(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अस्सल मराठी संगीत नाटक ‘संगीत शाकुंतल’

    आज ३१ ऑक्टोबर.. आज 'संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १३६ वर्षे झाली.

    ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. १८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी 'इंद्रसभा' नावाचे पारसी नाटक - उर्दू भाषेतील - पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी 'संगीत शाकुंतल' या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला. किर्लोस्करांनी कवी कुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले. आणि त्या मराठी `शाकुंतला'चा पहिला प्रयोग म्हणजे (नंतरच्या काळात लोकप्रिय झालेल्या) संगीत नाटकाची गंगोत्री होय. या प्रयोगात जवळपास शंभर पदे होती. आणि या पदांची रचना ओवी, लावणी, साकी, दिंडी इ. रूढ छंदांना अनुसरणारी होती.

    १३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्‍याच्या मुहूर्तावर 'शाकुंतल'च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

    भारतीय नाटशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत - ती वाद्यांवर वाजवली जात. त्यांत दोन प्रकार होते - निःशब्द धृवागीत आणि सशब्द धृवागीत. प्रथम निःशब्द धृवागीत वाजवले जात असे, जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. निःशब्द धृवागीताने एकप्रकारे सुरांचे गूढ असे वातावरण निर्माण होत असे. पण नाटक म्हणजे शेवटी शब्दसृष्टी. त्यामुळे निःशब्द धृवागीतानंतर सशब्द धृवागीत होत असे. त्यालाच आपण आज नांदी म्हणून ओळखतो.

    नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार 'संगीत शाकुंतल' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. 'पंचतुंड नररुंडमालधर' ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्‍यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला. ती ही 'संगीत शाकुंतला'ची नांदी.

    (राग : खमाज, ताल : धुमाळी, चाल : जय श्री रमणा भयहरणा)

    पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो ॥
    विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥ ध्रु.
    कालिदास कविराज विरचित हें, गाती शाकुंतल रचितों
    जाणुनिया अवसान नसोनि महकृत्यभर शिरिं घेतो
    ईशवराचा लेश मिळे तरि मूढ यत्न शेवटि जातो
    या न्याये बलवत्कवि निजवाक्यपुष्पिं रसिकार्चन करितो ॥
    नांदीनंतर सूचकपद असे. शाकुंतलाच्या नांदीच्या सूचकपदाची झलक ही अशी.
    अष्टमुर्ती परमेश सदाशिव तुम्हां शिव देवो
    यदृपाविण विश्वचि हा भास हृदयी ठसवो

    सूचकपदातून नाटकाचं साधारण कथानक हे नटेश्वराच्या आयुष्यावर बेतून सांगितले जायचे. जणू काही नटेश्वराच्या जीवनामध्ये या घटना घडल्या आहेत, असे समजून त्याला उद्देशून हे सूचकपद म्हणायचे कारण ती असायची त्या नाटकाच्या एकूण कथासूत्राची सुरुवात.

    नाटकाचा मूळ उद्देश हा मनोरंजनाचा असल्याने नाटकाचे कथानक सूचकपदातून सांगितल्याने काही रसभंग होत नसे. उलट जमलेल्या लोकांना आज आपण कुठल्या कथानकावरचे नाटक पाहण्यासाठी जमलो आहोत, हे कळल्याने नाटकाचा आणि पदांचा आनंद लुटायला मदतच होत असे. जसे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायक माहितीतलाच राग सादर करणार असेल, तरी त्या-त्या दिवशीचा रसाविष्कार वेगळा असतो, तसेच कथानक आधी माहीत असले, तरी त्या दिवशी नाटक आणि मुख्य म्हणजे पदे कशी होतील याची उत्सुकता प्रेक्षकांत असेच.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मा.वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील संगीत शाकुंतल मधील नांदी.

      October 31, 2016


  • पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी

    १२ वर्षाखालील सर्व मुलांच्या पालकांनी नोंद घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

    राष्ट्रीय रोगप्रतिबंधक लसटोचणी स्मरण मोहीम ही नि:शुल्क सेवा आहे.

    तुम्ही फक्त एवढेच करा.

    तुमच्या बाळाचं नाव आणि जन्मतारखेचा एसएमएस संदेश 566778 या क्रमांकावर खालील सूत्रात पाठवा :-

    Immunize[स्पेस]बाळाचे नाव[स्पेस]बाळाची जन्मतारीख
    (हे सगळं इंग्रजी त हवं)

    उदा. *Immunize Krishna 01-01-2015*

    तुमच्या बाळाला लस टोचण्याची आठवण करून देणारा संदेश तुमच्या मोबाईल वर २ दिवस आधीच येईल. तुमचं बाळ १२ वर्षांचं होईपर्यंत हे चालूच राहील.

    तुमच्या बाळाला निरोगी जीवनाची ही अनमोल अशी भेट द्या.

    कृपया हा संदेश तुमच्या सर्व मित्रांना आणि संबंधित सर्वांना पाठवा.

    ज्यांची मुले १२ वर्षे पेक्षा लहान आहेत, त्या सर्व पालकांनी ही नोंदणी करायलाच हवी.

      July 19, 2016


  • तंत्रविश्व – भाग ४ : ऑनलाइन शॉपिंग सुरक्षा

    मित्रांनो आजचा जमाना हा ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. घरबसल्या आपल्या फोनद्वारे आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंपासून ते मोबाईल इलेक्ट्रॉनिक, कपडे आणि अगदी फर्निचर देखील आपण सर्व काही ऑनलाईन मागू शकतो. अर्थातच त्यामुळे आपले जीवन अधिक सुखकर झाले असले तरी ऑनलाईन शॉपिंग करत असताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते.

      April 12, 2020


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 23-धूपं समर्पयामी-अंतिम भाग चार

    कालच्या टीपेवरून एका गटात एक खोचक सूचना सुचवली गेली, "आपण म्हणताय त्याप्रमाणे अग्निहोत्र जर एवढे प्रभावी असेल तर सर्व हाॅस्पीटल्स, सूतिकागृहे, दवाखाने इ. मधे दररोज अग्निहोत्र केले तर डाॅक्टर, औषधे यांची काही गरजच उरणार नाही. अज्ञान दूर सारा, विज्ञान स्विकारा." उगाच नको ते सांगत राहू नका, या अर्थी त्यांना सांगायचे होते. विज्ञानाच्या नावाखाली आज काही पुरूषाधम वेडेकर मंडळींना भारतीय शास्त्रांचा, त्यातील सूत्रांचा खरा अर्थ कधी कळलाच नाही, ज्यांना अज्ञान विज्ञान शब्द सुद्धा, शुद्ध स्वरूपात लिहिता येत नाही, अश्या "ज्ञानी" व्यक्ती केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलत रहातात. पण असे बोलून आपण आपल्याच अज्ञानी जाती बांधवांचे नुकसान करून घेत आहोत, आणि आपले हसे करून घेत आहोत, हे पण यांच्या लक्षात येत नाही. असो. नुसता धूर काढत असतात झालं. तसा नुसताच धूर उदबत्यांमधून पण येतो.

    उदबत्ती हे धूपन चिकित्सेतील शेवटचे टोक. ही पूर्ण चिकित्सा नाही आणि फायदे देखील पूर्ण नाहीत. तरी पण काही अंशी धूर तयार होतो, म्हणून विचार करायचा.

    अगरबत्ती करायला बांबू वापरला जातो. भारतात बांबू कधीही जाळला जात नाही. तो शाकारणीसाठी, बांधकामासाठी किंवा तिरडी बांधण्यासाठी वापरला जातो. तिरडीवरचा बांबू आणि बांबूच्या कामट्या देखील सरणात जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. बांबू जाळल्याने जो वायु तयार होतो, तो स्वास्थ्याला हानीकारकही आहे, असेही वाचनात आले होते. अश्या बांबूचा वापर अगरबत्ती करण्यासाठी केला जाणे चुकीचे आहे.

