एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
आजचा दिवस हा सच्च्या भारतीयांच्या कधीही विस्मृतीत जाणार नाही. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. आज दिनांक २६ जुलै २०२०! २१ वर्षं पूर्ण झाली त्या विजयश्रीला मिळवून. म्हणा ती विजयश्री मिळवणं सोपं नव्हतं , त्यासाठी शेकडो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली समर यज्ञात!
July 26, 2020
केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क बोर्ड केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येते आणि हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. यांच्या खाली केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क, देशातील सीमाशुल्क, जीएसटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर आणि नारकोटिक्सची जबाबदारी आहे.
February 24, 2022
भारतीय आयुर्विमा महामंडळ १ सप्टेंबर १९५६ रोजी आयुर्विम्याचा सर्वदूर अधिक व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने विशेष करून देशाच्या ग्रामीण भागातील सर्व विमा योग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण योग्य किमतीत पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आले.
September 1, 2021
प्रसन्न कपूर निर्मित आणि गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘परिचय’ च्या प्रदर्शनास आज यशस्वी ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रसन्न कपूर म्हणजे जितेंद्र याचा सख्खा भाऊ होय आणि त्या काळात जितेंद्र आपल्या अभिनयाविषयी गंभीर आहे हे अधोरेखित करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली अशी चर्चा होती. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर लिबर्टी येथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. यात जीतेंद्र, जया भादुरी, प्राण आणि संजीव कुमार मुख्य भूमिकेत आहेत.
October 18, 2021
CISFची स्थापना झाली तेव्हा त्यात एकूण २८०० जवान काम करत होते, पण आज या सुरक्षा दलात सुमारे १६५००० हून अधिक जवान आहेत.
March 10, 2022
ज्या जोडीदाराशी भावनिक, वैचारिक जवळीक असेल त्याच व्यक्तीशी लग्न करायला पाहिजे, तरच समाजमान्य आणि तरीही मनपसंत पद्धतीने शारीरिक संबंध शक्य आहेत. भावनिक, वैचारिक जवळीकीसाठी बराच वेळ लागतो. त्या काळात दोन-तीन भावी जोडीदारांशी एकाच काळात चर्चा-भेटी चालू असल्या तरी काही बिघडत नाही.
February 13, 2022
जानेवारी १९७१ ते ५ जानेवारी १९७१ या दरम्यान ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या दोन संघांदरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या चार दिवसांचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. प्रेक्षकांचे पैसे वसूल होण्याच्या दृष्टीने मर्यादित षटकांचा सामना खेळवण्याची एक कल्पना एका भन्नाट डोक्यातून निघाली. तिला मूर्त स्वरूप येऊन ५ जानेवारी १९७१ रोजी प्रत्येकी ४० षटकांचा एक सामना वरील दोन्ही संघांदरम्यान खेळला गेला.
January 5, 2022
आचार्य अत्रे हे तर संस्थेचे सदैव हितैषी राहिले. संस्थेबद्दल त्यांनी ८ जानेवारी १९६७ रोजी ‘‘ह्य़ाच संस्थेने माझ्या साहित्यिक जीवनाचा पाया घातला. संस्थेचे उपकार मानण्यास मजजवळ शब्द नाहींत. पुण्यातील वाङ्मयप्रेमी तरुणांना स्फूर्ति नि प्रेरणा देण्याचे महान कार्य ह्य़ा संस्थेकडून होवो ही इच्छा!’’ असा अभिप्राय लिहिला आहे.
February 7, 2022
आकर्षक मथळा, चटपटीत मजकूर, खुलवून लिहिलेली बातमी हे प्रभातचे वैशिष्टय होते.
November 21, 2021
शक्ति सामंत यांनी दिग्दर्शित केलेल्या कटी पतंगमध्ये राजेश खन्ना व आशा पारेख ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. प्रेम चोप्रा, बिंदू, नझीर हुसेन, सुलोचना, नाझ, सत्येन कप्पू, मदन पुरी, डेझी इराणी, ज्युनियर महमूद आणि हनी इराणी यांनी सुद्धा या चित्रपटात अभिनय केला आहे.
कटी पंतगमधल्या भूमिकेसाठी आशा पारेख यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
हा सिनेमा गुलशन नंदा ह्या प्रसिद्ध लेखकाच्या 'कटी पतंग' कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट बनवतांना अगदी पुस्तकाप्रमाणेच केला आहे. गुलशन नंदा ह्यांच्या कादंबऱ्यांवरील आणखी सिनेमे म्हणजे दाग, खिलौना असे खूप आहेत.
या चित्रपटातली गाणी खूपच प्रसिद्ध झाली होती. ये श्याम मस्तानी, प्यार दिवाना होता है, ये जो मोहब्बत है, जिस गलीमें तेरा घर आणि टायटल सॉंग ना कोई उमंग है,आज ना छोडेगे, मेरा नाम शबनम ही सर्व गाणी असंख्य भारतीयांच्या ऑल-टाईम फेवरीट लिस्ट मध्ये असतील. अर्थात संगीत आर.डी बर्मन यांचे, किशोरकुमार, मुकेश, लता आणि आशा असे गायक गायिका असल्यावर दुसरं आणखी काय होणार म्हणा. उत्तम संगीत, अर्थपूर्ण संवाद व सुरेख चित्रीकरण या मुळे हा चित्रपट ४९ वर्षे झाली तरी अजून बघावासा वाटतो.
कटी पतंग चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=U44HKiKsB78
कटी पतंग चित्रपटातील गाणी
https://www.youtube.com/watch?v=7HTW1uUIIWQ
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti