(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग त्रेसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 19-पुष्प सातवे

    पत्री पूजे मधे आणखी कोणाकोणाला मान दिला आहे तो पाहू.
    माका, बेल, धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली वांगी, कण्हेर, रूई, अर्जुन, गोकर्ण, वड, ताड, केवडा, निर्गुंडी, इडलिंबू किंवा महाळुंग, आवळा, अशोक, दुर्वा, कदंब, ब्राह्मी, जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चमेली, सायली, चाफा, इ. अनेक वनस्पतींची पाने देव आणि विशेषतः देवींसाठी सांगितलेली आहेत.
    यातील काही नावे कळणार नाहीत, गुगल गुरूजींना विचारलेत तर फोटोसहीत दाखवतील.

    ही सर्व पाने आपल्या अवतीभवती असतात. फक्त अज्ञानामुळे आपणाला त्याचे उपयोग माहिती असत नाहीत. पण प्रसंगी जीव वाचण्यासाठी सुद्धा काही पाने उपयोगी ठरतात.

    पानफुटी किंवा घावमारी किंवा कोंबाचे पान नावाची वनस्पतीचे पान रक्तस्तंभक आहे. म्हणजे कोणत्याही अवयवातून होणारा रक्तस्राव, किंवा बाह्य आघातामुळे जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी ही पाने जादूसारखी काम करतात. जखमेच्या आकारानुसार याची दोन तीन पाने वाटून ही पानांची चटणी जखमेवर लावली असता, जखम पटकन भरून येते.
    पेरूचा पाला, लाजरीचा पाला अशाच प्रकारे काम करतो. विशेषतः मुळव्याधीचे रक्त थांबवण्यासाठी पोटातून सुद्धा या पानांची चटणी खावी.

    जाईचा पाने चावत राहिली तर तोंडात येणारे उष्णतेचे फोड कमी होतात.

    तुळशीचे पान तर कफ विकारावर हुकुमी एक्काच आहे.

    हे सर्व उपचार करताना कोणातरी वडीलधारी माणसांची मदत घ्यावीच. यासाठी ते आपल्या जवळ असावेत,( वृद्धाश्रमात नसावेत. ) अन्यथा याचे प्रमाण, वापरायची पद्धत हे सर्वच काही लिहिता सांगता येत नाही ना. यासाठी गुरू हवा. जवळपास असणाऱ्या वैद्यांना भेटून त्यांच्या सवडीनुसार निसर्गाने दिलेल्या या अमूल्य ठेव्याचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे. अशी अनेक मंडळी आपल्या अवतीभवती असतात, यांच्याकडून जेवढे मिळेल ते ज्ञान घेत जावे, शिकत रहावे, ज्ञानी होत रहावे.

    एरंडाचे किंवा कापसाचे पान टाळूवर ठेवले असता, डोके गरम होत नाही. लहान मुलांची टाळू तेलाने भरून झाल्यावर त्यावर कापसाचे पान लावण्याची आपली परंपरा आहे. आता 'अंगाला तेल लावूच नका', असं डाॅक्टरच सांगतात, तेव्हा विषयच संपला. पण या सर्व जुन्या परंपरा कालबाह्य नक्कीच नाहीत. डाॅक्टरांना देखील माहिती आहे, की या रूढीमागील आरोग्य जरी आपल्याला माहिती नसले तरी, आपण लहानाचे मोठे झालो तेव्हा आपल्या आईने आपल्याला हे सर्व उपचार केलेले होते, फक्त हे उपचार आज आमच्या पाश्चात्य धर्तीच्या सिलॅबसमधे लिखित स्वरूपात नाही, आणि आमच्याकडे यातील आरोग्य शोधून काढायची दृष्टी नाही एवढंच.

    देवाच्या नावाने का होईना पण काही वनस्पतींना आपल्या अवतीभवती जागे ठेवणाऱ्या या भारतीय रूढी परंपरंपरांना साष्टांग नमस्कार.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.06.2017

      June 12, 2017


  • बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)

    बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)

    वयाच्या ३५ नंतर हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण पुरुष-स्त्रियांमध्ये हळूहळू कमी होते; परंतु काही स्त्रियांमध्ये एकदम जोरात घसरु लागते व अशा स्त्रियांना कंरदुखी, पाठदुखी व थोड्याशा दुखापतीमध्ये फ्रॅक्चर होणे असे आजार भेडसावू लागतात. म्हणून साधारण ४० नंतर प्रत्येक व कंबरदुखी असलेल्या सर्व पुरुषांनी बी.डी.एम. हा पास करुन, आपल्या हाडांची घनता कशी आहे, हे अधूनमधून बघितले पाहिजे.

      January 10, 2011


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

    कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा

    आज काल काय झालंय.
    दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी,
    जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून !
    आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती.
    रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती !
    वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती !
    पैशांची किंमत झाली कमी आणि पैसे झाले जास्ती !
    मनमोकळ्या गप्पा झाल्यात कमी आणि चॅटींगसाठी वेळ झालाय जास्ती !

    टीव्ही वरील सर्व चॅनेल्सवरचे एकुणएक पिक्चर्स जणु काही आपल्यासाठीच बनवले आहेत. फुकट बघता येतात, म्हणून आयपीएल पण झाल्या. याच्या जोडीला "मनोरंजन" म्हणून काहीतरी हवेच ना, म्हणून दिमतीला हाय फाय सिरीयल्स आहेतच !

    सिरीयल्सच्या मधल्या जाहिरातींच काय करणार ? विचारांना एका ठिकाणी स्थिर बसू न देणाऱ्या रिमोटने दुसरी चॅनेल्स बदलली तरी तिथेही जाहिरातीच ! एकुणच काय, तुमच्या खिशातले पैसे आमच्या खिशात, आमच्यातचे तुमच्यात ! म्हणून भारतात एकवेळ थंडीची लाट येईल, पण मंदीची लाट कधीच येणार नाही.

    95 % जनतेला सिरीयल्स मधला झामझौल मोहक वाटतो. मोह निर्माण झाल्यावर त्यातून इर्षा जन्माला येते. माझ्याकडे पण हा सगळा ताकझाक हवा, असे वाटू लागते, त्यासाठी खिशात असलेले पैसे पुरणारे नसतात. म्हणून अधिकाधिक प्रयत्न सुरू होतात. ज्या झोपेसाठी रात्र आहे, त्या झोपेच्या वेळी अशा सिरीयल्स पाहून आपल्या झोपेचं खोबरं तर करतोच, पण नको ते मानस रोग पाठी लागतात. आणि दिवस पण खराब करून टाकतो.
    म्हणजे रात्रही गेली आणि दिवसही गेला.
    एवढंही पुरत नाही, म्हणून हायफाय वायफाय सुरू करून घेतलं. नको ते चॅटींग, रात्री अपरात्री सुरू झालं. डोक्यावरून पांघरुण पांघरून गप्पा रंगू लागल्या. या मॅच्युअर गप्पा अजाण पालकांना समजू नये, याचा ताण सुरू झाला. नेहमीच्या गप्पागोष्टी नकोश्या वाटू लागल्या. वेळ कसा जातोय, ते लक्षात येईनासं झालं. अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडू लागलं. हुशार मुलांची आणि बुद्धिमान मुलींची बुद्धी गहाण पडू लागली. जागरणं घडू लागली आणि नको ती स्वप्न पडू लागली.
    रात्रीचर्या बिघडू लागली.
    तरूण तरूणींच्या चेहेऱ्यावरील चर्या बिघडू लागली.

    दिवस आणि रात्रीची कामं पुरती बदलून गेली आणि समाजाची घडी सगळी विस्कटून गेली.

    यम नियम न पाळता, अनावश्यक आरोग्य नियम, यम बनू लागला आणि "यम" आपला पाश आवळू लागला.
    जगण्याची भीती वाटू लागली आणि मरण येऊ नये म्हणून औषधे ही गरज बनली.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.05.2017

      May 21, 2017


  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 13

    एवढा सगळा खटाटोप कशासाठी ?.....
    गेली चाळीस पन्नास वर्षे झाली, आमची वाढ होऊन, आत्ता कशाला एवढं बदलायचं ?...
    आमची अर्धी लाकडं गेली मसणात.....
    काय वाढणारे आयुष्य असं वाढून वाढून....
    आणि खाव्या लागल्या अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणून कुठे बिघडणार आहे ?......
    जगात एवढी लोक खातातच आहेत ना या अॅलोपॅथीच्या गोळ्या. ती काय सगळी वेडी आहेत का ?......
    विज्ञानावर, त्याच्या नवनवीन शोधांवर, या आयुर्वेदीक वैदूंचा अजिबात विश्वास म्हणून नाही. भोंदूगिरी सगळी.....

    असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आत खदखदत आहेत, हे कळतंय....
    आजची टीप त्यांच्यासाठी...

    आयुर्वेद सांगतो, निरामय जीवन जगावं. औषधांशिवाय जगावं, दिलखुलास जगावं, आपण निरोगी रहावं, इतरांना निरोगी होण्यास मदत करावी.
    औषध कसं असावं यावर आयुर्वेद सांगतो, एक औषध घेताना अन्य कोणत्याही स्वरूपाचा बिघाड शरीरावर दिसू नये, आजच्या भाषेत सांगायचे तर कोणतेही साईड इफेक्ट, म्हणजे दुष्परिणाम नकोत. ज्या कारणासाठी औषध घ्यायचं ते कारण नाहीसे झालं की, औषध बंद व्हायला हवं.

    पण आज काय होतंय ? आणि काय चाललंय ? हे सर्व आपल्याला दिसतंय.....
    जगण्यासाठी, मरेपर्यंत औषधंच औषध!

    त्यापेक्षा जीवनशैलीमधेच थोडेफार बदल केले, विचारामधे थोडी सकारात्मकता आणली की झालं.

    काही आजार वंशपरंपरेने येतात, असे सांगितले जाते, हे पण अर्धसत्य आहे. जसे घरात एकाला "ह्रदयरोगी" असा शिक्का बसला की, त्याचे अख्खे घराणे वाताचे रोगी बनून जाते.

    कारण ?
    डाॅक्टरनी सांगितलेले चुकीचे पथ्यापथ्य.

    भीतीने असेल किंवा आमच्यासाठी कुठे वेगळं करत रहाणार, या कारणाने असेल, पण, त्या एकाच्या जेवणातले तेल, तूप, नारळ, शेंगदाणे, आदि सर्व स्निग्ध पदार्थ बंद केल्यामुळे, सगळ्याच्याच जेवणातील स्नेह आटून जातो. (जेवणातील आणि जीवनातील सुद्धा !) आणि अख्खं घराणं चुकीच्या आहाराची शिकार होते. हे तसंच्या तसं पुढच्या पिढीत काॅपी पेस्ट होतं आणि नवीन (वंश /देश )परंपरा सुरू होते.

    आपल्या घरात तर अशी चुकीची परंपरा सुरू तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवावे, यासाठी आपली वंश परंपरा, देश परंपरा नीट तपासून पहायला हवी. इतिहास आणि पुराणे वारंवार नव्याने अभ्यासायला हवीत.

    ही नव्याने निर्माण होणारी चुकीची आहार परंपरा आपल्याला थांबवायची, बदलवायची आहे.

    आणि मुख्य म्हणजे आपली (दोन किंवा एक) मुले. ज्यांच्या खांद्यावर आपण आपले भविष्य ठेवणार आहोत, ते सक्षम नकोत का व्हायला ? आम्ही ज्या चुका केल्या, किंवा करतोय त्याची चुकीची फळे त्यांना भोगायला लागू नयेत, मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब, संधीवात, स्थौल्य, पीसीओडी, थायराॅईड सारखे पसरत जाणारे आजार आपल्या घरात येऊ नयेत, यासाठी आपणच वेळीच सावध होऊन, बदलायला हवे.

    मुलं आपलं अनुकरण करत असतात. काही गोष्टी न शिकवता आपल्याकडून शिकत असतात. याचे भान पालक म्हणून आपण ठेवायलाच हवे. माझ्या आई वडिलांच्या लहानपणी असलेली सकाळी सायंकाळी जेवायची वेळ एका पिढीने बदलली, आणि चुकीच्या रोगांची मालिका सुरू झाली. असे लक्षात येतेय. म्हणून आपणच जर आपल्या घरातील जेवायची वेळ बदलवायचे सकारात्मक नियोजन केले तर (तथाकथित) पिढीजात आजारापासून आपण आपल्या भविष्याला वाचवू शकतो.
    अजूनही वेळ गेलेली नाही.

    मी बदललो...
    माझे घर बदलले....
    असंच प्रत्येकाच्या घरी होत राहिलं तर...
    लक्षात येईल.....
    मेरा देश बदल रहा है..
    सारा देश बदल रहा है......

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.03.2017

      March 8, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचाहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा

    देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
    कशासाठी?
    वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )

    एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
    असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )

    सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !

    अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
    काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !

    बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !

    काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.

    चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.06.2017

      June 25, 2017


  • किचन क्लिनीक  – शेंगभाज्या – फरसबी

    किचन क्लिनीक – शेंगभाज्या – फरसबी

    हिला वालपापडी असे देखील म्हटले जाते.संपुर्ण भारतात ही भाजी अत्यंत प्रसिध्द आहे.विशेषत: चायनीज पदार्थ बनवताना हिचा भरपूर वापर केला जातो.तसेच पंजाबी डिशेस मध्ये देखील हि वापरतात.हिची भाजी,उसळ देखील केली जाते.तसेच बिर्याणी,पुलाव ह्याच देखील हि घालतात.

