(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पैशाचे डिजिटल रूप

    रिझर्व बँक ऑफ इंडियाने भारतामधील पैशाच्या आधुनिकीकरणाला सर्वात मोठा हातभार लावलेला आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) या दोन संगणकीकृत सुविधांमुळे रोख पैशा ऐवजी सरसकट कार्डाचा वापर करता येणे शक्य झाले.

      January 12, 2023


  • सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता

    1972 चा दुष्काळ आठवतोय,
    माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो !
    पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
    त्यामुळे देशात शांतता होती !

    रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती.
    पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
    त्यामुळे देशात शांतता होती !

    गॅससाठी नवीन नंबर लावायचा तर दोन तीन वर्षे वेटिंग असायचे, गॅस कनेक्शन साठी सुद्धा पाच पाच तास लाईन मध्ये उभे असायचो आपण,
    पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
    त्यामुळे देशात शांतता होती.

    एवढंच काय, शासकीय दूध योजनेतील दुधाची बाटली घेऊन सकाळीच रांगेत उभे रहायचो, मग तिथली भांडणं, शिवाय त्यासाठीचे कार्ड काढायला ऑफिसमध्ये रांग लावायचो,
    पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
    त्यामुळे देशात शांतता होती.

    सार्वजनिक नळावर रांग, सरकारी दवाखान्यात रांग, कास्ट सर्टिफिकेटसाठी रांग, std बूथ बाहेर रांग, कॉलेजला ऍडमिशन फॉर्म मिळवण्यासाठी रांग.... ही रांगेच्या आठवणींची रांग कितीही लांबू शकेल,
    पण हे सर्व होतं तेव्हा ही टीव्ही चॅनेल्स नव्हती,
    त्यामुळे देशात खरंच शांतता होती !

    आजही, दूरदर्शन सोडून इतर चॅनेल्स एक दिवस बंद ठेवा,
    तुम्हाला लक्षात येईल,
    देशात खरंच शांतता आहे !

    -- संजीव सुळे

      November 21, 2016


  • विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता – अ. २  श्लो १२

    विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता – अ. २ श्लो १२

    आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्‍या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे.

      December 17, 2016


  • श्री गणेश अवतारलीला ४ – श्री उमांगमलज अवतार

    भगवान गणेशांचा भाद्रपदातील जन्मोत्सवा असो की माघ महिन्यातील. अनेक जागी गणेश जन्म म्हटला की एकच कथा ऐकवली जाते. देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून गणपती तयार केला. इ. गंमत अशी आहे की देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून झालेल्या उमांगमलज अवताराची जी कथा आपण ऐकतो ती ना भाद्रपद चतुर्थीची आहे ना माघ चतुर्थीची. ती कथा आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीची.

      September 5, 2019


  • सीमोल्लंघन करायलाच हवं आता…

    पुणे येथील मानसतज्ज्ञ आणि करिअर काऊन्सेलर मयुरेश उमाकांत डंके यांचा WhatsApp वरुन आलेला लेख

      May 29, 2017


  • सत्कार – नगरसेवकांचा की नागरिकांचा

    नुकत्याच महाराष्ट्रात काही मोठ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूका पार पडल्या. या वेळच्या निवडणूका काहीश्या अटीतटीच्या वातावरणातच झाल्या. सख्ख्या चुलत समजल्या जाणाऱ्या ‘दोन भावां’मधल्या या निवडणूकांकडे त्या भावांसकट सर्वांचेच लक्ष होते.

      March 24, 2017


  • “नोटबंदि…एक हजाराची नोट’ – एक अनुभवकथन

    लासलगावला दवाखाना चालवणाऱ्या डाॅक्टर मित्राला आलेला अनुभव,”नोटबंदि…एक हजाराची नोट.!खरंच विचार करणारी हि गोष्ट आहे. आपल्या देशात अजूनही गावागावात अशिक्षित, अडाणी तसेच आंगठे बहादूर लोक आहेत. कितीतरी स्वार्थी लोक या भोळ्या भाबड्या लोकांना आर्थिक व्यवहारात फसवतात.

      October 17, 2017


  • छत्रपती संभाजी महाराजांचा ‘झंझावात’

    माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३४३ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३९३ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !
    त्याआधी आम्ही तुम्हांस ३४४ वर्षे मागे नेतो…..

    आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !

      June 10, 2024


  • श्रीगणेशाचे आध्यात्मिक महत्त्व

    गणपतीच्या चार हातात कुऱ्हाड, दोरी, मोदक आणि कमळ आहे. कुऱ्हाड, आध्यात्माच्या कुर्‍हाडीने इच्छेचा नायनाट करता येतो. दोरी हे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आपल्याला संसारापासून, भौतिक जगापासून दूर करण्यास मदत करते, ज्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. मोदक हे साधकाला आध्यात्मिक साधनेतून मिळणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे. आणि कमळ म्हणजे आत्म-साक्षात्काराच्या त्या दैवी अवस्थेसाठी ज्याची प्रत्येक मनुष्य जाणीवपूर्वक किंवा नकळत इच्छा करतो.

      February 4, 2022


  • चोर कृष्णाची दही हंडी

    मराठी भाषा किती प्रगल्भ आहे पहा. पंढरीच्या विठुरायाला कृष्णाचे रूप मानून अभंग गायला जातो,
    ” गळा बांधुनिया दोर, धरला पंढरीचा चोर”
    देवाला चोर म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्णालाही माखन चोर म्हणतात. कृष्ण दही-लोणी चोरत असे. त्यासाठी गोकुळातील सवंगड्याना एकत्र बोलवी आणि गोकुळातल्या महिलांनी वर बांधून ठेवलेल्या मटक्यातील दही किंवा लोणी चोरून वाटून खात असे.

      March 8, 2026