संयुक्त राष्ट्र संघाचे माजी महासचिव कोफी अन्नान
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य संघटनेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरू केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या आदीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले होते. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बनणारे आफ्रिकन वंशाचे ते पहिले नागरिक होते. १९९७ आणि २००६ मध्ये सलग दोन वेळा त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिवपद भूषवले होते. महासचिव असताना २०१५ पर्यंत जगातील गरिबी दूर करण्याचे उद्दिष्टही त्यांनी समोर ठेवले होते. युद्ध काळात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच युद्धात होरपळलेल्या जनतेचे पुनर्वसन करण्याचे काम त्यांनी केले होते.