    २-३ हात उंचीच्या झाडाला ह्या फरसबीचा शेंगा लागतात.ह्या कोवळ्या शेंगांचा वापर खायला केला जातो.हि भाजी चवीला गोड तुरट असून थंड असते त्यामुळे ती शरीरातील वात दोष वाढविते व कफपित्त हे दोष कमी करते.

    चला तर आता हिचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)गजकर्णा मध्ये फरसबीच्या पाल्याचा रस व लसणीचा रस एकत्र करून लावावा.

    २)खोल चरणा-या जखमेमध्ये फरसबीच्या पाल्याच्या रसात कापुस बुडवून वात करावी व दर दिवशी अशी नवीन वात त्या जखमेत ठेवावी साधारण पणे ३ आठवड्यात जखम भरते.

    ३)डोळ्यांची शक्ती वाढवायला इतर उपचारांसह रोज रात्री कोवळ्या फरसबीची भाजी जेवणात ठेवावी.

    ४)ज्या मधुमेह झालेल्या व्यक्तिच्या लघ्वीतून साखर जात असेल त्याला कोवळ्या फरसबीच्या शेंगा उकडून त्याला हळदींची फोडणी देऊन खायला द्यावी.

    फरसबी खायचा अतिरेक केल्यास पोटात दुखणे व संडासला घट्ट होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 27, 2016


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुदीना

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुदीना

    पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात.

    ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप असते.ह्याची पाने आपण स्वयंपाकात वापरतो.ह्या पानांना एक छान ताक्ष्ण सुगंध येतो.

    पुदीना हा चवीला तिखट व उष्ण असतो आणी तो शरीरातील वात व कफ दोष कमी करतो.ह्याचा वापर जसा स्वयंपाकामध्ये होतो तसाच तो घरगुती उपचारात देखील केला जातो.

    चला तर पाहूयात ह्याचे औषधी उपयोग:

    १)वेदना असलेल्या भागावर पुदिन्याची चटणी वाटून तिचा लेप लावावा.

    २)नैसर्गिक माऊथवाॅश होय,पुदिन्याचा २ चमचे रस ग्लास भर कोमट पाण्यात घालून गुळण्या करा म्हणजे मुखदुर्गंधी कमी होते.

    ३)भुक न लागणे,तोंडास रूची नसणे,ह्यात पुदिन्याची चटणी खायला द्यावी.

    ४)त्वचेवर नायटा झालं असल्यास त्या जागी पुदिन्याच्या पानांचारस लावावा.

    ५)पोटदूखीमध्ये १ चमचा पुदीना रस+ १ चमचा आल्याचा रस+ १/४ चमचे सैन्धव घालून हे मिश्रण घ्यावे.

    ह्याचे जास्त सेवन केल्यास एॅसीडीटी होऊ शकते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 28, 2016


  • किचन क्लिनीक – लोण्याचे औषधी उपयोग

    अ)दूधापासून तयार केलेले लोणी:

    १)वारंवार पातळ भसरट संडास होत असल्यास १० ग्राम लोण्याचा समावेश दोन्ही वेळच्या जेवणात करावा.

    २)ज्यांना वारंवार नाकाचा घोळणा फुटण्याची सवय असते त्यांनी जेवणानंतर १ मोठा चमचा लोणी समभाग साखर घालून खावे व त्यावर तासभर पाणी पिऊ नये.

    ३)डोळ्यांची आग होत असल्यास,वाचताना डोळे दुखत असल्यास,डोळे कोरडे वाटत असल्यास १ चमचा लोणी,१ चमचा मध,व १ चमचा त्रिफळा चुर्ण हे मिश्रण चाटण करून खावे मात्र त्यावर पाणी व इतर खाद्य पदार्थ खाऊ नये.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 19, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग ५

    आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे. आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. !

      July 31, 2017


  • आजचा आरोग्य विचार – भाग बारा

    हे सर्व शरीर, मन, आत्मा, इंद्रीय व्यापार, संसार, प्रपंच, परमार्थ हे सर्व कशासाठी? असे चिंतन करताना जाणवते की, आपण या सृष्टीकर्त्यांच्या हातातील एक बाहुले आहोत. जसं रंगमंचावर एकेका कलाकाराचा प्रवेश होत असतो, त्याचा संवाद संपला की तो दुसऱ्या बाजूने रंगमंचावरून मागे जातो. पुनः तिस ऱ्या बाजूने पुनः प्रवेश घेतो. समोर काही पात्रे नाचत असतात. त्यांच्या बरोबर काही वेळ काही संवाद करायचे आणि पुनः निघून जायचे असते.

      February 12, 2018