साहित्य - ललित

एक घास चिऊचा एक घास काऊचा

Category:

 

तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान.. किती वास्तव सांगितले आहे ना. एरवी साधी चौकशी न करता मजेत जेवणारे पिंडदानच्या वेळी कावळ्याची वाट बघत बसतात. नाहीच आला कावळा तर दर्भाचा कावळा असतोच. चिऊ काऊचा घास खाऊन मोठी झालेली हे सगळे विसरून जातात.

  February 21, 2022


लेखसंग्रह

शास्त्रीय संगीत मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम

Category:

 

आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या संगीत महत्वाचं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेमध्ये शारीरिकच आणि मानसिक शांततेची तसेच विश्रांतीची देखील जरुरी असते.

  February 21, 2022


लेखसंग्रह

निसर्गाचे मानसशास्त्र

Category:

 

निसर्गाचे मानसशास्त्र ही शब्दरचना वाचून गोंधळात पडलात का? पर्यावरण आणि मानसशास्त्र यांच्यात काय नातं असं क्षणभर वाटलं ना? पण असं वाटणारे तुम्ही एकमेव नाही आहात. थोडा नवा प्रकार आहे हा पण भविष्यकाळात मानवजातीवर याचा विशेष प्रभाव पडलेला असेल. मानवाचे भवितव्य ठरविणारा हा उद्याचा एक घटक असणार आहे.

  February 21, 2022


व्यक्ती-परिचय

द क्रॉकडाइल हंटर स्टीव्ह आयर्विन

Category:

 

अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील एकूण १३० देशांमध्ये स्टीव्हला ‘क्रोकोडाइल हंटर’ म्हणून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख मिळाली. ‘द क्रोकोडाइल हंटर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या काळात ५० कोटी लोकांपर्यंत स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाचे कार्य पोहचले.

  February 21, 2022


लेखसंग्रह

मनावर ताण नाही; ताबा असणं महत्वाचं…

Category:

 

कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी समजून घेऊन आपापसातील संवादात सकारात्मक शब्दप्रयोग केले पाहिजेत. मनाला मन:पूर्वक मानलं, समजून घेतलं, मोकळं केलं, आनंदी ठेवलं, तंदुरुस्त ठेवलं, सकारात्मक विचारांमध्ये गुंतवलं आणि नकारात्मक विचारांपारून दूर ठेवलं कि फक्त आणि फक्त भरघोस घवघवीत यश, आनंदच प्राप्त होत राहतो. अशा परीस्थित मनावर ताण नाही तर ताबा असणं महत्वाचं असतं, हे समजून घेतलं पाहिजे.

  February 20, 2022


व्यक्ती-परिचय

माणूस या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक श्री. ग. माजगांवकर

Category:

 

‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध नि:शब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा.

  February 20, 2022


व्यक्ती-परिचय

पत्रकार, लेखक हंटर थॉम्प्सन

Category:

 

हंटर थॉम्प्सन हे ‘गॉन्झो जर्नालिझम’ या नवीन विक्षिप्त संकल्पनेचा जन्मदाता होत. एखाद्या बातमीच्या किंवा घटनेच्या निवेदकाने, स्वतःच त्या घटनेचा किंवा प्रसंगाचा एक भाग होऊन, मनात एकामागोमाग एक उसळून येणाऱ्या विचारांच्या आवर्तनांना दिलेलं शब्दरूप असा काहीसा हा प्रकार. समजायला काहीसा क्लिष्ट. १९५६ ते ५८ अशी दोन वर्षं अमेरिकन एअर फोर्समध्ये काढल्यावर ते पत्रकारितेकडे वळले.

  February 20, 2022


दिनविशेष

अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस

Category:

 

हिमालयाची डोंगररांग, हिमशिखरांतून वाहत येणाऱ्या नद्या व त्यांची खोरी, अप्रतिम जंगल अशा अनेक नैसर्गिक ठेव्यांचे वरदान लाभलेला असा हा अरुणाचल. एका चौरस किलोमीटरला १७ माणसे अशी भूभागाची वाटणी असलेला प्रदेश. स्थल पर्यटन, निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग, माउंटन बायकिंग, राफ्टिंग अशा अनेक उपक्रमांसाठी पूरक अशी ही भूमी. भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

  February 20, 2022


कथा

ओडीसा राज्यातून इटालीयन पर्यटकाचे अपहरण (कथा ७)

Category:

 

‘तुम्हाला ताज महाल पेक्षा दुसरा भारत अनुभवायचा असेल,तर आदिवासी वस्ती पर्यंत पोहचा,जे अजूनही धनुष्यबाण व इतर प्राचीन आयुधे वापरतात, फोटो काढण्यांसं तयार होत नाहीत.घनदाट जंगलात जंगली श्वापदा बरोबर मुकाबला करतात,हे पाहण्यासाठी भरपूर पायी प्रवास करावा लागेल,प्रवास सुरक्षित असेल याची हमी,तर जरूर या भेटीला ओडीसा राज्यात.

  February 20, 2022