(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय प्रसारण दिवस

    आकाशवाणीवरून पहिल्यांदा बातम्या प्रसारित झाल्या त्या घटनेला ९७ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने भारतीय प्रसारण दिवस साजरा केला जातो.

      July 23, 2024


  • कलिंगड दिन

    कलिंगड दिन

    मंडळी आज ३ ऑगस्ट आणि आज कलिंगड दिन परदेशात साजरा केला जातो. चला तर थोडासा ह्याचा इतिहास जाणून घेऊ.

      August 3, 2020


  • बनारस हिन्दू विश्व विद्यालय स्थापना दिवस

    विद्यापीठाची एकूण ३७ वसतिगृहे असून त्यांपैकी सहा वसतिगृहांत मुलीच राहतात. विद्यापीठीय आवारात २८ वसतिगृहे आहेत. विद्यपीठाचे एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय वसतिगृह असून तेथे पन्नास विदेशी विद्यार्थी राहण्याची सोय आहे.

      February 4, 2022


  • नौकाशर्यत दिवस

    ऑगस्ट महिन्यातला पहिला बुधवार. ह्या दिवशी कॅनडामध्ये एक आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा दिवस साजरा केला जातो. त्या दिवसाचं नाव आहे “National Regatta Day” म्हणजेच राष्ट्रीय नौकाशर्यत दिन.

      August 5, 2020


  • राष्ट्रीय नूडल्स दिवस

    नूडल्सचा संदर्भ हा चीनपासून लागतो. हळूहळू याला जपानी खाद्यसंस्कृतीत व ‘हाँग’च्या कृपेने तैवान खाद्यसंस्कृतीतदेखील स्थान मिळू लागले. भारतात नूडल्स हे सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खाल्ले जातात.

      October 6, 2021


  • प्रभात फिल्म कंपनीचा खूनी खंजीर चित्रपट

    द्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली.

      March 29, 2022


  • ३३ वर्षं ‘अशी ही बनवाबनवी’ मराठी चित्रपटाची

    ३३ वर्षं ‘अशी ही बनवाबनवी’ मराठी चित्रपटाची

    व्ही. शांताराम प्रॉडक्शन निर्मित ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट तर मराठी सिनेरसिकांच्या मनात कायमचं घर करून बसला आहे. अगदी आजच्या पिढीला देखील या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत.

      September 23, 2021


  • जागतिक वन्यजीव दिवस

    वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने ३ मार्चला जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. १९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

      March 4, 2025


  • लिज्जत पापड (श्री महिला उद्योग) चा वर्धापनदिन

    महाराष्ट्रात, मुंबईत स्त्रियांनी स्त्रियांकडून स्त्रियांसाठी स्त्रियांद्वारे चालविलेला उद्योग निर्माण झाला. १५ मार्च १९५९ साली गिरगावमधील सात महिलांनी या उद्योगास जन्माला घातले. ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या नावाने आज हा उद्योग जगभर पोहोचला.

      March 15, 2022


  • शोले सिनेमाची ४६ वर्षे

    भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला आज तब्बल ४६ वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे या सिनेमाचे गारूड कमी झालेले नाही. काय आहे ते गारूड?

    १५ ऑगस्ट १९७५ रोजी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा ठरलेला ‘शोले’ हा जी.पी. सिप्पी यांचा चित्रपट मुंबईच्या मुंबई सेंट्रल भागातील मिनव्‍‌र्हा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात शोले पाच वर्षे दाखवला जात होता. पन्नासच्यावर चित्रपटगृहात त्याचा रौप्यमहोत्सवही साजरा झाला. या चित्रपटाने पूर्वीचे लोकप्रियतेचे बरेच रेकॉर्ड मोडून स्वत:चा असा विक्रम प्रस्थापित केला. आजही अनेकदा शोले एखाद्या चॅनल वर चालुच असतो. आजवर आपल्या बॉलीवूड मध्ये हजारो चित्रपट झाले... पण " शोले" आजही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. शोले मात्र असा आठवणीत राहिलेला पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे.

