Articles by MS Team
अनवट पर्यटन – (उगवता छत्तीसगड – १)
Category:
साहित्य - ललितमध्य प्रदेश राज्यातील दहा छत्तीसगढी आणि सहा गोंडी भाषिक दक्षिण-पूर्व जिल्ह्यांचे विभाजन करून १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. रायपुर हे छत्तीसगड राज्याचे राजधानीचे शहर. छत्तीसकिल्ले असलेले राज्य म्हणून ह्या राज्याला छत्तीसगड असे नांव दिले. ह्या प्रदेशाचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून होता. वैदिक आणि पौराणिक काळापासून छत्तीसगड अनेक संस्कृतीच्या प्रगती आणि विकासाचे केंद्र होते. येथील पुरातन मंदिरे आणि त्यांचे अवशेष असे दर्शवित आहेत की वैष्णव, शैव, शक, बौद्ध संस्कृतीचा विविध काळात ह्या प्रदेशावर प्रभाव होता.
February 25, 2022
रंगीबेरंगी
Category:
साहित्य - ललितश्रावणात येणारी नागपंचमी. पावसाळ्यात सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत असतो. आणि लेकींना माहेरची ओढ लागते. पंचमीचा सण येईपर्यंत खूपच वाट पहात असते. माहेरी गेल्यावर तिचे अल्लड वय. झाडांना बांधलेले झोके. त्यावर बसून गाणी म्हणते उंच माझा झोका.
February 25, 2022
क्रिकेटला डकवर्थ-लुईस हा नियम देणारा टोनी लुईस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteलुईस आणि डकवर्थ यांनी १९९७ मध्ये एक फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सादर केला.१९९७ साली झिमाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. १९९९ मध्ये याचा वापर इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला.
February 25, 2022
पाहुणचार
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 25, 2022
पांघरूण’ – बा मांजरेकरा, हे ‘क्षालन’ शब्दातीत झाले आहे रे !
Category:
लेखसंग्रहचित्रपट बघितल्या बघितल्या शक्यतो मी त्यांवर लगेच व्यक्त होत नाही, कारण त्याला टिपिकल ” परीक्षणाचा ” वास येतो. मी सावकाश आतमध्ये मुरवत, त्यांवर माझे आकलन/भाष्य व्यक्त करीत असतो. मात्र आज हा अपवाद ! शक्यतो आकलनाचा सूर लावतोय. ” श्वास “, ” दिठी “, ” अस्तु ” यांनी गाठलेली उंची आणि जगभरातील चित्ररसिकांना ज्या मराठीतील चित्रकृतींची नोंद घ्यावीच लागेल या माळेतील “पांघरूण ” हा चित्रपट आहे.
February 25, 2022
आक्रमक फलंदाज फारुख इंजिनिअर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५.
February 25, 2022
सुरा मी वंदिले
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत असताना घरात रेडिओ नव्हता. समोरच्या जबरेश्वर हाॅटेलमध्ये बुधवारी ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम मोठ्या आवाजात लावला जात असे. तेव्हा अमीन सयानीच्या टिपीकल बोलीतून दहापासून पहिल्या ‘पायदान’पर्यंत एकेक गाणी ऐकलेला आशाताईंचा आवाज अजूनही कानात गुंजतो आहे.
February 25, 2022
जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभंवरलाल जैन यांनी मराठी, इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘ती व मी’ हे पत्नीवर लिहिलेले पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले. निसर्गकवी ना. धों. महानोर हे त्यांचे बांधभाऊ होते. राजकीय क्षेत्रात त्यांचे अनेक नेत्यांच्या बरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध होते किंबहुना सर्वच राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांशी त्यांची मैत्री होती.
February 25, 2022
जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात.
February 25, 2022