दिनविशेष

जागतिक मुकाभिनय दिवस

Category:

 

मुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो.

  March 22, 2022


दिनविशेष

ट्वीटर’ चा वाढदिवस

Category:

 

२०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्‍‌र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले.

  March 22, 2022


व्यक्ती-परिचय

साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन

Category:

 

जेमिनी गणेशन यांनी १९५७ साली ‘मिस मेरी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

  March 22, 2022


व्यक्ती-परिचय

लेखक प्रभाकर आत्माराम पाध्ये

Category:

 

मो.ग. रांगणेकरांच्या ‘चित्रा’ साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या ‘प्रतिभा’ साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत.

  March 22, 2022


दिनविशेष

बिहार दिन

Category:

 

स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा २५ टक्के वाटा, तांदूळ, गव्हाचे २९ टक्के उत्पादन होते. फळ-फळावळांचा ५० टक्के उत्पादनाचा वाटा बिहारचा ! ताग, कापड, तंबाखू उत्पादन करणारा गंगेच्या खोऱ्यातील प्रांत होता.

  March 22, 2022


लेखसंग्रह

मराठी वाड्मयातील चरित्रलेखन

Category:

 

गेल्या पन्नास वर्षांत समाजातल्या विविध क्षेत्रातल्या विविध स्तरांवरच्या मान्यवरांची तसेच कार्यकत्यांची चरित्र लिहिली गेली. पण चरित्रकारांनी अभ्यासासाठी निवडलेले चरित्रनायक पाहता, अजूनही बरेचसे चरित्रनायक स्वांतत्र्यपूर्व काळातले असल्याचे दिसते. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळात स्वकर्तृत्वाने विभिन्न क्षेत्रात कर्तृत्वाने समाजासाठी मार्गदर्शक ठरलेल्या व्यक्तीही नव्या चरित्रकारांनी आपला अभ्यासविषय केल्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. चरित्रकारांच्याही पिढ्या बदलत गेल्याचा तो दृश्य वाङ्मयीन परिणाम होता.

  March 22, 2022


कथा

गोमु गुप्तधनाच्या शोधांत (गोमुच्या गोष्टी – भाग १२)

Category:

 

एकदा गोमु माझ्या खोलीवर आला तेव्हां त्याच्या हातांत एक जुनाट गुंडाळी केलेला कागद होता. मी त्याला हे काय आहे म्हणून विचारणार होतो पण त्या आधीच तो म्हणाला, “इंग्रजीत चान्स ‘आॕफ लाईफ टाईम’ म्हणतात ना, तो आलाय माझ्या आयुष्यांत.”
मी त्याच्या तोंडाकडे पहातच राहिलो.

  March 22, 2022


साहित्य - ललित

हौस – Part 3

Category:

 

कामिनीच्या रखवालदाराने दरवाजा उघडला. मी घाबरत घाबरत त्याच्याकडे बघितले. बायको एकदम रुबाबात शिरली, रखवालदार जणू तिच्या दृष्टीने एखादे झुरळच! मी गुपचूप त्या भव्य आणि पॉश दुकानात, केविलवाणे पणाने इकडे तिकडे पांढरे कापड शोधीत होतो. सौ. ने आपला मोर्चा भरजरी साड्यांच्या काऊंटरकडे वळवला! मी घाबरत घाबरत म्हणालो, “अग, आपल्याला पांढरं कापड घ्यायचंय ना?”

“गप्प बसा हो! तुम्ही मुकाट्याने या माझ्या मागून ! मी बघते काय करायचे ते!”

  March 21, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेत्री वसुंधरा पौडवाल

Category:

 

वसुंधरा पौडवाल यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं ते नाटय निकेतनच्या ” भटाला दिली ओसरी ” या नाटकात. मो. ग. रांगणेकर या नाटकाचे लेखक, निर्माते व दिग्दर्शक. त्यांनीच वसुंधराबाईना रंगभूमीवरील अमिनयाचे पहिले धडे दिले, त्या त्यांना म्हणूनच गुरुस्थानी मानत असत. नाटय निकेतनमध्ये त्यांचा चांगलाच जम बसला. मुख्य म्हणजे त्यांच्या अंगच्या अभिनयाचा उत्तम विकास झाला.

  March 21, 2022