(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अंबाजोगाईची योगेश्वरी

    अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील एका तालुक्याचे गाव म्हणजे भाविक भक्तांचे स्थान जगन्माता योगेश्वरी होय. देवीच्या स्थापनेचा कालावधी पुरातन असून याविषयी ऐतिहासिक उल्लेख प्राचीन शिलालेखात असलेल्या जोगाईचे माहेर या ठिकाणी आढळतो.

      June 13, 2025


  • या अनुशेषाचे काय?

    27 डिसेंबर 2009

    मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी दहा हजार कोटीचे पॅकेज दिले; परंतु त्यातील बहुतेक निधी आधी सुरू झालेल्या योजनांची पुर्तता करण्यासाठीच आहे. नव्या योजना त्यात नाही, विशेषत: सिंचनाच्या बाबतीत हे पॅकेज कोरडेच आहे. सरकारने देण्याचा उत्साह दाखविला नाही आणि विरोधकांनी खेचून आणण्याचा प्रयत्न केला नाही.

      December 27, 2009


  • दुर्गा पूजेची सुरवात

    बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा पूजा करण्याची बंगाली समाजाची विशेष परंपरा आहे. साधारण महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून मग नऊ दिवसाच्या नऊ माळा पूर्ण करत देवीची आराधना केली जाते. पण बंगाली समाजात नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा माँची भव्य प्रतिमा स्थापित करून विजयादशमीपर्यंत तिची पूजा-अर्चा करण्याची पद्धत आहे. या पूजेत दुर्गा माँच्या प्रतिमेला विशेष महत्त्व असते. अगदी पारंपरिक पद्धतीनेच तिची भव्य प्रतिमा मूíतकारांकडून घडवून घेतल्या जातात. यात देवीच्या मूर्तीबरोबरच गणपती, काíतकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तीचाही समावेश असतो. यात एका भल्या मोठय़ा आडव्या पाटावर या मूर्तीची मांडणी केली जाते आणि त्याच्यामागे एक भव्य कमान उभी केली जाते.
    सहाव्या म्हणजे महासष्टीच्या दिवशी सायंकाळी शंखांचा नाद करत दुर्गादेवीची प्रतिमा मंडपात आणली जाते. याला आमंत्रण अथवा अधिवास असे म्हटले जाते. महासप्तमी म्हणजेच सातव्या दिवशी त्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. सर्वप्रथम कलश स्थापनेचा विधी केला जातो. यात एका कलशामध्ये श्रीफळ आणि आंब्यांची पाने लावून दुर्गा माँचे प्रतीक मानून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर महास्थानाचा विधी पार पाडला जातो. यात प्रतिमेसमोर एक आरसा ठेवून त्या आरशात पडणाऱ्या देवीच्या प्रतििबबावर हळद आणि मोहरीचे तेल लावून त्या प्रतििबबाला उसाच्या रसाने अथवा गंगेच्या पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर पुजारी दुर्गा माँचे नाव लिहिलेला आरसा, साडी, आभूषणे हे सगळे बेडी म्हणजे पूजा करण्याच्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करतात. या सर्व प्रक्रियेत सर्व जातीच्या आणि देहविक्री करणाऱ्या स्त्रीच्या घरातील मातीला विशेष महत्त्व असते. या सर्व विधींनंतर प्राणप्रतिष्ठापना हा महत्त्वाचा विधी पूर्ण केला जातो. यात पुजारी मंत्रोच्चार करून कलश आणि दुर्गादेवीच्या प्रतिमेत प्राण निर्माण करतो, अशी आख्यायिका आहे. अष्टमीच्या दिवशी देवींनी महागौरीचे रूप घेतल्यामुळे तिची महागौरी पूजा केली जाते. यानंतर नवमीला चंडी पूजा केली जाते. या क्षणी देवीने चामुंडाचे रूप घेतलेले असते. त्यावेळी देवीला विशेष असा ‘नीट भोग’ चढवला जातो. यात भात, वरण, भाजी, चटणी आणि पायेश या गोड पदार्थाचा समावेश असतो. १०८ दिवे आणि १०८ कमळ फुलेही याक्षणी देवीला वाहिली जातात. विजयादशमीच्या दिवशी देवीला मध-दुधाचा भोग दाखविला जातो. याला ‘चरणमिर्ती’ असे म्हणतात. याच दिवशी स्त्रिया सिंदुर उत्सव साजरा करतात. देवी आपल्या पतीच्या घरी कैलासावर जात आहे, अशी धारणा धरून त्या तिच्या डोक्यावर सिंदूर लावतात. याला ‘कनक अंजली’ असे म्हटले जाते. त्यानंतर देवीच्या उत्तरपूजेची सुरुवात होते. यामध्ये कलशासमोर उत्तर दिशेस म्हणजेच कैलास पर्वताच्या दिशेने एक फूल ठेवले जाते आणि त्यानंतर देवीच्या प्रतिमेस विसर्जनासाठी बाहेर काढले जाते. विसर्जनानंतर पुजारी विसर्जनस्थळावरील पाणी ज्याला शांती जल म्हटले जाते ते भक्तांच्या अंगावर आंब्याच्या पानाच्या साहाय्याने शिंपडतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      October 5, 2019


  • महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ – दशा आणि दिशा

    मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्य आणि संस्कृतिविषयी प्रेम निर्माण करणारे एक सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन अभिरुची निर्माण करणे, या अभिरुचीला वाङ्मयीन जडण-घडण करण्याचे फार मोठे सामर्थ्य वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात असते. पण सर्वच महाविद्यालयांत हे कार्य घडताना दिसत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.