    भारतीय परंपरेमधे केवळ धूप द्रव्य, हवन सामग्री एकत्र करून अग्नीवर अर्पण करायची पद्धत. या धूपद्रव्याला, बांबूच्या काड्यांचा आधार देणे भारतीय नाही, या बांबूच्या काड्यांना दुसरा समर्थ पर्याय निवडावा, असे मला वाटते. अन्य तज्ञांनी, आयुर्वेद वैद्यांनी वा अन्य वनस्पती शास्त्रज्ञांनी यावर आणखी प्रकाश टाकावा.

    अगरबत्ती मधे जी सुगंधी द्रव्ये वापरली जातात, ती पूर्णपणे नैसर्गिक असावीत. पण आज ज्या उदबत्या मिळतात, त्यात कृत्रिम वास येणारी रसायने वापरली जातात, जे योग्य नाही. परिणामी त्यापासून तयार होणारी विभूती ही देखील औषधी ठरत नाही. उदबत्ती अथवा अगरबत्ती मधे मुख्यतः उद अथवा अगर हे दोन पदार्थ वापरलेले असतात. याऐवजी जर गाईचे शेण गोमूत्र आणि गाईचे तूप, धूप, गुग्गुळ आणि नैसर्गिक सुगंध असलेली तेल द्रव्ये वापरली गेली तर त्याचे औषधी गुणधर्म मिळतील, नाहीतर फायद्यापेक्षा तोटेच जास्ती होतील.

    आता तर डाॅक्टर सुद्धा धुराची अॅलर्जी असं सुद्धा सांगायला लागलेत, देवळात जाऊ नका, धुराकडे नेऊ नका, त्यातील काही धूर औषधी आहेत, हे विसरून कसे चालेल ? नको ते धूर सोडायला सुरवात झाल्यावर हवे ते औषधी धूर सुद्धा बदनाम होऊ लागले आहेत.

    जी गोष्ट अगरबत्तीची तीच कछुआ जलाओ मच्छर भगाओ ची ! मग कंपनी कोणती का असेना, त्यात वापरलेल्या रसायनांनी डासांपेक्षा, माणसांचाच जीव गुदमरून जातो. लहान मुलांना तर या डासांच्या काॅईल्स खूपच हानीकारक आहेत. जी गोष्ट काॅईल्सची तीच वाफ निर्माण करणाऱ्या डब्यांची, किंवा कागदाला चिकटवलेल्या विषारी द्रव्यांच्या ठिपक्यांची. एका झटक्यात, फटक्यात प्रतिकारशक्तीच गायब होऊन जाते.

    सिगरेट ओढून स्वतःच्या छातीचा खोका करायचाच, शिवाय जो ओढत नाही, त्यालाही या विषारी धुराचा प्रसाद द्यायचा, डास मारण्यासाठी राॅकेल अर्धवट जाळून केला जाणारा विषारी धूर, गाड्यांमधे चुकीच्या प्रतीचे इंधन वापरून होणारा विषारी धूर, केमिकलचे कारंजे उडवणाऱ्या एमआयडीसीतील चिमण्यांमधील विषारी धूर, यामुळे होणारे प्रदूषण, याकडे कोणाचे लक्षच नाहीये.

    विषारी धुरापासून होणारे हे "स्लो पाॅयझनिंग" आहे, हे कोणाच्या लक्षात येत नाहीये का ? धूपन चिकित्सा बदनाम करणाऱ्या आणि नुसता विषारी धूर ओकणाऱ्या या मंडळींपासून सावधान.

    भारतीय पद्धतीप्रमाणे सर्व रुग्णालयामध्ये जर, सूर्योदय सूर्यास्त या वेळा पाळून अग्निहोत्र सुरू केले तर, रुग्णांची संख्या, आणि वाढते साथीचे रोग निश्चितच कमी होतील.......
    म्हणून तर ही "रिस्क" कोणी घेत नाही ना ! एवढी मोठी सोन्याची कोंबडी देणारी मेडीकल इंडस्ट्री कोणाला नको आहे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.06.2017

      June 16, 2017


  • दोन्ही अर्थसंकल्पाची तयारी कशी होते ?

