(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुद्रण (छपाई) करण्याचे निरनिराळे प्रकार

    आपल्याला जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका माध्यमावर घ्यावी लागते. ते माध्यम नंतर छपाई यंत्रावर लावून त्यावरुन कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. नेहमीच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट फ्लेट्स, दगड, क्रिन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात.

      May 22, 2023


  • जागतिक पाणथळभूमी दिवस

    सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.

      February 2, 2022


  • ग्रोव्ह्युअर पद्धतीने छपाई

    ग्रोव्ह्युअर छपाई पद्धतीत प्रतिमा कोऱ्या जागेपेक्षा खोलगट भागात असते. या खोलगट भागावरून छपाई करण्याच्या पद्धतीला इंटाग्लिओ पद्धत म्हणतात. प्रथम संगणकात प्रतिमा तयार करून एक पॉझिटिव्ह तयार केली जाते. एका तांब्याच्या सिलेंडरभोवती ही पॉझिटिव्ह गुंडाळून उघडयावर ठेवली जाते.

      May 28, 2023


  • भारतीय रेल्वेचा वाढदिवस

    जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएस व्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला. भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्व भूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले.

      April 16, 2022


  • ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला

    या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. ‘सैराट’चित्रपटाने ‘दणदणीत १०० कोटींचा गल्ला जमवला होता. सैराटला अजय-अतुल यांचे संगीत होते. नागराज मंजूळे यांची उत्कृष्ट पटकथा व लेखक होते. ‘सैराट’ चित्रपटाची जादू पाहून बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता.

      April 30, 2022


  • तरंगणाऱ्या रूट बिअरचा दिवस

    रूट बिअर म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी आजचा मुहूर्तच योग्य आहे कारण , आजच्या दिवशीच परदेशात National Root Beer Float Day साजरा केला जातो. हा दिवस ऑगस्ट महिन्यात पहिल्या गुरुवारी साजरा केला जातो.

      August 6, 2020


  • दख्खनची राणी म्हणजेच डेक्कनक्वीनचा वाढदिवस

    दख्खनच्या राणीच्या प्रवाशांना सुद्धा तिचे फार कौतुक असते आणि दरवर्षी हे प्रवासी हिचा वाढदिवस साजरा करतात. दख्खनच्या राणी ही भारतातली अशी एकमेव जुनी गाडी आहे की, जिला कधीही कोळशाचे इंजिन लावले गेलेले नाही. ती शक्यतो विजेवरच धावते, पण कधी अडचण आलीच तर तिला डिझेल इंजिन जोडले गेलेले आहे.

      June 1, 2021


  • जागतिक वन्यजीव दिवस

    वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने ३ मार्चला जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. १९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

      March 4, 2025


  • राष्ट्रीय विज्ञान दिन

    राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप चर्चा झाली होती. चर्चेत डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा.

      February 28, 2022


  • १६ डिसेंबर १८५४ – महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना

    १६ डिसेंबर १८५४ रोजी “अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे” या महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली

      December 16, 2017