    कारण एकच त्यातील 'टिमवर्क'

    शोलेएवढे प्रचंड यश आतापर्यंत एकाही हिंदी किंवा भारतातल्या प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटाला मिळालेले नाही. शोलेनंतर हजारो हिंदी चित्रपटांची निर्मिती झाली. ते पडद्यावर आले आणि गेले. त्यातल्या फारच थोड्या चित्रपटांची आठवण लोकांना आहे. या चित्रपटाला एवढे प्रचंड यश मिळेल, असे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटात भूमिका केलेल्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांनाही स्वप्नातही वाटले नव्हते.

    दरोडेखोरांचा नायक, त्या दरोडेखोरांच्या वारंवार होणार्याक हल्ल्यांनी संत्रस्त झालेले गाव, त्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला गब्बर सिंग याला एकदा तुरुंगात डांबणारा माजी पोलीस अधिकारी ठाकूर आणि या दरोडेखोरांना संपवायसाठी आलेले जय आणि विरू, हे दोन तरुण यांच्याभोवती ही कथा संघर्षासह सतत शेवटपर्यंत फिरत राहते. ज्या गब्बरने आपले हात तोडले, त्याचाच सूड ठाकूर कसा घेतो, याचे चित्रीकरण प्रेक्षकांना विलक्षण आवडले होते.

    गब्बर सिंगची अमजद खानने केलेली भूमिका तर गाजलीच, पण त्याचे संवादही प्रंचड गाजले. समाजावर प्रभाव टाकणार्याक संवादाचे लेखन जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीने केले होते. ग्रामीण भागात घडणारी ही कथा शहरी भागातही लोकप्रिय झाली. शोले का चालला? हे अजूनही कळत नसल्याची कबुली रमेश सिप्पींनी दिली आहे तर या चित्रपटाच्या यशामागचे रहस्य जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या कथेत दडलेले असल्याने, या चित्रपटाचे यशही त्यांनाच माहिती असावे. सगळ्यांना या चित्रपटातले नेमके काय आवडते, हे सांगणे हे खरेच खूप कठीण आहे, अशा शब्दात महानायक अमिताभ बच्चन यांनी शोलेच्या लोकप्रियतेचे रहस्य गवसत नसल्याची कबुली देऊन टाकली.

    जपानी चित्रपट निर्माता अकिला कुरोसावा यांच्या सेव्हन समुराई या चित्रपटावरूनच शोले साकारला गेला. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेन्दचे प्रेम बहरले आणि पुढे हे दोघे विवाहबद्ध झाले. गब्बर आणि त्याच्या डाकू सहकार्याअतले संवाद तर लाखो प्रेक्षकांना तोंडपाठ होते. अरे ओ सांबा, कितने आदमी थे? असे गब्बर आपल्या सहकार्यााला विचारतो. तो सांगतो, दो! आदमी चार और वो दो, फिर भी खाली हाथ चले आए? तेरा क्या होगा कालिया? अरे ओ सांबा, कितना इनाम रख्खा है सरकारने हमपर? हे त्याचे रांगडे संवाद प्रेक्षकांना विशेष आवडले होते.

    ये दोस्ती, हम नही तोडेंगे, कोई हसीना जब रुठ जाती है तो, ही या चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली होती. पाण्याच्या टाकीवर चढून विरूने (धर्मेंद्र)ने केलेला तमाशाही प्रेक्षकांना आवडला होता. इतना सन्नाटा क्यूँ है भाई, या चाचाचा प्रश्नर (ए. के. हंगल) प्रेक्षकांनाही सुन्न करून टाकणारा ठरला होता. शोलेच्या संवादाची एलपी निघालेली होती आणि तिचाही खप देशभरात खूपच झालेला होता. यशाचे हे शोले भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरले आहे.

    संकलन : संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
    https://www.youtube.com/watch?v=0OyJgWmZH0s

      August 15, 2021