(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • परशुराम जयंती

    हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता.

      May 3, 2022


  • स्वातंत्र्य दिवस

    म्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील ” माझा ” हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत “माझा” देश आहे.

      August 15, 2020


  • जागतिक होमिओपॅथी दिन

    होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याचबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची औषधे निश्चि्त केली जातात.

      April 10, 2022


  • २१ डिसेंबर

    २१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. वसंत सबनीस यांचे 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक म्हणजे सबनीसांच्याच छपरी पलंगाचा वगाचीच रंगावृत्ती आहे. याचे संगीतकार होते तुकाराम शिंदे. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाने दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी ‌अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.

    गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं. त्या नंतर गायिका आशा भोसले यांनी त्या काळी ‘विच्छा माझी पुरी करा' ’चा मुंबईतला एकही प्रयोग पाहायचा सोडला नव्हता. याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

    दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे नाटक गाजवले होते. राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत, हळूच चिमटे काढत प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा' हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा'चे प्रयोग करत होते. 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक आहे.

    आजपर्यंत अनेकांनी या नाटकाचे प्रयोग केले गेले. या वगनाट्याची कथा, त्यातील राजकीय भाष्य आज ही ताजे वाटते. एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या "विच्छा माझी पुरी करा"या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे. एक दोन नव्हे, तब्बल ५२ वर्षे या वगनाट्याने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 21, 2017


  • फर्ग्युसन कॉलेज

    शिक्षणाचे माहेरघर ही पुण्याची ओळख सार्थ करणारे व पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजचा वाढदिवस.
    २ जानेवारी १८८५ रोजी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज ची सुरवात झाली.

    शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८२ ला आलेल्या हंटर आयोगापुढे साक्ष देताना वामन शिवराम आपटे यांनी अतिशय मुद्देसूद विवेचन करून नव्या खाजगी आर्टस् कॉलेजची निकड विशद केली होती. न्यू इंग्लिश स्कूलचे, त्यासाठी संस्थापकांनी केलेल्या धडपडीचे कौतुक हंटर आयोगाने केले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘जेम्स फर्ग्युसन’ या तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने या प्रस्तावाला अनुमोदन दिले व बक्षीसासाठी रु. एक हजार दोनशे पन्नासची मदत देण्यापासून शक्य ते इतर सहकार्यही केले. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. २४ ऑक्टोबर १८८४ रोजी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना झाली.

    संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न,महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले व २ जानेवारी १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले.

    फर्ग्युसन कॉलेज त्या वेळी पुणे शहरात शनिवार पेठेतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यात होते. नंतर आत्ताच्या जागेत आले.

    फर्ग्युसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्चिमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. टिळकांनी येथे गणित व संस्कृतचे अध्यापन केले. वामन शिवराज आपटे हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते.

    पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.

    फर्ग्युसनचे माजी प्राचार्य डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. त्यावर फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
    फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. . विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, पी.व्ही नरसिंह राव असे अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. फर्ग्युसन कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.

    महात्मा गांधी यांनी १९१९ मध्ये ज्या सभागृहातून देशाला स्वदेशीची हाक दिली, त्या ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेज मधील एन.एम. वाडिया अॅ म्फी थिएटरला इतिहास आहे.

    लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आदींनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजच्या अॅेम्फी थिएटरला २०१२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. १९१२ मध्ये सर जिजीभॉय यांनी दिलेल्या पंचवीस हजार व प्रिन्स आगाखान यांच्या पाच हजारांच्या देणगीतून थिएटरची उभारणी झाली होती. पुण्यातील धनिकांनीही आर्थिक मदत दिली होती. या निमित्ताने नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार ठरलेल्या या वास्तूला सरकारने ‘हेरिटेज ए’चा दर्जा दिला आहे. रवींद्रनाथ टागोर, पं. नेहरू, सी.व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस, मदनमोहन मालवीय यांनी येथे विचार मांडले होते.

    फर्ग्युसन कॉलेजच्या अॅेम्फी थिएटर मध्ये १९२७ मध्ये देशातली पहिली भारतीय महिला परिषद झाली. सरोजिनी नायडू, यशवंतराव चव्हाणांची भाषणे येथे झाली. केरळचे तेव्हाचे मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांचे ‘स्वातंत्र्य’वर व्याख्यान येथे झाले. कुमार गंधर्व, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, भालबा केळकर, भास्कर चंदावरकर, रोहिणी भाटे, वसंतराव देशपांडे यांचे कार्यक्रम येथे झाले. पुण्यातील प्रसिध्द पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची सुरुवात फर्ग्युसन कॉलेजच्या अॅयम्फी थिएटर येथुनच झाली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 2, 2019


  • डी. डी. १० मराठी उपग्रह वाहिनीचे ‘सह्याद्री’ असे नामकरण झाले

    यंग-तरंग, कृषि-दर्शन, आमची माती आमची माणसे, आस्वाद, सखी सह्याद्री, हॅलो डॉक्टर, स्वस्थ भारत, पटलं तर घ्या, क्रीडांगण, म्युझिक मस्ती गप्पा गाणे (एम2 जी2) यासारखे मालिका आधारित कार्यक्रम, तसेच सह्याद्री अंताक्षरी, धिना धिन धा, दम दमा दम, नाद भेद, आजचे दावेदार – उद्याचे सुपरस्टार यासारखे विविध स्पर्धात्मक, रिऍलिटी शोज यासारख्या अनेकानेक कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे वर्षानुवर्षे मनोरंजन तर केले आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संपन्न संस्कृतीचे आणि परंपरांचे जागरणही केले आहे.

      April 5, 2022


  • राष्ट्रीय नौका दिवस

    गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.

      March 29, 2022


  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११४ वा वर्धापन दिन

    १९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्था मिळून महामंडळ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते.

      May 27, 2022


  • हॅलोविन डे

    ह्या दिवशी लोक विविध प्रकारचा भुताचा, पिशाचांचा, चेटकिणीचा, वेश परिधान करून रस्त्यांवर उतरतात. तसेच बरेच जण चांगल्या भूतांचे देखील कपडे परिधान करतात. ठिकठिकाणी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले जाते.

      October 31, 2021


  • किशोर मासिकाची पन्नास वर्ष

    किशोर मासिकाची पन्नास वर्ष

    महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत ‘किशोर’ची निर्मिती झाली, ती मूळ संकल्पना होती, तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची.

      November 14, 2021