    दोन्ही अर्थसंकल्पाची कशी होते ? कोण याची निर्मीती करते ? कोणत्या प्रिटींग प्रेसमधून याची छपाई केली जाते ?या प्रक्रियेत कोण कोण सहभागी होते ?बजेटमधील काही महत्वाच्या बाबी फुटल्या जाऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना तयार केल्या जातात ? अशा प्रकारचे प्रकारचे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतात.

    अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत क्लितष्ट, जबाबदारीचे तसेच जोखमीचे काम असते. त्यामुळे हे काम करणारे सर्वजण रात्र आणि दिवस एक करून अर्थसंकल्प तयार करतात. या अर्थसंकल्पाची सुरूवात ही एका सोहळ्याने होते. हलवा सोहळा असे या सोहळ्याचे नाव आहे. हा सोहळा वर्षानुवर्षापासून सुरू आहे.

    नवीन अर्थसंकल्पाची तयार करण्याची प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होते. म्हणजेच याची सुरूवात सर्क्युरलरच्या माध्यमातून होते. देशातील सर्वात महत्वाच्या आणि सर्वच विभागात सरकारकडून एक सर्क्युरलर पाठविण्यात येते. ज्यात त्या-त्या विभागाला आगामी वर्षभराच्या खर्चाची माहिती, त्यांच्या वर्षभरातील नव्या योजनांची आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची इतंभूत माहिती देणे आवश्याक असते. प्रत्येक विभागातून देण्यात येणाऱ्या ही माहिती अर्थसंकल्पाच्या निर्मीतीत अत्यंत महत्वाचे मानले जाते. यानंतर कोणत्या वस्तूवर किती कर आकारला जायचा याविषयी स्टेकहोल्डर्स रायसीना हिल्सवर येवून याविषयी चर्चा करतात.
    अर्थसंकल्पाच्या निर्मीतीमध्ये हा टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण यामुळेच आगामी वर्षभरात देशात घडामोडी घडत असतात. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हितचिंतकांची एक बैठक घेण्यात येते. या बैठकीत सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांना अपेक्षित असणारे सर्व बदल बैठकीनंतर करण्यात येत असतात.

    जेव्हा अर्थसंकल्पासाठी आवश्ययक असणारी सर्व माहिती गोळा केली जाते त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे टाईपिंग आणि प्रिटींगचा. या टप्प्यावर सर्वच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची करडी नजर असते. यातम उच्च पदस्थ अधिकारी, प्रिंटींग टेक्नि शियन आणि स्टेनोग्राफर एक प्रकारे शेवटचे सात दिवस तर कैद असल्याप्रमाणेच काम करत असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियांशीदेखील बोलण्याची परवानगी नसते. जर एखाद्या अधिकाऱ्याच्या कुटुंबात आपत्कालिन परिस्थिती आलीच तर त्यांना केवळ संदेशाच्या माध्यमातून माहिती देण्याची परवानगी असते. परंतू, संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या कुटुंबियाशी बोलण्याचा अधिकार नसतो.

    संयुक्तत सचिवांच्या अध्यक्षतेखालील इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमवर आणि त्यांच्या फोन कॉल्सवर बारिक नजर ठेवतात. खास करून स्टेनोग्राफरवर जास्त पाळत ठेवली जाते. अर्थसंकल्पाची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे संगणक नॅशनल इन्फॉर्मेशन सेटरच्या सर्व्हरपासून वेगळे ठेवले जातात. एवढेच नाही तर नॉर्थ ब्लॉकमध्ये एक पावरफुल मोबाईल जॅमर लावण्यात येते जेणेकरून कोणत्याही अधिकाऱ्याकडून इथली माहिती बाहेर पडता कामा नये.

    केंद्रीय अर्थमंत्र्यांचे संसदेतील अर्थसंकल्पाचे भाषण हे सर्वात गोपनिय कागदपत्रे असतात. त्यामुळे याची छपाई अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदर मध्यरात्रीच करण्यात येते. दरम्यान, ज्याठिकाणी या भाषणाची तयारी करण्यात येते त्या स्टेनोग्राफरच्या विभागात अर्थमंत्र्यासह इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी कधीही भेट देवू शकतात त्यामुळे याठिकाणची सुरक्षितता ही देशातील सर्वोच्च मानली जाते. पुर्वी अर्थसंकल्पाची छपाई ही राष्ट्रपती भवनातून होत होती मात्र १९५० मध्ये अर्थसंकल्प संसदेत सादर होण्याच्या अगोदर लिक झाल्यानंतर इथून होणारी छपाई थांबविण्यात आली. त्यानंतर मिंट रोडच्या एका ठिकाणी याची छपाई करण्यात येत होती. मात्र १९८० पासून ते आजपर्यंत अर्थसंकल्पाची छपाई ही नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची निर्मीती ही नॉर्थ ब्लॉकमध्ये करण्यात येते. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये पुर्णपणे वेगळे ठेवण्यात येते. त्यांना जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करत नाहीत तोपर्यंत सुट्टी देण्यात येत नाही ज्यावेळी अर्थसकंल्पाचे संसदेत वाचन पुर्ण होते त्याचवेळी या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येते.

    दरम्यान, यासर्व प्रक्रियेनंतर संसदेत अर्थसंकल्पाचे केंद्रीय अर्थमंत्री सादरीकरण करतात. तसेच संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी राष्ट्रपतींच्या मंजूरी घेणेही बंधनकारक असते. तसेच संसदेत सादर करण्याच्या अगोदर युनियन कॅबिनेटच्या समोर अर्थसंकल्प सादर करण्यात येते. दरम्यान,सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पाचे अर्थमंत्री वाचन करतात. दरम्यान, यानंतर संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होते. साधारण ही चर्चा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून पुढे चार दिवस चालते. या चर्चेनंतर संसदेचे अध्यक्ष संसदेत सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अनुदानवर मतदान घेते आणि त्यांनतर विनीयोग विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान होते. या मतदानानंतर ७५ दिवसांच्या आत हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतिकडे पाठविण्यात येते.त्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुर्ण होते.

    संकलन संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      February 1, 2017


  • नवशुद्रांच्या निर्मितीचे कटकारस्थान

    परीक्षेच्या दडपणामुळे मुलांना शाळेविषयी, शिक्षणाविषयी आकर्षण वाटत नाही, असा अतार्किक तर्क देत सरकारने इयत्ता आठवीपर्यंत परीक्षाच घ्यायची नाही किंवा कोणत्याही कारणाने संबंधित विद्यार्थ्याला नापास करायचे नाही, असा कायदा केला.

      May 23, 2010


  • रसिकांच्या मनातलं !

    शास्त्रीय गायन व वादन पुर्वापार चालत आलेल्या कला विशेषतः भारतात घराण्यांवरून ओळखल्या जाणार्‍या शैली आहेत. त्यात रागधारी हा शास्त्रीय गायन वादनाचा गाभा आहे. चांगलं गाणं किंवा गीताचा कुठलाही प्रकार उदा. भाव भक्ती व नाटयगीत तसेच कविता जुनीगाणी पोवाडा व लावणी यांच्या शब्दरचना गोड व मधुर सुर ताल व लयीत ऐकायला मिळाल्या तर मनावरील ताण आटोक्यात आणण्यासाठीचे औषध आहे.

      June 28, 2011


  • द बर्निंग ट्रेन चित्रपट

    चाळीस वर्षांपूर्वी व्ह्युजअल आणि साऊंड इफेक्ट्सना मर्यादा होती. चित्रपटातील अखेरचा मुंबई सेंट्रलचा खेळण्यातल्या ट्रेनचा प्रसंग वगळता संपूर्ण सिनेमाची हाताळणी दिग्दर्शक रवी चोप्रांनी चित्तथरारक अशीच केली होती.

      March 28, 2022


  • सिनेमा बनताना – मौसम

    ”मेरी  इश्क के लाखो  झटके “ गाण्याच्या वेळी काही स्टेप शर्मिला टागोरला येत नव्हत्या. त्यावेळी शेजारच्या सेटवर सरोजखान डान्स डायरेक्ट करत होत्या त्यांना गुलजारनी विनंती करून या गाण्याच्या स्टेप बसवायला सांगितल्या.

