मध्यमव्यायोग

नाट्यशास्त्राचे निर्माते भरतमुनी यांनी अठराव्या अध्यायात नाटक म्हणजे रुपकाचे दहा प्रकार सांगितले. त्या सोबत त्यांची वैशिष्ट्ये सांगितली आहे. यापैकी व्यायोग नावाच्या प्रकाराचे वर्णन असे आहे की त्यामध्ये प्रख्यात व्यक्ती नायक असावी पण ती राजा नसावी. एका अंकाचे, एका दिवसाच्या व्याप्तीचे कथानक असावे. प्रधान रस वीर असावा. पात्रांचे द्वंद्वयुद्ध असावे.



नाट्यशास्त्राचे निर्माते भरतमुनी यांनी अठराव्या अध्यायात नाटक म्हणजे रुपकाचे दहा प्रकार सांगितले. त्या सोबत त्यांची वैशिष्ट्ये सांगितली आहे. यापैकी व्यायोग नावाच्या प्रकाराचे वर्णन असे आहे की त्यामध्ये प्रख्यात व्यक्ती नायक असावी पण ती राजा नसावी. एका अंकाचे, एका दिवसाच्या व्याप्तीचे कथानक असावे. प्रधान रस वीर असावा. पात्रांचे द्वंद्वयुद्ध असावे.

व्यायोग या रूपक प्रकाराची ही सर्व वैशिष्टे व्यायोग या नावासह मिरवणारे भासनाटकचक्रातील एक नाटक म्हणजे मध्यमव्यायोग. या नाटकाची कथा अशी – एकदा कुरुजांगल प्रदेशातील यूपग्राम नावाच्या गावातील कोणी एक केशवदास नावाचा वृद्ध ब्राह्मण आपल्या पत्नी व तीन मुलांसह हिडिंब वनातून प्रवास करीत असतो. त्याच वेळी आपली आई कुंती सह पाच पांडव देखील त्या वनात निवास करीत असतात.

हा ब्राह्मण आपल्या मुलांसह असताना जंगलातून जात असताना त्याला हिडिंबेचा मुलगा घटोत्कच त्या सगळ्यांना अडवतो. घटोत्कचाने त्या ब्राह्मणाकडे आपल्या आईचा उपवास सोडण्यासाठी तिचा आहार म्हणून एका मुलाची मागणी केली. त्या ब्राह्मणाच्या तीन मुलांपैकी थोरला वडिलांना प्रिय तर धाकटा आईचा लाडका. त्यामुळे ब्राह्मणाने नाईलाजाने आपल्या मध्यम नावाच्या आपल्या मधल्या मुलाला घटोत्कचाला देऊ केले.

घटोत्कचाच्या परवानगीने पाणी पिण्यासाठी गेलेला तो मध्यम बराच वेळ झाला तरी आला नाही हे पाहून घटोत्कचाने त्याचे नाव विचारून त्याला “मध्यम, मध्यम” अशा हाका मारल्या.

त्याचे ते ओरडणे नेमके त्या जंगलात आराम करणाऱ्या पांडवांच्या कानावर पडले. त्या हाका आपल्यालाच मारल्या आहेत असे वाटून कुंतीपुत्र पांडवांपैकी ‘मध्यम’ म्हणजे भीम तेथे आला.

भीमाला पाहिल्यानंतर त्याच्या भव्यतेचा आणि पराक्रमाचा विचार करीत हाच आपल्याला त्या दुष्ट राक्षसापासून वाचवू शकतो असा विचार करीत त्या वृद्ध ब्राह्मणाने त्याच्याकडे मदतीची याचना केली. ब्राह्मणपुत्र मध्यमाला सोडवण्यासाठी पांडव मध्यम घटोत्कचाला सामोरा गेला व त्या दोघांचे द्वंद्व झाल्यानंतर घटोत्कचाला पराजित करून त्याने ब्राह्मणपुत्राचा जीव वाचवला. पांडव मध्यमाने ब्राह्मणपुत्र मध्यमाला वाचवले म्हणून ह्या व्यायोगाचे नाव ‘मध्यमव्यायोग’.भीम व घटोत्कच यांच्या युद्धांनतर घटोत्कच भीमाला घेऊन आपली आई हिडिंबा हिच्या समोर येतो, तेव्हा ती भीमाला पाहून घटोत्कचाला ते त्याचे वडील असल्याचे सांगते व ह्याद्वारे त्या दोघांची भेट होते. स्वाभाविक भारतीय संस्कृतीप्रमाणे शेवट आनंदमय होतो अशी या व्यायोगाची कथा आहे.
विविध भावनांची वेगवान मांडणी करणारे नाटक आहे मध्यम व्यायोग.

कु. धनश्री मारोती नक्षणे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
वाङ्मय स्नातक अंतिम वर्ष
दि. ०९.०२.२०२२

Author