(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक संग्रहालय दिवस

    संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेल्या ठेव्याची महिती, नागरिकांना इतिहासातील घडामोडीची व ऐतिहासिक संशोधकांना अभ्यासपर माहिती मिळावी या उद्देशाने इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ म्युझियम यांनी १८ मे १९७७ हा दिन जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास आरंभ केला.

      May 18, 2022


  • सावरकर आणि पहिली विदेशी कपड्यांची होळी

    १९०५ मध्ये दसऱ्याच्या दिवशी, स्वदेशीच्या पुरस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्यांच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसती गृहातून हकालपट्टी झालेले सावरकर हे ‘पहिले’ विद्यार्थी ठरले.

      October 7, 2021


  • जागतिक ॲ‍क्युप्रेशर थेरपी दिवस

    शारीरिक आणि मानिसक समस्यांपासून दिलासा देण्यात ॲ‍क्युप्रेशर थेरेपीही खूप फायद्याची आहे. मात्र, शरीराच्या योग्य सांध्यावर ॲ‍क्युप्रेशर केले तरच लाभ मिळते.

      January 3, 2022


  • जागतिक डॉक्टर दिन

    आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो.
    सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणा-या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणा-या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणा-या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणा-या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      March 31, 2017


  • पिंगपाँग डिप्लोमसीची ५२ वर्षे

    १९७० च्या दशकात चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष कमी करण्यात मोलाची भूमिका चीनचे टेबल टेनिस टेनिसपटू ‘जुआंग डुंग’ यांनी बजावली होती. त्यांनी घेतलेल्या पावले ‘पिंग पोंग डिप्लोमसी’ म्हणून ओळखली जाते. १९७१ मध्ये जपान माढेल नगोया मध्ये झालेल्या विश्व चैंपियनशिप स्पर्धेच्या दरम्यान अमेरिकी खेळाडू ग्लेन कान यांची बस सुटली तेव्हा चीनच्या टीमने त्यांना आपल्या बसने त्यांना मैदानात पोहचवले होते. पुढे झालेल्या सामन्यात जुआंग डुंग यांनी अमेरिकन क्रीडापटू ग्लेन कान यांना एक सिल्कचे पेंटिंग भेट केले होते. आपल्या दुभाषीच्या मदतीने जुआंग डुंग यांनी ग्लेन कान यांना सांगितले अमेरिकी सरकारचे चीनच्या सोबत दोस्तीचे संबध नाहीत पण अमेरिकन लोक चिनी लोकांचे मित्र आहेत. मी तुम्हाला ही फ्रेम चिनी लोकांच्या कडून दोस्ती खुण म्हणून देत आहे. जेव्हा या दोघांच्या भेटीची बातमी पेपर मध्ये आल्यावर चीनचे नेते माओत्से तुंग यांनी विदेश मंत्रालयाला आदेश दिला की अमेरिकी टीमला चीन बोलवा.

      April 11, 2022


  • सुनील गावसकर यांच्या कसोटी कारकिर्दीची ५१ वर्षे

    ६ मार्च १९७१ रोजी सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करून आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. त्या वेळी ते भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचे खेळाडू होते. ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-त्या वेळी गावसकर विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्याा, अक्षरश: आग ओकणार्यार गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला.

      March 6, 2022


  • राष्ट्रीय किसान दिन

    भविष्यात जागतिक तापमानवाढ, पाणीटंचाई, हवामानबदल या पार्श्वभूमीवर कृषी अभियांत्रिकीचा वाटा अधिक असणार आहे; पण त्याकडे संशोधन संस्थाच दुर्लक्ष करीत आहे. आर्थिक गुंतवणूक न येण्याचे ते कारण आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही.

      December 23, 2021


  • मुंबईतील ग्रॅट मेडीकल कॉलेजचा वर्धापनदिन

    मेडिकल कॉलेज सर जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात भायखळा येथे आहे. रुग्णालयाची अंथरूण क्षमता २८४४ बेड आहे आणि महाराष्ट्र व मध्य भारतातील सर्व भागातून वार्षिक रूग्ण १,२००,००० रूग्ण इथे येतात.

      November 1, 2021


  • माउंट हिल्स डोंगरावर ‘HOLLYWOOD’ हा शब्द बसविला

    पंचेचाळीस फूट उंच आणि साडेतीनशे फूट लांबीच्या या आकारात पांढऱ्या अक्षरात ‘HOLLYWOOD’ लिहिलेले आहे. हे लिहिण्याचा उद्देश येथील जागेच्या किंमती वाढवण्यासाठी होता सुरुवातीला याचा आकार पन्नास फूट उंच आणि तीस फूट रुंद होता, ज्याचा आकार नंतर च्या काळात वाढवण्यात आला.

      July 13, 2022


  • इंटरनॅशनल शेफ डे

    राजा हेन्री आठवा यांना त्याच्या सूप मध्ये केस सापडला,त्यांनी शाही शेफचा शिरच्छेद करवला होता, नंतर इतर शेफना टोपी परिधान करण्यास आदेश दिले. तेव्हा पासून जगातील सर्व शेफनी जेवण बनवताना टोपी (शेफ कॅप) घालावयास सुरुवात केली.

      October 20, 2021