४९ वर्षांचा ‘बावर्ची’ चित्रपट
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानएका मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या घरात रघु (राजेश खन्ना) नोकर म्हणून येतो आणि त्या घरातील सगळा माहौलच बदलून टाकतो. हसतखेळत काही कौटुंबिक समस्या सोडवतो. संपूर्ण चित्रपटभर राजेश खन्नाची छान बकबक आहे. अमिताभ बच्चनच्या निवेदनाने या चित्रपटाची सुरुवात होते. तपन सिन्हा दिग्दर्शित ‘Galpo Holeo Satti’ (१९६६) या बंगाली चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.