वेदनेला आणि दुःखाला गळ्याला लावायला कोणाला आवडेल? दुसऱ्यांचं दुःख पाहायला सुद्धा काही लोकांना आवडत नाही. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचे दुःखं समजून त्यांनी आणलेली भीक सुद्धा त्यांच्याबरोबर खाऊन त्यांना आपलेसे करणारे व असे काही भिकारी जे अनेक दिवस एका जागेवर सर्व विधी करणारे व त्यामुळे त्यांच्या हातापायांना संसर्ग झालेला असला तरी त्या हाताने खाणारे व संसर्ग हातात नसून मनात असतो असे मानणारे आगळे वेगळे डॉक्टर केवळ त्या भिकाऱ्याविषयी सहानुभूती दाखवत नाहीत तर त्यांच्या वर उपचार करून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून, त्यांनां नातेवाईकांनी सोडले असले तरीही पुन्हा आयुष्यात आणणारे व वेळ प्रसंगी एखाद्याला पुढील आयुष्य जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा करणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे हे झपाटलेलं व्यक्तिमत्व आजही कार्यरत आहे.
दहावीला ३७% व तर एकदा नापास होण्याचा प्रसंग येऊन ही निराश न होता संघर्ष करून त्यांची ही यशोगाथा साकारली आहे. आत्महत्या करणाऱ्यांसाठी हा धडा आहे. सभोवताली अंधार असला तरी दिवा पेटवता यायला हवा.
डॉ. अभिजित सोनवणे आणि त्यांची पत्नी डॉ. मनीषा सोनवणे, पुण्यातील अत्यंत वंचित व्यक्तींपर्यंत औषधोपचार पोहोचवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. त्यांच्या संस्थेच्या अंतर्गत हे डॉक्टर दाम्पत्य वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक साधन नसलेल्या व्यक्तींवर उपचार करतात. डॉ. अभिजीत म्हणतात, “आम्ही रस्त्याच्या कडेला सर्व प्राथमिक आरोग्य सेवा आणि तपास वृद्ध भिकाऱ्यांना देतो, ज्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सोडून दिले आहे आणि जे या जगात टिकून राहण्यासाठी भिक्षा मागतात.
दररोज सकाळी डॉ. अभिजित मंदिरे, मशिदी आणि चर्च अशा अनेक ठिकाणी जातात जिथे बहुसंख्य बेघर ज्येष्ठ नागरिक एकत्र जमतात. ते त्यांच्या सोबत औषधांनी भरलेल्या पिशव्या घेऊन जातात, तपासणी करतात आणि गरजू लोकांना मोफत औषध पुरवतात. ते म्हणतात, “हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आम्ही दररोज १० ते ४ दरम्यान मंदिर, मशिदी आणि चर्च येथे भेट देतो आणि भिकाऱ्याशी संवाद साधतो.
डॉ. अभिजित केवळ वैद्यकीय आणि भावनिक पाठिंबा देण्यास सहाय्य करत नाहीत तर बेघर ज्येष्ठांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायला मदत देखील करतात.
त्यांचे लक्ष्य या व्यक्तींना आत्मनिर्भर बनविणे आहे. डॉ अभिजित आणि त्यांची पत्नी यांनी एकूण १६० मोतीबिंदु ऑपरेशन केले आहेत. रस्त्यावर वैद्यकीय सेवा देता येत नाही, तेव्हा डॉ. अभिजित त्यांना सार्वजनिक किंवा खासगी रुग्णालयात हलवता़.
लोकांच्या पाठिंब्याने एक रुग्णवाहिका डॉ.सोनवणे यांना मिळाली आहे, त्यामुळे पुण्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन निराधार आणि बेबंद लोकांवर उपचार करण्यास मदत होते. डॉ.अभिजित म्हणतात “ मला अजून बरेच काही मिळवायचे होते, मला त्या वेळी फक्त पैसा हवा होता. मी ज्या गावात जायचो त्या रस्त्यांवर भीक मागणाऱ्या एका म्हाताऱ्याला विचारलेलं आठवतं – बाबा, मी श्रीमंत कधी होणार? त्याने मला माझ्या आयुष्याचा धडा दिला जो मला तेव्हा समजला नसला तरीही आता माझे बोधवाक्य बनले आहे. श्रीमंत होण्यापेक्षा मी एक चांगला माणूस बनण्यावर भर द्यायला हवा आणि हेच मी आता जगत आहे.”
.”आम्ही रस्त्यावरच सर्व मूलभूत आरोग्य सेवा आणि तपासणी प्रदान करतो वृद्ध भिकाऱ्यांना, ज्यांना त्यांच्या कुटुंबांनी सोडले आहे आणि जे या जगात टिकून राहण्यासाठी भीक मागत आहेत.”
अभिजितच्या संपूर्ण आठवड्याचे नियोजन त्या दिवशी कोणत्या प्रार्थनास्थळाला सर्वाधिक भाविक येतात त्यानुसार केले जाते.
अभिजित त्यांना काही काम हाती घेण्यास प्रोत्साहन देतात ,जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील आणि त्यांना भिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. ते त्यांना छोटी दुकाने लावायला मदत करतात.
अभिजित आणि त्याची पत्नी गेल्या 6 वर्षांपासून सर्व गरजूंची काळजी घेत आहेत आणि 49 हून अधिक वृद्ध भिकाऱ्यांना मदत मिळाली आहे. त्यांनी 1100 बेघर व्यक्तींची नोंदणी केली आहे ज्यांना वैद्यकीय मदत मिळत आहे. ज्यांना त्यांच्या कुटुंबियांनी सोडून दिले आहे आणि त्यांची काळजी घेणारे कोणी नाही अशा लोकांसाठी, अभिजित आणि त्याची पत्नी हे देवासारखे आहेत.
पुण्यातील डॉ अभिजित सोनवणे यांनी 2015 मध्ये आपली ५लाख वेतनाची नोकरी सोडली आणि सोहम ट्रस्ट अंतर्गत डॉक्टर फॉर बेगर्स सुरू केले जेथे ते आपल्या पत्नीसह रस्त्यावर गरीब आणि गरजूंवर उपचार करतात. पैसा सोडून ज्यांनी मूल्यांची वाट धरली त्यांनीच प्रेरणेची ची पायवाट निर्माण केली आहे.