केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०१५ साली ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा करण्याचे घोषित करण्यात आला होते.
हातमाग उद्योगाला अच्छे दिन
खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत होती. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होते आणि त्याच्या मोबदल्यात खाण्यास लागणारे अन्नधान्य मिळत होते. शेतात उत्पादित झालेले धान्य त्याच गावात फिरत राहत होते. पैसा नावाची वस्तू त्यांना माहीतच नव्हते, त्यामुळे जो तो आपापली कामे अगदी चोख आणि व्यवस्थितपणे करीत असत. यांच्यासाठी गावात बारा बलुतेदार ही पद्धत आस्तित्वात आली होती. ज्यामुळे प्रत्येकाचे काम अगदी सहजपणे कुठलीही समस्या निर्माण न होता पूर्ण होत असे.
ज्याचे काम त्यानी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी,चांभारानी चपला शिवाव्यात,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुणब्यानी शेती करावी, साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे. मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे. त्या कापडाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापड जाडजूड, टिकाऊ आणि अनेक वर्षे ते कापड फाटले तरी फाटत नव्हते.
उन्हाळ्याच्या दिवसात तर या कापडाला जास्तीची मागणी असते . भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपडा. हा कपडा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागावर विणून तयार करीत असत. आज ही ह्या समाजातील बरीच मंडळी हा उद्योग करतात. देशात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भिवंडी, सोलापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर सारख्या ठिकाणी हा समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे कपडे विणणे ; परंतु इंग्रजांनी भारतात येऊन ज्याप्रमाणे इतर व्यवसायावर घाला घातला तसेच या हातमाग उद्योगांवर सुध्दा घाला घातला गेला.
इंग्रजांनी भारतात येऊन जाडजुड कपड्यांच्या जागी मऊ तलम व वजनाने हलकी वाटणारी टेरीकॉट कापड तयार करण्याची यंत्रणा आणली आणि या खादी उद्योगाला घरघर सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशीचा तीव्र लढा सुरू करण्यात आला होता. बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकाने परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपले बलिदान देऊन स्वदेशीचा लढा सर्वदूर पोहोचविला होता. याच दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती .
यावरून विदेशी कपड्याने भारतात किती मोठे साम्राज्य निर्माण केले होते, याची जाणीव होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी या खादी कपड्यांच्या उद्योगाला चालना मिळेल अशी छोटी आशा होती. मात्र झाले उलटेच. खादी उद्योगाला स्वातंत्र्यानंतर सुध्दा घरघर लागली. ज्या समाजातील लोकांचा हा मुख्य व्यवसाय होता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या लोकांना पोट भरण्यासाठी इतर कामाच्या शोधात भटकत रहावे लागू लागले यातूनच हा समाज जो पूर्वी एका ठिकाणी स्थिर होता तो संपूर्ण देशात पसरलेला दिसून येतो. तरी ही त्या॑नी मूळ व्यवसाय सोडलेली नाही. आज ही या समाजातील ४३ लाख हून अधिक लोक खास करून हातमागाचा व्यवसाय करतात.
ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणारी कुटूंबातील महिलांसाठी हाच व्यवसाय उदरनिर्वाहचे एक साधन आहे. या खादी व्यवसायास चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, या राष्ट्रीय हॅण्डलूम दिवसा मुळे सरकारच्या या निर्णयाने भविष्यात खादी हातमाग उद्योगाला अच्छे दिन येतील असा विश्वास करण्यास काही हरकत नाही. आपण सर्व भारतीय नागरिकांनी देखील या उद्योगास चालना मिळावी म्हणून वर्षातून एक तरी खादीच्या कापडाचा पोशाख वापरावे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीमध्ये तर वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सम-विषमचा प्रयोग केला गेला. वाढत्या प्रदूषणाचा धोका वेळीच ओळखला नाही तर दिल्लीसारखी परिस्थिती आपल्या शहरातही उद्भवू शकते. त्यामुळे यावर उपाय करता येण्याजोगा एकच पर्याय आहे. तो म्हणजे शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे. प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही सायकल चालविणे उत्तम व्यायाम ठरतो.
June 3, 2022
राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी ज्या प्रदेशावर राजसत्ता गाजवली. तो प्रदेश म्हणजे कोकणच ह्रदय म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा. १ मे १९८१ रोजी राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून या सिंधुदुर्गची निर्मिती केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणाचा दक्षिणेकडील भाग आहे. त्याची निर्मिती आधीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगूर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग अशा आठ तालुक्यांच्या एकत्रितकरणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे.