      September 5, 2022


  • चॉकलेट चिप्स कूकीज दिवस

    लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आवडता खाद्यपदार्थ म्हणजे कूकीज. कूकीज न आवडणारे फार क्वचितच आढळतील. उलट हा पदार्थ खाऊ म्हणून बऱ्याचदा आपल्याला डब्यात बऱ्याचदा मिळतो. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सगळी कामं भरभर झाली पाहिजेत असाच विचार प्रत्येकजण करीत असतो , पण बरेचदा ह्या धावपळीत भूक लागलेली असताना आपल्याला तिच्याकडे दुर्लक्ष करावे लागते , का? तर इतर पदार्थ खायला जास्त वेळ लागतो म्हणून. पण अशावेळी कूकीज आपल्या मदतीला धावून येऊ शकतात. एकतर त्या खायला जास्त वेळ जात नाही आणि दुसरं म्हणजे आकाराने लहान असतात त्यामुळे आपण आपल्यासोबत त्या सहजरित्या घेऊन जाऊ शकतो , म्हणजे एका बाजूला आपलं काम पण वेळेत पूर्ण आणि आपापली भूक पण तात्पुरत्या स्वरूपात भागते.

    आज ४ ऑगस्ट , ह्या तारखेला चॉकलेट चिप्स कूकीज दिवस परदेशात साजरा केला जातो. ह्या दिवसाचा नक्की असा इतिहास कोणी सांगू शकत नाही.

    आपल्याला ह्या दिवसाच्या इतिहासाशी काही देणंघेणं नाही. आपण पटकन ह्याला बनवण्याची कृती जाणून घेऊ.

    वन लूक
    रेसिपी type: Baking
    वेळ: 1.5 ते 2 तास
    खाण्याचा प्रकार : Veg

    आवश्यक घटक

    2 कप (240 ग्रॅम) मैदा

    2 छोटे चमचे बेकिंग पावडर

    एक कप (120 ग्रॅम) ब्राउन शुगर (ब्राउन शुगर)

    एक कप (120 ग्रॅम) Salted Butter

    एक चिमूटभर दालचिनी पावडर

    5 ( मोठे )चमचे दूध

    50 ग्रॅम चॉकलेट चीप

    2 चमचे चॉकलेट सार ( इसेन्स )

    पद्धत
    मैद्यामध्ये बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स करा.ओव्हनला 180 डिग्री सेन्टिग्रेट किंवा 356 डिग्री सेल्सियट प्री-हिट करा. एक कटोरी बटर ब्राऊन शुगर टाकून, साखर विरघळेपर्यंत चांगली फेटा. मग बटरसोबत दूध , चॉकलेट सेन्स आणि दालचीनी पावडर चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर चॉकलेट चिप्स विरघळवून, दुधाच्या-बटरच्या मिश्रणात टाका आणि चांगल्या पद्धतीने मिसळा. आता चाळलेल्या मैद्याच्या पीठाचा गोळा करून घ्या. आता एका ओव्हनच्या ट्रेला लोणी ( butter ) लावून घ्या. मैद्याच्या पीठाचे छोटे-छोटे बॉल तयार करून दोन हातां मध्ये ठेवून त्याला चपट बनवा आणि वरच्या बाजूने २- ३ चॉकलेट चिप्स ठेवून त्याला हलकेच दाबा. अशा पद्धतीने सर्व कुकीज तयार करा आणि ट्रेमध्ये ठेवत जा. नंतर प्री-हीटेड ओव्हन मध्ये कुकीज ठेवून तपकिरी होईपर्यंत बेक करावे, ओव्हनमधून कुकीजची ट्रे काढा. एगलेस चॉकलेट चीप कुकीज सज्ज आहेत. तुम्हाला हवे तेव्हा सर्व्ह करा.

    मित्रांनो ही सहज सोपी कृती आहे. घरी नक्की try करा आणि हो कूकीज बनल्या की मला पाठवायला विसरू नका.

    कृती संदर्भ :- टीम पकवानगली , नई दिल्ली

      August 4, 2020