(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ‘रविवार’ च्या  साप्ताहिक सुटीची १२९ वर्षे

    ‘रविवार’ च्या साप्ताहिक सुटीची १२९ वर्षे

    १८८४ मध्ये नेमलेल्या फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यात आठवड्यात एक दिवस सुटी, सूर्योदय ते सूर्यास्त ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्यांचा समावेश होता. पण, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. लोखंडे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. २४ एप्रिल १८९० रोजी त्यांनी दहा हजार कामगारांची सभा घेतली. त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी ‘रविवार’ हा साप्ताहिक सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला.

      June 10, 2022


  • नवान्न पौर्णिमा

    घरासमोर लावलेल्या हरतर्‍हेच्या भाज्या हे नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते.

      October 20, 2021


  • काशी विश्वनाथ कॉरिडॉर चा लोकार्पण सोहळा

    महोत्सवाची प्रमुख आकर्षण म्हणजे काशी विश्वनाथ धाम आणि संगीत, साहित्य, पुस्तक मेळा, व्यापार मेळा, महोत्सव, महापौर संमेलन, कृषीआधारित संमेलन, वास्तुविशारद संमेलन, कला आणि साहित्य संमेलन, रांगोळी आणि छायाचित्रण स्पर्धा, क्रीडा आणि युवकांसाठी विविध कार्यक्रम असतील. हा उत्सव महिनाभर चालणार आहे.

      December 13, 2021


  • जागतिक व्हिस्की दिवस

    जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
    व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.

    Error, group does not exist! Check your syntax! (ID: 3)सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
    सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्राम ची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.

    स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्की लाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत.

    जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
    इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.

    मॅकडोवेल नं १ (McDowell’s No.1)
    हा देशातील सर्वात जास्त विकला जाणार व्हिस्की ब्रँड आहे. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडचा हा ब्रँड असे ही कंपनी UB ग्रुप चालवते. 1968 मध्ये हा ब्रँड बाजारात उतरवला होता.

    मॅकडोवेल नं १ चे बाजारात विविध प्रकार उपलब्ध आहे.

    मॅकडोवेल नं १ रिझर्व
    मॅकडोवेल नं १ रिझर्व डायेट मेट
    मॅकडोवेल नं १ प्लॅटीनम

    ऑफिसर्स चॉइस (Officer’s Choice)
    'ऑफिसर्स चॉइस' हा देशातील दुसर्यार क्रमांकाचा व्हिस्की ब्रँड आहे. या ब्रँडचा मालकी हक्क किशोर छाबरिया यांच्या अलाइड ब्लेंडर्स अॅण्ड डिस्टिलर ग्रुपकडे आहे.

    बॅगपाइपर (Bagpiper)
    'बॅगपाइपर व्हिस्की' हा ‘यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड'चा ब्रँड आहे. 'बॅगपाइपर व्हिस्की'चा जगातील टॉप 100 ब्रँड्स्मध्ये समावेश आहे.

    रॉयल स्टॅग (Royal Stag)
    'रॉयल स्टॅग' या ब्रँडचा मालकीहक्क फ्रेंच कंपनी 'पेर्नोड रिकार्ड'कडे आहे. 1995 मध्ये सीग्राम कंपनीने हा व्हिस्की ब्रँड बाजारात उतरवला होता. 'रॉयल स्टॅग'मध्ये कोणतेच आर्टिफीसियल फ्लेवर नाही आहे.

    ओरिजिनल चॉइस (Original Choice)
    'ओरिजिनल चॉइस'हा गोव्यातील 'जॉन डिस्टिलरीज'चा एक लोकप्रिय ब्रँड आहे. जॉन डिस्टिलरीजचा हा ब्रँड वादाच्या भोवर्याोत सापडला होता.

    ओल्ड टेवर्न (Old Tavern)
    टॉप इंडियन व्हिस्की ब्रँडमध्ये 'ओल्ड टेवर्न’सहव्या क्रमांकावर आहे. ओल्ड टेवर्न व्हिस्की देशातील बिहार व उत्तरप्रदेशातील सर्वात पॉप्युलर ब्रँड आहे. काही आफ्रिकन देशांमध्येही हा ब्रँड फेमस आहे.

    इम्पीरियल ब्लू (Imperial Blue)
    'इम्पीरियल ब्लू'ला 'सीग्राम्स इम्पीरियल ब्लू' असेही म्हटले जाते. इंडियन व्हिस्की मार्किटमध्ये हे नाव खूप प्रतिष्ठित आहे.

