(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आमची माती आमची माणसं

    आमची माती आमची माणसं

    भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्लीत १९५८ साली सुरू झाले. त्यानंतर २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले. नंतरच्या काळात आशियाई क्रिडा स्पर्धांच्या वेळी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. तेव्हा अगदी मोजकीच चॅनेल असायची आणि कार्यक्रमसुद्धा अत्यंत दर्जेदार असायचे. या दर्जेदार कार्यक्रमातलाच एक कार्यक्रम म्हणजे शेतकरी बंधूंसाठी असलेला 'आमची माती- आमची माणसं' !

    https://www.youtube.com/watch?v=TFtiDc5GRmU

    खरंतर पहिले केंद्र दिल्लीत सुरू झाल्याने आणि तब्बल १२ वर्षे त्यावर कार्यक्रम करण्याचा अनुभव घेतल्याने दूरदर्शनच्या अधिकार्‍यांना लोकांच्या गरजांसाठी कोणते कार्यक्रम करायला हवेत याची माहिती झाली होती. त्यामुळेच मुंबई केंद्र सुरु झाल्यावर आपण कोणकोणती सदरे सुरू करावीत, याचेही मार्गदर्शन मिळाले.

    सुरुवातीला मुंबई दूरदर्शनवर काम करण्यासाठी दिल्ली केंद्रावरची काही अनुभवी माणूस मागवून घेतली गेली. मात्र बाकीचे सगळे दूरदर्शनचा अनुभव नसलेलेच होते. निदान कार्यक्रम तयार करण्याचा व तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अनुभव असवा या उद्देशान जागोजागच्या आकाशवाणी केंद्रांवरची माणसे दूरदर्शनवर आणली.

    आकाशवाणी आणि दूरदर्शन यात काही साम्ये आहेत तसेच काही फरकही आहेत. लोकांना कोणते कार्यक्रम द्यायचे, त्याचा आराखडा कसा असावा, विविध विषयावरील माहिती देणारे तज्ज्ञ कोण आहेत, या गोष्टी दोन्ही माध्यमांना समान आहेत. पण आकाशवाणीवर चित्रे दाखवता येत नसल्याने तेथे शब्दांना फार मोठे महत्त्व असते.

    आकाशवाणीवरील भाषणावरून श्रोत्यांपुढे त्याचे हुबेहुब चित्र दिसले पाहिजे. प्रत्यक्ष चित्र दाखवता येत नसल्याने जी कमतरता आकाशवाणीच्या माध्यमात आहे तीच दूरदर्शनची ताकद असते कारण दूरदर्शनवर चित्रे दाखवता येतात. यामुळे वक्त्याचा संदेश अधिक स्पष्ट होतो. त्यासाठी दूरदर्शनवर काम करणार्‍या व्यक्तींना अधिक कष्ट ग्यावे लागत. भाषणाला साजेशी चित्रे, दृश्ये, छायाचित्रे मिळवणे हा त्यातला कष्टाचा भाग असे आणि ती चित्रे योग्यवेळी दाखवणे हाही तितकाच महत्त्वाचा भाग असे. त्यावेळी आतासारखा मोठा चित्रसंग्रह किंवा व्हिडिओजचा संग्रह उपलब्ध नव्हता.

    'आमची माती- आमची माणसं' या कार्यक्रमात अनेक कृषी-तज्ज्ञांच्या मुलाखती प्रत्यक्ष शेतावर घेतल्या जात. दृक-श्राव्य माध्यमातून एखादा रोग पडलेले पीक कसे दिसते ते नीट दाखवता येते. सकस फळ आणि रोगट फळ
    यातील फरक चित्राच्या माध्यमातून नीटपणे दाखवता येतो. यामुळे शेतकरी वर्गामध्ये हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

    आज दूरदर्शनवर असंख्य खाजगी चॅनेल्स आहेत. त्यातील काही कृषी-शेती या विषयाला वाहिलेली सुद्धा आहेत. मात्र याची पायाभरणी 'आमची माती- आमची माणसं' या कार्यक्रमाने केली असल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व अबाधित आहे.

    सुप्रसिद्ध कृषीतज्ज्ञ डॉ. यशवंतराव नेने एकदा म्हणाले होते की, मुंबई दूरदर्शनवरील शेतीविषयक कार्यक्रम महाराष्ट्रात ज्या गुणवत्तेचा असतो, तितका इतर राज्यांतील नसतो. यातच हा कार्यक्रम सादर करणार्‍यांचे योग्य कौतुक होते.

    --

      April 7, 2016


  • मेल्टिंग पॉट की सॅलड बाउल ?

