(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गौतम बुद्धाच्या लेकरांना जवळ घ्या

    लक्ष्मण माने यांना मी साता-याला भेटलो आहे. मध्यंतरी त्यांच्यावर काही आरोप झाले होते त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही. पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याची कारणे देणारा लेख मात्र तमाम हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

    बौद्धधर्म हि एक स्वतंत्र विचार धारा आहे. गौतम बुद्धाचा जन्म हिंदू राज घराण्यात झाला होता .बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून खरे तर हिंदू समाजावर उपकारच केले आहेत.

    कल्पना करा कि - बाबासाहेबांनी बौद्ध धर्म न स्वीकारता मुस्लिम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला असता तर या देशांत काय झाले असते. दलितांवर परंपरागत शेकडो वर्षे केलेल्या अत्याचाराची परिणीती म्हणजे प.पु. बाबासाहेबांचे धर्मांतर हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. या नंतरचा काळ कसा असेल याची कल्पना या लेखातून आली आहे. मी या लेखाशी पूर्णपणे सहमत आहे. समाजात potential difference असलेली अनेक माणसे असतात. पण त्यांना समाजानी नीट वागणूक दिली नाही तर असे धर्मांतर होते.

    आपल्या देशाच्या पूर्वेकडील अनेक राष्ट्र बौद्ध धर्मियांनी व्यापली आहेत. दलितांनी हा धर्म स्वीकारला म्हणून या धर्मालाच "दलित" लेखण्याचा मूर्खपणा काही मंडळी करीत असतात. पूर्वी काही मंडळींना हा धोका जाणवला होता म्हणून त्यांनी गौतम बुद्धाला विष्णूचा १० वा अवतार असल्याचे जाहीर केले होते. हिंदू-बौद्ध याच मातीत वाढले, मोठे झाले याची जाणीव सतत ठेवून वागले पाहिजे. माउली त्यांच्या पसायदानातून सतत हाच तर संदेश देतात. पण लक्षात कोण घेतोय ?

    असो सर्व बौद्ध आणि हिंदू भावंडांना शुभ कामना. हरी ओम !!! नमो बुद्धाय !!!!

    -- चिंतामणी कारखानीस

      November 12, 2015


  • जागतिक कागदी पिशवी दिवस

    हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करणे. दीडशे हून अधिक वर्षे पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे.

      July 12, 2021


  • गल्लीत शिकले – दिल्लीत रमले

    वडिलांबरोबर राजकारणाचे धडे गिरवायला मिळाले तरी आज खासदार म्हणून स्वतंत्रपणे वाटचाल करावी लागत आहे. सर्वात तरुण खासदार म्हणून नावलौकीक मिळाला असला तरी वाढत्या जबाबदारींची जाणींवही होती. हीं जबाबदारी पेलताना पक्षातील कार्वकर्त्यांबरोबरच अन्य पक्षातील सदस्यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळे गल्लीतून सुरू झालेली दिल्लीची वाटचाल उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सफल राहिली आहे.

      April 12, 2024


  • वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – झाडाचा जन्म – १

    झाडांच्या बिया आपण नेहमीच पाहतो. पण त्यांतील दिव्यत्व आपल्याला जाणवत नाही. त्यांत बंदिस्त असलेल्या सांकेतिक आनुवंशिक आज्ञावल्या निसर्गाला वाचता येतात.

      December 23, 2016


  • राष्ट्रीय रायफल्सची टीम व अशोक चक्र विजेता

    जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत.जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.

      February 5, 2017


  • दिशा बदलण्याची गरज

    प्रकाशन दिनांक :- 25/01/2004
    देशात सर्वत्र सध्या ‘फिल गुड’ चा बोलबाला आहे. एका मागोमाग एक घोषणांचा सपाटा लावीत सरकार प्रत्येकाला खूष करण्याच्या प्रयत्नात दिसते. तसेही निवडणुकीचे वर्ष असले की, सर्वसामान्य जनता खूष असतेच.

      January 25, 2004


  • मधुमेहींसाठी आहारनियमन

    हल्ली समाजात डायबिटीस झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. तरीही कोणतीही व्याधी किंवा आजार हा आपल्याला होणारच नाही, अशी समजूत बऱ्याच जणांची असते; परंतु एकदा का एखाद्या आजाराचं निदान झालं, विशेषतः डायबिटीसच, की अशी मंडळी घाबरून जातात.