      April 28, 2022


  • आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल…

    २१ जून २०१५ रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे.

    योग हे बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच फिटनेस सिक्रेट नसून केंद्रीय मंत्रीमंडळानेही त्याची दखल घेतलेली दिसते. त्यामुळेच की काय, केंद्रीय मंत्रीही आपल्या घरी योगाद्वारे फिटनेसचा फॉर्म्यूला वापरत असावेत.

    नुकतेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी योग दिनाबद्दल जनतेला आवाहन केले. त्यावेळी त्यांनी स्वतः घरी योगा करत असल्याचा व्हिडिओ खाली पहा....

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत योग दिन साजरा करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले याबद्दल जावडेकर यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले....

    New Delhi, June 12 (ANI): Looks like yoga is not just Prime Minister Narendra Modi's fitness secret by his cabinet ministers too follow the routine yoga and exercise to keep fit and healthy. Environment Minister Prakash Javadekar on Thursday practiced yoga at his residence and appealed people to do some kind of exercise daily to keep the body fit. Javadekar said that he was glad that PM Modi proposed yoga at the UN Assembly following which 21st June was declared as International Yoga Day. The environment minister also said that yoga and other exercises including jogging, riding bicycle or gyming are very important for a healthy living.

      June 12, 2015


  • वायुगळती

    २००३ सालची गोष्ट आहे. मेक्सिको शहरावर पिंगट रंगाच्या धुक्याचा दाट ” थर पसरला होता. त्यामुळे शहरातल्या २ कोटी लोकांचे डोळे चुरचुरायला लागले, घशापाशी जळजळ झाली. बरेच दिवस तेथील प्रदूषणं-नियंत्रकांना हा उपद्रव नेहमीप्रमाणे मोटारकारच्या धुरांड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होतोय असे वाटले.

      February 18, 2023


  • रामदासस्वामींचा सार्वजनिक गणेशोत्सव

    भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे.

    'विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये १६५८ साली रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता.

    १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. १६७४ साली राज्याभिषेक झाला आणि १६७५ साली हा गणेशाचा नवस सुंदरमठामध्ये गणपतीची स्थापना करून फेडला गेला. 'याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आणि भाद्रपदमासी, 'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥' हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो.

    समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते.

    ज्याप्रमाणे गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींची असल्याचे 'दास रामाचा वाट पाहे सदना।' यावरून सांगितले जाते. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिला सर्वात मोठा गणेशोत्सव सुंदरमठामध्ये समर्थांनी करून संकटी पावलेल्या आणि शिवछत्रपतींना निर्वाणी रक्षिणाऱ्या सुरवरवंदनाचा नवस फेडला.

    यानंतर लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्य काळात या गणेशोत्सवाला ब्रिटीश सरकारविरूध्द जनतेत असंतोष पेरण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणले. मात्र, गणपतीची आरती समर्थांची तसाच गणेशोत्सवाची सुरूवातही समर्थांचीच असल्याचे समर्थ वाङमयातून स्पष्ट होत आहे.

    IMG-20150916-WA0026

      December 31, 2015


  • अन्याय्य न्याय?

    प्रकाशन दिनांक :- 19/09/2004

    ‘उम्रे दराज मांग कर लाए थे चार दिन,
    दो आरजू में कट गए, दो इंतजार में’
    एका शायराची ही कैफियत, केवळ त्या शायरापुरती मर्यादित नाही. ही कैफियत प्रातिनिधीक आहे. ऊण्या-पुऱ्या चार दिवसाचे आयुष्य वाट्याला येते आणि त्यातले अर्धेअधिक वाट पाहण्यातच संपून जाते.

      September 19, 2004


  • कृष्णविवर आणि त्याचा शोध

    आईन्स्टाईनने सांगितलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धान्तामध्ये सर्वप्रथम कृष्णविवराच्या अस्तित्वासंबंधी शक्यता निर्माण झाली. गुरुत्वाकर्षणाचा काळावर कसा परिणाम होतो ते या सिद्धान्तामुळे स्पष्ट झाले. कृष्णविवर ही संकल्पना मूलतः सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे जगासमोर आली.

      November 21, 2022


  • क्रिकेटच्या देवाची नौटंकी

    प्रज्ञावंत, बुद्धिवंतांना राजकारणात स्थान मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या प्रज्ञेचा देशाला लाभ मिळू शकणार नाही, हे हेरून, राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारा साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतील १२ नामवंतांची नियुक्ती करण्याचे प्रावधान, द्रष्ट्या घटनाकारांनी घटनेत करून ठेवले; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारबसव्या राजकारण्यांनी घटनेतील या प्रावधानाचाही बाजार मांडला आहे.

      June 18, 2012