    ह्यावर्ड्स फाइन (Haywards Fine)
    'ह्यावर्ड्स फाइन' हा देखील विजय माल्या यांची कंपनी UB Group चा एक पॉप्युलर ब्रँंड आहे. इकॉनॉमी व्हिस्की कॅटेगरीमधील सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आहे.

    8 PM
    8 PM हा प्रसिद्ध कंपनी Radico Khaitan चा एक फेमस इंडियन ब्रँड आहे. Radico Khaitan आधी 'रामपूर डिस्टिलरी अॅण्ड केमिकल कंपनी या नावाने ओळखली जात होती.

    डायरेक्टर्स स्पेशल (Director’s Special)
    'डायरेक्टर्स स्पेशल' हा युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचा ब्रँड आहे. ही कंपनी युनाइटेड ब्रेव्हरीज ग्रुपचा (UB) एक पार्ट आहे. जागतिक क्रमवारीत 'डायरेक्टर्स स्पेशल'चा ४४ वा क्रमांक लागतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 20, 2017


  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

    बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृती प्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

      February 29, 2024


  • जागतिक जैवविविधता दिवस

    संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केल्यानुसार २००० सालापासून जगभर २२ मे हा दिवस ‘जागतिक जैवविविधता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.या वर्षीची जैवविविधता दिनाची संकल्पना ‘आपल्या प्रत्येक समस्येचे उत्तर निसर्गात आहे’ ही आहे.
    पृथ्वीवर वनस्पती व प्राण्यांच्या लाखो प्रजाती आहेत. जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे. प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत! जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेच्या जपणुकीचे महत्व आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.

    जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात. 'जैवविविधता मंडळे' स्थापन करून कामे वाटून घेतली जातात. स्थानिक पातळी वरील जैवविविधता मंडळे आपल्या परिसरातील वृक्ष, फुले, फळे, वेली, झुडपे, नदी, ओढे, नाले, विहिरी, तळी तसेच एकूण वृक्षाच्छादित प्रदेश यांची माहिती असणारी नोंदवही ठेवतात. परिसरात आढळणारे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, पावसाचे प्रमाण, पिके, स्थानिक वाण, चवी, औषधी वनस्पती यांचीही माहिती संकलित केली जाते. जैवविविधतेला क्षती पोहोचवणाऱ्या बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरही त्या टाळल्याने फरक पडू शकतो. अधिवास जपणे, प्रदूषण कमी करणे, शाश्वत शेतीच्या पद्धती, सेंद्रिय शेती अवलंबणे, हरित क्षेत्राची वाढ करणे, पशु पक्षांच्या प्रजाती जपणे इत्यादी पाऊले उचलून आपण जैवविविधता सांभाळू शकतो.

    पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे ह्या जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. आपण संकल्प करुया की तंत्रज्ञानाच्या अधिक आहारी न जाता अधिकाधिक नैसर्गिक जीवन जगू आणि पृथ्वीवरील जैवविविधता जपू. जागतिक जैवविविधता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    संदर्भ. इंटरनेट

    पुणे.

      May 22, 2022


  • नागालँड राज्याचा स्थापना दिवस

    १९५६ साली गव्हर्नमेंट ऑफ नागालँडची घोषणा करण्यात आली, मुळात साहित्यिकाचा पिंड असणाऱ्या फिझोने तर स्वतंत्र नागा राष्ट्राचे राष्ट्रगीत देखील लिहून ठेवले होतेचं, शिवाय राष्ट्रध्वज देखील तयार करण्यात आला. या हालचाली पाहता नागाहिल्सवर भारतीय लष्काराची संख्या वाढविण्यात आली.

      December 1, 2021


  • रोझ डे

    या आठवडय़ापासून वेलेंटाईन डे पर्यंत विविध मार्गांनी आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रेमळ भावना व्यक्त करण्यात येतात. जस जसा वेलेंटाइन डे जवळ येतो तसा तरूणाच्या उत्साहाला उधाण येते. विशेषतः रोझ डे पासून तरूणाईकडून आपल्या प्रिय व्यक्तीसाठी विविध भेटवस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली आढळून येते.

      February 7, 2022


  • मुंबई अग्निशमन दलाचा वाढदिवस

    हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.

      April 1, 2022


  • दांडी यात्रेचा दिवस

    ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला.

      March 12, 2022