    ….. एकेकाळी यालाच आपण “एकत्र कुटुंबपद्धती ” म्हणत होतो आणि हळूहळू त्या पॉटमधील नातं वितळत गेल्यामुळे (अजूनही माझ्या बघण्यात काही सन्माननीय अपवाद आहेत) आता ती “विभक्त कुटुंब पद्धती” झालीय आणि अविभाज्यपणे जीवनपद्धती म्हणून स्वीकारली गेली आहे. सगळी छोटीछोटी घरे म्हणजे सॅलड बाउल्स !

      March 19, 2022


  • डॉ. के. वेंकटरामन (१९०१-१९८१)

    पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत.

      October 8, 2023


  • कुठलं खाद्यतेल वापराल?

    फोडणीसाठी देशी गायींच्या दुधापासून बनवलेलं तूप वापरावं हे आपण या आधी पाहिलं. तरीही ज्यांना तूप न वापरता तेलच वापरायचं आहे त्यांनी काय काळजी घ्यावी ते आपण पाहणार आहोत.
    कुठलं तेल वापराल?
    आजकाल आम्हाला ऑलिव्ह ऑइल खूपच ‘हेल्दी’ असतं असा साक्षात्कार झाला आहे. उठसुठ सगळ्या पदार्थांत आम्ही हे महागडं तेल वापरतोय. प्रत्यक्षात ज्या देशांतून हे तेल आपल्याकडे आलं तिथे मात्र हे ऑलिव्ह ऑइल केवळ सॅलड्सच्या ड्रेसिंग पुरतंच प्रामुख्याने वापरलं जातं. फोडणीसारख्या उच्च तापमानाला वापर करण्यास हे अनुपयुक्तच नव्हे तर घातकदेखील आहे हे कायम लक्षात ठेवा.
    या तेलाशिवाय सोयाबीन, सूर्यफूल आणि राईस ब्रान हे तेलांचे प्रकार आपल्या माथी ‘हेल्दी’ म्हणून मारले जातात. पुन्हा सतत एकच तेल न वापरता दोन तेलांचे मिश्रण वापरावे यांसारखे अर्धवट माहितीवर आधारित सल्ले कित्येकजण देत असतात. (प्रत्यक्षात दोन-चार तेलांचे, तेल + तूप अशी मिश्रणे वापरणे मुळीच योग्य नाही. आयुर्वेदानुसार तसे अपेक्षितदेखील नाही.) याशिवाय ‘हृदयासाठी उत्तम’ असं म्हणून जाहिरात करणारे काही ब्रँड आहेतच. लोकहो; यांपैकी कसल्याच आहारी जाऊ नका. आपल्या देशात जी तेलं वापरण्यात येतात तीच वापरा. तसे करणेच फायद्याचे आहे.
    हिंदुस्थानात भौगोलिक स्थितीनुसार तेलांचे प्रकार बदलतात. उत्तर भारतात राईचे तेल चांगले तर दक्षिण भारतात खोबरेल तेल उत्तम. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि मध्य भारतात भुईमूग हाच उत्तम पर्याय आहे. कोणत्याही प्रकारचे तेल असो; घाण्यावरील तेल हे रिफाइंड तेलांहून अधिक चांगले. खोबरेल तेल मात्र कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेले असेल तर उत्तम. ऑलिव्ह ऑइल वाईट असा या लेखाचा अन्वयार्थ कृपया काढू नका. सॅलड ड्रेसिंग म्हणून ते वापरण्यास काहीच हरकत नाही. अन्यत्र मात्र देशी पर्यायच अधिक उजवे आहेत हे नक्की!!
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 30, 2016


  • जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्या प्रकारचा दहशतवाद

    1948 ते 1972 या सालांच्या मध्ये काश्मीर मध्ये शांती होती. 1972 पासून ऑपरेशन टॉपेझ च्या प्लॅन प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोरी सुरू झाली. अनेक तरूणांना भडकवून पाकिस्तानी आतंकवादी ट्रेनींग कॅम्पस् मध्ये पाठवण्यात आले. या काळामध्ये आपले सरकार पूर्णपणे झोपले होते.

      March 28, 2013


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ७

    भगवान श्रीविष्णूंच्या हातातील विविध आयुधांचे वर्णन केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज श्रीहरीच्या आसन स्वरूपात विराजमान असणाऱ्या भगवान श्री शेषांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,

      December 10, 2020


  • ऋषिपंचमी

    ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे,त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी,अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने,तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो.

      August 26, 2017


  • अगम्य ‘शिक्षित’ पालक..!

    हिंदीत 'शिक्षा' चा अर्थ शिक्षण.

    आणि शिक्षा शब्दाचा मराठी अर्थ काय? हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण अनेक पालकांनी त्यांच्या लहानपणी 'शिक्षा' या शब्दाच्या अनेक अर्थछटा अनुभवल्या आहेत, चाखल्या आहेत, गिळल्या आहेत, अंगावर मिरवल्या आहेत आणि कपड्याखाली लपवल्या पण आहेत. आणि मग उगाच परंपरा खंडित होऊ नये म्हणून याच कल्पक पालकांनी शिक्षेत काळानुरुप बदल करुन त्या आपल्याच मुलांपर्यंत ताकदिने पोहोचविल्या आहेत.

    मुलांशी गप्पा मारताना शिक्षेचे विविध प्रकार कळले तेव्हा अचंबितच झालो. शास्त्रीय संगीतात ज्याप्रमाणे घराणी आहेत त्याप्रमाणेच या शिक्षा प्रकारात तीन मुख्य घराणी आहेत. त्या त्या घराण्याप्रमाणे शिक्षेचे राग,ठुमरी,टप्पा,ख्याल किंवा फ्युजन असे स्पेशलाइज्ड प्रकार आहेत. 'घर,शाळा आणि क्लास' ही शिक्षेची मुख्य उगमस्थाने किंवा घराणी!!

    संजानाची निबंधाची वही वाचत असताना,जाणवलं की, तिने नवीन निबंध अत्यंत खराब अक्षरात लिहिला आहे.

    माझी उत्सुकता चाळवली.

    अचानक अक्षर खराब होण्याचं कारण काय असावं? तिने फक्त निबंधच खराब अक्षरात लिहिलाय की तिचे एकंदर अक्षर लेखनच खराब होउ लागले आहे?

    सहज म्हणून तिच्या वर्गात गेलो. संजानाच्या इतर वह्या चाळल्या. मला धक्काच बसला! गेल्या दोन दिवसांपासूनच तिचं अक्षर खराब होऊ लागलं आहे.

    मुलांना भेटायला ऑफिसमधे बोलावलं तर मुलांवर दडपण येतं, म्हणून मुलांशी गप्पा मारण्यासाठी शाळेत एक 'गप्पा कोपरा' आहे.
    संजाना जेव्हा गप्पा मारायला आली तेव्हा ती हातातल्या रुमालाशी सतत चाळे करत होती. तो रुमाल खिशात ठेवायला तिला खूणेनेच सांगितलं. तर तिने दोन्ही हातच खिशात घातले.

    प्रचंड बेचैन होती ती! मला थोडाफार अंदाज आला होता. तरी खात्री करण्यासाठी म्हणून तिला प्यायला पाणी दिलं.

    तिच्या उजव्या हाताची तीन बोटं सुजली होती. तिला कुणीतरी शारीरिक शिक्षा तरी केली होती किंवा तिच्या बोटांना अपघात झाला असावा.
    तिचा उजवा हात हातात घेत तिला विचारलं तर.... एव्हढावेळ थोपवून ठेवलेला बांध फुटला व एक नवीनच गोष्ट समोर आली.
    संजानाच्या आईने तिला शिक्षा केली होती.

    पट्टीने तिच्या हातावर मारताना,पट्टी आडवी न ठेवता ती उभी ठेवण्याची विशेष काळजी घेतली होती. म्हणजे पट्टीचे फटके जरी कमी मारले तरी मुलीला इजा मात्र अधिक होईल,हा त्यामागचा उदात्त हेतू होता.

    संजानाशी बोलताना आणखीन एक नवीन गोष्ट समजली.

    आईने शिक्षा केली म्हणून संजानाला आईचा अजिबात राग आला नव्हता. किंबहुना शिक्षा नेमक्या कुठल्या कारणास्तव झाली हे सुध्दा तिला नीटसं आठवत नव्हतं. तरीपण तिचं हुंदके देणं थांबलं नव्हतं. तिला खूप भरून आलं होतं. दाटून आलं होतं. तिला काहीतरी वेगळंच सांगायचं होतं. आम्ही बोलत बोलत ऑफिसमधे गेलो.

    संजाना रिलॅक्स झाली,हळूवारपणे बोलू लागली...... त्यातूनच मला एक अनोखा साक्षात्कार झाला. आपली चूक झाल्याची संजानाला जाणिव होती.

