कर्णभारम्

महाभारतातील कथा भागावरील आधारित भासरचित एकांकी नाटक कर्णभार. हे नाटक भारतीय महाकाव्य महाभारताचा एक भागाचे पुनरूपांतरण आहे पण नाटकात या घटना वेगळ्या परिप्रेक्ष्यात मांडल्या आहेत.



महाभारतातील कथा भागावरील आधारित भासरचित एकांकी नाटक कर्णभार हे नाटक भारतीय महाकाव्य महाभारताचा एक भागाचे पुनरूपांतरण आहे पण नाटकात या घटना वेगळ्या परिप्रेक्ष्यात मांडल्या आहेत.

कर्णभार हे भासांच्या नाटकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. महाभारतात सांगीतल्या प्रमाने कर्ण हा प्राचीन भारतातील महान योद्धया पैकी एक होता. तो अंगदेशाचा राजा होता. महाभारतानुसार अर्जुनासमोर उभा राहू शकणारा कर्ण हा एकमेव योद्धा होता. त्याच्याकडे संपूर्ण जग जिंकण्याची क्षमता होती.महाभारतामध्ये कर्णाचे कवच कुंडले इंद्र घेउन जातो व अर्जुनाकडून कर्णाचा वध होतो. कर्णाचा गंभीरपणा,उदारता आणि व्यक्तिमत्व अतिशय प्रभावीपणे या नाटकात चित्रित केले आहे.आकाराने लहान असलेल्या ही एकांकिका कलेल्या दृष्टीने खरोखरच महान आहे.

कर्णभारम् च्या मंगलाचरण श्लोकात विष्णुचा नरसिंह अवताराचे वर्णन आहे.महाभारताच्या युद्धक्षेत्रात अकराव्या दिवसापासूनची वेळ,स्थान आहे .महान योद्धा कर्ण सूर्यपुत्र युद्धक्षेत्रात पराक्रमी आणि सामर्थवान होण्या ऐवजी गळून गेलेला आणि उदास झालेला दिसतो. त्याला त्याचा जन्म,जात,सामाजिक स्थिती,कुंती व सूर्याचा मुलगा असो की राधेचा व सूताचा, व्यक्ति आणि नशिबाची रचना याचा विचार करणारा कर्ण इथे पाहायला मिळतो.काही काळासाठी तो विचार युद्धापेक्षा प्रभावी होतो.

तिथे पुरुष एकमेकांना मारतात.तो म्हणतो की त्याचा विजय असो वा पराजय युद्ध हा खरा अपव्यय आहे. ही दृष्टी त्याच्या अशांततेत भरच घालते. कर्ण शल्याला त्याचा गुरु परशुरामाने दिलेला श्रापाबद्दल सांगतो.कर्णभार नाटयामध्ये हा भाग वर्तमानाचा कथनाचा भूतकाळाशी संबंध जोडून तयार केला आहे. परशुरामाने सांगितल्याप्रमाणे अस्त्र गरजेच्या वेळी शक्तिहीन होते. ब्राह्मणाचे वेशात इंद्राचा प्रवेश होतो.तो धूर्तपणे कर्णाकडून दैवी कवच व कुंडल काढून घेतो कर्णाचे जीवन रक्षण करणारे चिलखत आणि कर्णभूषणे ज्यासह तो जन्माला आला होता तो लुटण्याचे त्याचे कार्य पूर्ण केल्यामुळे इंद्र उत्साहाने आनंदी दिसतो व तो आता ऐरावत हत्तीच्या पाठीवर बसून स्वर्गातून अर्जुन आणि कर्ण यांच्यातील युद्ध पहान्यास उत्सुक आहे.भास सांगतात की या दृशात कर्णाच्या आईने आपल्या भावांना मारू नये ही विनंती आणि गुरूचा शाप त्याचा आठवणीत आहेतच त्यांच्या जीवनाची लढाई त्यांची वाट पाहत आहे.कारण तो कौरव सैन्याचा सेनापती आहे.पण त्याचे कोणतेही कौशल्य त्याच्या इच्छेला पूर्ण करणार नाही. मृत्यू जवळ आहे कारण त्याचा शत्रू दुसरा कोणी नाही तर अर्जुनच आहे.जो त्या काळातील महान योद्धा पैकी एक आहे.महाभारताचा वेगवेगळ्या भागामध्ये उल्लेख केलेला अनेक घटना आणि परिस्थिती एकत्र करून कर्ण भारम् ची रचना केली आहे.

पहिल्या कथेत पार्श्वभूमी जन्म देणारी कुंती मुलगा म्हणून कर्णाला न ओळखणारी कथा येते, दुसऱ्या कथेत कर्णाचा त्याच्या गुरु परशुरामा सोबत राहण्याची घटना आणि शापाची आहे.तिसरी कथा कर्णाचा उदारतेची आणि दानशूरपणाच्या व्रताची आहे.अर्जुन आणि कृष्णाचे आव्हान स्वीकारून कर्ण वीरतेने या अंतिम नशिबास पुढे जातो. अशा प्रकारे विविध छोट्या छोट्या प्रसंगातून भासाचे कर्णभार नाटक कल्पनाशक्तीतून चित्रित केलेले आहे.

कु. साक्षी संजय मेश्राम
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
वाङ्मय स्नातक अंतिम वर्ष.
दि. ०६.०१.२०२२

Author