पाहतो तो रकिब पूनावाला मला अच्छा करत दरवाजात उभे होते. तासाभरात येतो, असे सांगून त्यांनी त्यांच्या लाल रंगाच्या सुझुकी मोटरसायकलवर टांग टाकलीसुद्धा.

      July 2, 2025