May 1, 2022
राजकमल बद्दल त्या काळी असे म्हणले जायचे की निर्मात्याने स्क्रिप्ट घेऊन यावे व चित्रपटाची रिळे घेऊन जावी. व्ही.शांताराम यांनी राजकमल मध्ये एडिटींग, रेकॉर्डिग, डबिंग, मिक्सिंगचे स्टूडियो बनवले होते. या स्टुडिओमध्ये ब्लॅक आणि व्हाइट चित्रपटाची प्रोसेसिंग लॅबही होती.
November 9, 2021
आश्चर्य वाटेल, परंतु पुणे शहर एकेकाळी भारताचे नेतृत्व करीत होते. दिल्लीचा बादशाह कोण होणार, हे पुणे शहर ठरवीत होते. या शहराला प्राचीन आणि मध्ययुगीन असा मोठा वारसा आहे.
पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था पुण्याची नगरपालिका १ जुन १८५७ रोजी स्थापन झाली, तर पुणे महानगरपालिका १५ फेब्रुवारी १९५० रोजी स्थापन झाली. या सुमारे शतकभराच्या कालखंडात पुण्याच्या नागरी जीवनाला आधुनिक वळण प्राप्त होत गेले. वरं जनहितं ध्येयम् असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.
विसाव्या शतकात पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखले जावू लागले. ते एक औद्योगिक केंद्र बनले. केवळ पेनिसिलीन कारखान्यासाठी ओळखली जाणारी पिंपरी आणि मोरया गोसावी देवस्थानासाठी ओळखले जाणारे चिंचवड यांची जोडनगरी आज आधुनिक उद्योगनगरी म्हणून गजबजली आहे. पुण्यातल्या अनेक जुन्या वाड्यांची जागा नव्या ओनरशिपने घेतली आहे. एकेकाळी हे शहर म्हणजे पेन्शनरांचे शहर होते. लोकांच्या स्थलांतराला वेग आला आहे. ‘सदाशिव-शनिवार-नारायण’ यांच्या कोथरूड-पौड रोड कडील ‘स्थलांतरच निर्देश उदाहरणादाखल पुरेसा आहे. टांगा आणि सायकलींचे शहर आता स्कूटर व मोटारीचे शहर बनले आहे.. पुण्यातील रस्ते, पूल व उड्डाणपुलांची संख्या वाढत आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले एक अग्रगण्य केंद्र म्हणून पुणे ओळखले जाऊ लागले आहे. कलानगरी क्रीडानगरीची जोड मिळाली आहे. परप्रांतीय व परदेशी विद्यार्थी असोत, रोजगार शोधणारे तरुण असोत व सुखाचा विसावा शोधणारे जागोजागचे पेन्शनर असोत, सर्वाना हि पुण्यनगरी आकर्षित करत आहे. तिचे रंगरूप झपाट्याने पालटत आहे; पण बदल कितीही झाले तरी ‘पुणे शहर अमोलिक, रचना अशी दुसरी नाही’, हे शाहीर राम जोशींचे उदगार सदेव खरे ठरतील, यात शंका नाही!
पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.
हरवलेले पुणे हे डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकात पुण्यातील सुमारे ५५ ऐतिहासिक ठिकाणांचे वर्णन आहे.हे पुस्तक उन्मेष प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकात पुण्यातील ऐतिहासिक कालातील लकडी पूल, पर्वती,सारसबाग,हिराबाग,कोथरुडबाग इत्यादी नानासाहेब पेशव्यांनी निर्मिलेल्या गोष्टींचे वर्णन केले आहे.पुण्यातील स्वारगेट,हुजूरपागा, रामोशी गेट इत्यादी ठिकाणांची नावे कशी पडली याचेही वर्णन या पुस्तकात केले आहे.पुण्यातील मंदिरांची सन १८१० साली केलेली यादी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 15, 2019
चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दा दा विंची याने वापरला, हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत.
August 19, 2021
काहीसे गुंतागुंतीचे कथानक असलेल्या या चित्रपटाची तितकीची गुंतागुंतीची पण प्रभावी पटकथा मॅक्लिननेच लिहिली आहे. या संपूर्ण चित्रपटाला पार्श्वभूमी आहे. बर्फाच्छादित आल्प्सपर्वताची. जर्मनीचा बवेरिया प्रांत व ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्समध्ये खूप उंचावर असलेल्या श्लॉक अटलर या एका किल्ल्यात यातले बहुतांश कथानक आकार घेते.
December 4, 2021
हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.
April 16, 2022
बॉनसाय हा कुणासाठी केवळ एक छंद होऊ शकतो तर कुणासाठी स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो याचा प्रसार चीनमधून जपान व नंतर जगभरात झाला.
October 19, 2015
सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर.
July 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti