(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दुबईमधील बुर्ज खलिफा

    बुर्ज खलिफाच्या बांधकामासाठी ९७ अब्ज रुपये खर्च आला. याचे प्रायमरी स्ट्रक्चर मजबूत सिमेंटपासून तयार केले आहे. बुर्ज खलिफा साठी ३३०००० क्युबिक मीटर सिमेंट आणि ५५००० टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

      January 4, 2022


  • जागतिक कापूस दिवस

    कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे ६ दशलक्ष शेतकऱ्यांना उपजिविका प्राप्त करुन देते. भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि जगातील सर्वात मोठा कापसाचा ग्राहक आहे.

      October 7, 2021


  • जागतिक पास्ता दिवस

    दरवर्षी २५ ऑक्टोबर रोजी जागतिक पास्ता दिवस साजरा केला गेला. जागतिक पास्ता दिवस सगळ्यात पहिल्यांदा १९९५ मध्ये साजरा केला गेला आणि तेव्हापासून तो दरवर्षी साजरा केला जातोय.

      November 2, 2022


  • भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

    २५ एप्रिल १९८२ रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात झाली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !

      April 27, 2021


  • ’पुरुष’ मराठी नाटक

    ’पुरुष’ मराठी नाटक

    आजच्या दिवशी १९८२ रोजी कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला होता.

    जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि मराठी रंगभूमीवर गाजलेलं 'पुरुष' हे नाटकात पुरुषी मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीला बळी पडलेल्या एका स्त्रीची कथा पुरुष या नाटकातून मांडण्यात आली आहे. मुळातच पुरुषांमध्ये असलेला अहंकार आणि त्याला बळी पडणाऱ्या स्त्रिया यावर य़ा नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय. नाना पाटेकर, उषा नाडकर्णी, रिमा या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने एके काळी हे नाटक खुपच गाजवलं होतं.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      September 22, 2021


  • राइट बंधूंचे पहिले मोटारचलित विमानोड्डाण

    १९०१ आणि १९०२ मधे भरपूर ग्लायडर्स बनवल्यावर आणि त्यांची बरीच हाडतोडू चाचणी उड्डाणं केल्यावर १९०३ मधे राईट जोडगोळीनं त्यांचं पहिलं इंजिनावर चालणारं विमान ऊर्फ “पॉवर्ड एअरक्राफ्ट” बनवलं. त्याचं नाव होतं “राईट फ्लायर -१.”

      December 17, 2021


  • अमेरिकेचा नॅशनल आइसक्रीम दिवस

    आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो. आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. खाऊचा इतिहास माणसांच्या संस्कृतीइतकाच जुना आहे. या इतिहासाच्या पानापानावर आपल्याला अशी वळणं आढळतात जिथे जन्माला आलेला नवा पदार्थ म्हणजे त्या प्रदेशाची ओळख ठरावा.

      July 21, 2024


  • जागतीक आर्किटेक्ट दिवस

    या वास्तुकलेमध्ये वास्तू सौंदर्य, हवा आणि प्रकाशाचा सुरेख संगम, अभिरुची, उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर, मजबुती व टिकाऊपणा, सुसंबद्धता, पर्यावरणपूरकता, दळणवळण इत्यादी पैलूंचा अभ्यास करून मूर्त स्वरूप दिले जाते.

      October 4, 2021


  • सुवर्णतुला नाटकाचा पहिला प्रयोग

    या नाटकाचे कथानक श्रीकृष्ण चरित्रातील एका लोकप्रिय प्रसंगावर आधारलेले आहे. नारद हा या कथानकातील सूत्रधार असल्याने संगीतानुकूल वातावरण आपोआपच निर्माण होते.

      October 10, 2021


  • जे जे स्कूल ऑफ आर्ट्स चा वर्धापनदिन

    भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं. इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात.

      March 2, 2025