साहित्य - ललित

इतिकर्तव्यता

Category:

 

आपण आपल्या अंतिम ध्येयावर प्रेम न करता साधनांवरच प्रेम करीत बसतो आणि आपले आयुष्य उजाड करतो. आपले अंतिम ध्येय, अंतिम उद्दिष्ट्य निश्चित करणे आणि त्यासाठी झटत राहणे हे प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. साधनांवर वृथा प्रेम करून, साधनांची वृथा भक्ती करून, साधनांचे वृथा अभिमान बाळगून आपण आपल्या आयुष्यात हिंसेला जन्म दिला आहे. साधनांचा योग्य आदर राखून निगराणी करून साध्यावर लक्ष केंद्रित करणे हि खरी अहिंसा आहे.

लेखसंग्रह

लेकीच्या अल्प मुक्कामाचा आनंद

Category:

 

पाच दिवस माहेरपणाला राहून, आजच आमची लेक सासरी रवाना झाली, आणि लेकीच्या वास्तव्याने गजबजलेलं आमचं घर शांत झालं. तसे आम्ही घरात तिघं असतो. आणि उभयतां पती पत्नी, आणि आमचा लेक. पण तो असतो पाऊण दिवस त्याच्य कामात आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये अथवा वाचनात, ही स्वयंपाक, इतर कामं निपटून, तिच्या असंख्य मैत्रिणींच्या व्हॉट्सॲप समूहात आणि मी माझ्या लेखन वाचनात. आपापल्या कक्षेतून बाहेर येऊन थोड्याफार गप्पा होतात.

साहित्य - ललित

स्वामी विवेकानंदांचा धर्मविषयक दृष्टीकोन

Category:

 

आयुष्यात आनंद मिळवायचा हा मूळ उद्देश सोडून देऊन तो आनंद कसा मिळवायचा यावरून जगामध्ये भांडणं आणि कट्टरता सुरू आहे. आपल्या धर्माकडे तटस्थ वृत्तीने बघून जे त्याज्य आहे ते टाकून देऊन जे उपयुक्त आहे जे आधुनिक सुधारीत जगामध्ये उपयुक्त आहे तेच स्वीकारायचे, हा विवेकानंदांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुस्लिम समाजानेही आत्मसात करावा, या मताचा मी आहे.

लेखसंग्रह

सिनेमा बनताना -मेरा साया

Category:

 

१९६४ साली त्यांचा वोह कौन थी प्रदाशित झाला व तुफान चालला. म्हणून त्यांनी पुन्हा सस्पेन्स चित्रपट काढायचे ठरवले.त्यांना मराठी चित्रपट पाठलाग इतका आवडला होता कि त्यांनी त्याचे राईटस राजा परांजपे कडून विकत घेऊन मेरा साया काढायचे ठरवले.

लेखसंग्रह

लोकल व इंजिने चालविणाऱ्या महिला चालक

Category:

 

भारतीय रेल्वेच्या १४५ वर्षांच्या इतिहासात इ.स. २००० नंतर आलेली अभूतपूर्व क्रांती म्हणजे लोकल गाड्या व इंजिनं चालविण्यासाठी महिला ड्रायव्हर्सची झालेली नेमणूक! आज एकूण ५० महिला या अशा विविध तऱ्हेच्या गाड्या चालवतात. इंजिनाच्या खिडकीत उभं राहून स्टेशनवर गाडीचालक म्हणून होणारं त्यांचं आगमन निश्चितच कौतुकास्पद आहे.