    पण शिक्षेच्या अलिकडची आई व शिक्षेच्या पलीकडची आई याबाबत तिचा फार गोंधळ झाला होता. शिक्षा करणारी आई तिला मान्य होती. किंवा असं म्हणता येईल की,'शिक्षा करणाऱ्या आईला ती समजून घेऊ शकत होती.' संजानाला शिक्षा केल्यानंतर तिच्या आईत झालेला बदल तिला उमजत नव्हता,म्हणून ती व्यथित झाली होती.

    शारीरिक शिक्षा केल्याने मुलांच्या फक्त शरीरालाच इजा होते असा कृपया गैरसमज करुन घेऊ नका. आणि त्यामुळेच मुले सुधारतात असा महागैरमज तर कधीही करुन घेऊ नका.

    शारीरिक शिक्षेमुळे मुलांच्या मनाला, त्यांच्या भावविश्वाला जबर धक्का बसतो. वरुन न दिसणारी पण त्यांच्या अंतर्मनाला होणारी जखम दिवस रात्र भळभळत राहाते. आणि ही ठसठस ते कुणाला मोकळेपणाने सांगू पण शकत नाहीत. शारीरिक शिक्षेमुळे आपलं मूल कायमचं दुखावलं जातं,याचं भान शिक्षा करणाऱ्या मोठ्या माणसांना येतच नाही!

    संजाना म्हणाली,'मी कधी रस्त्यातून चालताना पायाला ठेच लागली, किंवा खेळताना पाय मुरगळला तर आई माझी किती काळजी घेते. माझ्या पायाला मालीश करते. लागलं असेल तर औषध लावते. अशावेळी घरातली माझी कामंसुध्दा तीच करते.

    पण हीच आई जेव्हा मला शिक्षा करते, मला उभ्या पट्टीने मारते आणि त्यानंतर जणूकाही काही झालेच नाही अशाप्रकारे कामाला लागते.
    मला किती लागलंय? मला किती दुखतंय? याचा विचारसुध्दा तिच्या मनात येत नाही! मला जवळ घेऊन माझ्या सुजलेल्या हातावरून ती हात सुध्दा फिरवत नाही!

    मला ठेच लागल्यावर जवळ घेणारी आणि स्वत:च शिक्षा करुन मला दूर ढकलणारी, यातली खरी आई कोणती?
    का वागते आई असं?

    संजानाचा प्रश्न काही अगदीच चुकीचा नाही. आणि याचा अर्थ मुलांना काही शिक्षाच करु नये असा ही नव्हे.

    जर सगळेच उपाय थकले असतील तर आपला राग व्यक्त करण्यासाठी एखादी थप्पड मारणे इतपत समजणे शक्य आहे. पण मुलांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी एखादी चूक पुन्हा करू नये म्हणून त्यांना काठीने मारणे,चटके देणे अशा शारीरिक इजा करणाऱ्या शिक्षा करणे हे सर्वार्थाने गैर आहे.

    जबर शिक्षा करुन जर मुले सुधारली असती तर शाळा बंद करुन व्यायामशाळाच सुरु केल्या असत्या की सर्वांनी!

    ------------------------------------------------------------------------------------------
    पालकांसाठी गृहपाठ :
    'दोन तडाखे दिल्याशिवाय हा काही सुधारणार नाही' असं जेव्हा मनात येईल त्या संघर्ष क्षणी स्वत:चाच चेहरा आरशात पाहा; आणि मनातले 'ते वाक्य' जरा जोरात म्हणा.
    पाहा चमत्कार होतो की नाही?
    मुलांना शारीरिक शिक्षा करणारे पालक हे मनाने कमकुवत असतात.
    आपले पालक असे असावेत असं समझदार पालकांच्या मुलांना कधीच वाटत नाही.
    तुमच्या मुलांना काय वाटतं ते मला कळवाल?
    तुमच्या 'सुशिक्षित पत्रांची' मी वाट पाहात आहे.
    ------------------------------------------------------------------------------------------------

    -- राजीव तांबे

      February 14, 2016


  • द्रौपदीची साडी

    महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे

      January 18, 2024


  • अपयश ही अफलातून गोष्ट आहे

    आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यासाठी अपयशाचा अर्थ आजच्यापेक्षा वेगळा होता. जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकत होता तेव्हा तुम्ही पडलात, बऱ्याचवेळा पडलात. कदाचित तुमचे गुडघे फुटले असतील, रडला असाल पण तुम्ही परत उठलात. पुन्हा पेडल मारायला सुरुवात केली आणि काही काळातच तुम्ही अशी सायकल चालवू लागता की जशी तुम्ही ती गोष्ट बऱ्याच आधीपासून करत आहात.

      April 26, 2022