      July 1, 2023


  • अमरीश पुरी

    काही माणसे अमर असतात तसेच अमरीश पुरी. मला त्यांना अनेकवेळा स्वाक्षरीच्या निमित्ताने भेटता आले ,

      July 23, 2021


  • भारतीय रेल्वे आणि संगणकीकरण

    भारतीय रेल्वेत संगणकीकरणाने विलक्षण क्रांती घडवून आणलेली आहे. ही प्रगती गेल्या २० ते २५ वर्षांतील असून, रोज ४००० पेक्षा जास्त जागांवरून १५ ते २० लाख तिकिटांचं भारत भरातील ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं आरक्षण केलं जातं. आता 'इ' रिझर्व्हेशनमुळे तर हजारो तिकिटं खिडकीशी न जाता आरक्षित करण्याची सोय आहे.

    रेल्वेच्या या विभागाला पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पी.आर.एस.) म्हणतात. याकरता लागणारं सॉफ्टवेअर 'क्रिस' (सी.आर.आय.एस.) पद्धतीचं असून, याकरता भारतभर पाच डाटा सेंटर्स (दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद) आहेत. त्यांचे सगळे सर्व्हर्स एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतभरातून कुठूनही कुठल्याही विभागातील गाडीच्या तिकिटाचं आरक्षण मिळतं. याकरता रेल्वेचे १० विभाग केलेले आहेत. ही भारतीय रेल्वेची सर्वांत अद्ययावत संगणकीकरणप्रणाली असून, त्यासाठी भारतीय रेल्वेला २००९ सालातील 'वेबरत्न प्लॅटिनम आयकॉन अॅवॉर्ड' मिळालेलं आहे; तसंच १९९९ सालात 'कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया' यांचं 'बेस्ट आयटी यूजेस'बद्दल बक्षीस मिळालेलं आहे.

    क्रिस प्रणाली अंतर्गत जवळजवळ ३५ विभागांकरता सॉफ्टवेअर्स वापरलेली आहेत. त्यामुळे तिकीटआरक्षण, तिकिटावर दिसणाऱ्या सर्व बाबी, गाड्यांचं टाईम टेबल, गाडी कुठे आहे, इंजिनं, मालगाडीचे डबे, यार्ड्स, प्रत्येक डब्यावरील प्रवाशांच्या नावांचे चार्ट्स, तिकिटांचं कॅन्सलेशन, वेट लिस्ट व रोज प्रत्येक टर्मिनलला जमणारे पैसे, अशा अनेक गोष्टींची माहिती संगणकावर मिळू शकते SATSANG Software रेल्वे टाईम टेबल व गाडीची येण्याची जाण्याची वेळ या करता वापरलं जातं. 'इंटिग्रेटेड मल्टिप्लाय ट्रेन पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम' (आय.एम.टी.पी.आर.एस.) द्वारे आता मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून प्रवाशांना ते प्रतीक्षा यादीत आहेत किंवा त्यांचं तिकीट नक्की झालं आहे हे कळू शकणार आहे, याकरता आता इंटरनेट उघडण्याची गरज पडणार नाही. क्रिस, सी.एम.सी., आय.एम.टी.पी. आर. एस. (concert are based on 3- Tier server client architecture with Mesh Type Topology) या अद्ययावततेमुळे जास्तीत जास्त प्रमाणात पारदर्शकता आणली गेलेली आहे. सर्वसाधारण प्रवाशाला कळू शकेल अशा सुधारणा रोजच्या रोज केल्या जात आहेत. या यंत्रणेत अकस्मात बिघाड होऊ नये म्हणून 'स्ट्रक्चरल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी' अर्थात 'रचनात्मक आपत्कालीन व्यवस्थापन धोरण' अमलात आणलेलं असून, फिजिकल डिझास्टर अर्थात शारीरिक आपत्तीपासूनही संरक्षण देण्याची यंत्रणा आहे. १०० टक्के सुरक्षित यंत्रणेकरता ज्या काही त्रुटी आहेत त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालूच आहेत. या क्रांतीमुळे रांगेत उभं राहून तिकिटं काढण्याचा जुना कंटाळवाणा प्रघात आता इतिहासजमा झाला आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

      November 13, 2022


  • ऑक्सि बँक

    अमर्याद वाढणारी लोकसंख्या, त्यांच्या गरजा आणि पायभूत सुख-सोयी निमार्ण करण्यासाठी वापरले जाणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातून रोजचे वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण आणि त्यावर मात करण्यासाठी अमलात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत आणि भविष्यात हीच मोठी अडचण ठरणार आहे. आज आपला परिसर ध्वनी, जल, वायू आणि माहित नसलेल्या अनेक प्रदूषणाने व्यापला आहे आणि त्यातून कोणाचीही सुटका नाही असा अनुभव आहे. मग यावर उपाय काय?

      October 11, 2014