(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • न्यू इंडिया ॲ‍ॅश्युरन्स कंपनीचा स्थापना दिवस

    न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी ही भारतातील सर्वांत जुनी व मोठी विमा कंपनी आहे. सर दोराबजी टाटा यांनी २३ जुलै १९१९ रोजी या कंपनीची स्थापना केली.z

      July 23, 2024


  • शिवराज्याभिषेक दिन

    ५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)

      June 6, 2022


  • द गॉडफादर’ चित्रपटाची ५० वर्षे

    द गॉडफादर ही कादंबरी लिहिलेल्या पुझोचा साहित्यिक प्रवास पुढे सुरु राहिला असला तरी त्याला गॉडफादरने जितकी प्रसिध्दी मिळवून दिली तशी ती त्याच्या अन्य कुठल्या साहित्यकृतीने दिली नाही. गॉडफादरच्या तिन्ही भागांना वेगवेगळ्या क्षेत्रात ऑस्कर मिळाले आहेत.

      March 14, 2022


  • अखंड भारत दिवस

    अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे आपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे साजरा केला जातो.

    प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रिकरण कमीवेळा झाले. अखंड भारत या संकल्पनेत, भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूटान,हिमालय,श्रीलंका आहे. भारत हा प्रचिन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो प्राचिन काळी जरा वेगळा होता. म्हणजेच भारत एक विशाल देश होता.

    इराणपासून इंडोनेशियापर्यंत त्याचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण काळाच्या ओघात भारताचे आणि हिंदू धर्माचे लचके तोडण्यात आले. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तसेही एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी १८७६ ते १९४७ या ७१ वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले.

    भारताचा सर्वात शेवटचा तुकडा १९४७ साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत आताचा बांगलादेश जन्माला घातला. १९४७ साली झालेली भारत व पाकिस्ताननची फाळणी ही मागील २५०० वर्षांतील देशाची २४ वीं फाळणी होती. ज्या‍ राजांनी मागील २५०० हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्यां नी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याीचा उल्लेयख इतिहासातील कुठल्यााच ग्रंथात नाही. त्यालमुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्टीा मिळते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 14, 2021


  • आंतरराष्ट्रीय डावऱ्या लोकांचा दिवस

    आंतरराष्ट्रीय डावऱ्या लोकांचा दिवस

    आज दिनांक १३ ऑगस्ट. परदेशात हा दिवस खास डावऱ्या म्हणजे डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांसाठी साजरा केला जातो. ह्या दिवसाला ‘इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे’ म्हणून संबोधलं जातं. काय विशेष असतं लेफ्टी लोकांमध्ये? पूर्ण जगात ह्यांची संख्या किती आहे? डावरी प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण? ह्या संदर्भात आपण ह्या लेखात माहिती घेऊ.

      August 13, 2020


  • जागतिक क्षयरोग दिन

    ट्युबरक्युलोसिस म्हणजे (क्षयरोग) हा संसर्गजन्य आजार असून , तो ‘मायकोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस’ या जंतूमुळे होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अस्वच्छ परिसर , दाटीवाटीने वाढणार्या झोपड्या व जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते.

      March 24, 2022


  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘दिवार’ चित्रपट

    यश चोप्रा यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील विजय वर्मा या व्यक्तिरेखेने अमिताभ यांना खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख मिळवून दिली.

      January 24, 2022


  • अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग

    मानवजातीच्या आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. हा प्रसंग जेव्हा टेलिव्हिजनवर दाखविण्यात आला, तेव्हा जगातील १/५ लोकांनी तो बघितला. अपोलो-११ या यानाने १६ जुलै १९६९ रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली.

      July 20, 2021


  • क्रिकेटपटू कपिलदेव यांची कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी

    क्रिकेटपटू कपिलदेव यांची कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी

    २६ व्या ओव्हर मध्ये कपिल देव यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कपिल देव यांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरु केली. पुढचे अर्धशतक त्यांनी फक्त १३ ओव्हर मध्ये पूर्ण केले. त्यानंतरच्या ५० धावा फक्त १० ओवरमध्ये पूर्ण केल्या.

      June 18, 2022


  • पुणे महानगरपालिका

    आश्चर्य वाटेल, परंतु पुणे शहर एकेकाळी भारताचे नेतृत्व करीत होते. दिल्लीचा बादशाह कोण होणार, हे पुणे शहर ठरवीत होते. या शहराला प्राचीन आणि मध्ययुगीन असा मोठा वारसा आहे.

    पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था पुण्याची नगरपालिका १ जुन १८५७ रोजी स्थापन झाली, तर पुणे महानगरपालिका १५ फेब्रुवारी १९५० रोजी स्थापन झाली. या सुमारे शतकभराच्या कालखंडात पुण्याच्या नागरी जीवनाला आधुनिक वळण प्राप्त होत गेले. वरं जनहितं ध्येयम्‌ असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.
    विसाव्या शतकात पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखले जावू लागले. ते एक औद्योगिक केंद्र बनले. केवळ पेनिसिलीन कारखान्यासाठी ओळखली जाणारी पिंपरी आणि मोरया गोसावी देवस्थानासाठी ओळखले जाणारे चिंचवड यांची जोडनगरी आज आधुनिक उद्योगनगरी म्हणून गजबजली आहे. पुण्यातल्या अनेक जुन्या वाड्यांची जागा नव्या ओनरशिपने घेतली आहे. एकेकाळी हे शहर म्हणजे पेन्शनरांचे शहर होते. लोकांच्या स्थलांतराला वेग आला आहे. ‘सदाशिव-शनिवार-नारायण’ यांच्या कोथरूड-पौड रोड कडील ‘स्थलांतरच निर्देश उदाहरणादाखल पुरेसा आहे. टांगा आणि सायकलींचे शहर आता स्कूटर व मोटारीचे शहर बनले आहे.. पुण्यातील रस्ते, पूल व उड्डाणपुलांची संख्या वाढत आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले एक अग्रगण्य केंद्र म्हणून पुणे ओळखले जाऊ लागले आहे. कलानगरी क्रीडानगरीची जोड मिळाली आहे. परप्रांतीय व परदेशी विद्यार्थी असोत, रोजगार शोधणारे तरुण असोत व सुखाचा विसावा शोधणारे जागोजागचे पेन्शनर असोत, सर्वाना हि पुण्यनगरी आकर्षित करत आहे. तिचे रंगरूप झपाट्याने पालटत आहे; पण बदल कितीही झाले तरी ‘पुणे शहर अमोलिक, रचना अशी दुसरी नाही’, हे शाहीर राम जोशींचे उदगार सदेव खरे ठरतील, यात शंका नाही!

    पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्‌. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.

    हरवलेले पुणे हे डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकात पुण्यातील सुमारे ५५ ऐतिहासिक ठिकाणांचे वर्णन आहे.हे पुस्तक उन्मेष प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

    या पुस्तकात पुण्यातील ऐतिहासिक कालातील लकडी पूल, पर्वती,सारसबाग,हिराबाग,कोथरुडबाग इत्यादी नानासाहेब पेशव्यांनी निर्मिलेल्या गोष्टींचे वर्णन केले आहे.पुण्यातील स्वारगेट,हुजूरपागा, रामोशी गेट इत्यादी ठिकाणांची नावे कशी पडली याचेही वर्णन या पुस्तकात केले आहे.पुण्यातील मंदिरांची सन १८१० साली केलेली यादी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 15, 2019