व्यक्ती-परिचय

लोकनेता गोपीनाथ मुंडे

Category:

 

परिणामकारक, क्रांतिकारी बदल करणारे निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे, याला फार महत्त्व असते. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना गुन्हेगारीविरोधात धडक कार्यवाही केली. पोलिसांना अधिकार दिले. ‘एन्‌काऊंटर’ हा शब्द त्याच काळात रूढ झाला. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या संगनमताच्या काळात एन्‌काऊंटर हा शब्द रूढ करणे, ही खरी गुणवत्ता होती.पोलीसदलामध्ये सुधारणा, मुंबईतल्या टोळी युद्धाला आळा घालणे, आणि जनसामान्यांनमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो. पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर गोपीनथ मुंडे, हे भाजप-सेना युतीमधला दुवा होते. दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. तर निवळण्याचं काम गोपीनाथराव करायचे.

व्यक्ती-परिचय

लेखिका, निवेदिका, गायिका शुभांगी मुळे

Category:

 

शुभांगी यांनी रेडिओ स्टेशन वर तसेच टेलिव्हिजन वाहिन्यांसाठीही काम केले आहे. गेल्या त्या काही वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अशोक पत्कीची संगीत कार्यशाळा घेत असतात. शिवाय शुभांगी यांनी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली काही नवीन गाणीही गायली आहेत.

व्यक्ती-परिचय

लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस

Category:

 

डॉ. सबनीस आयुष्यात वेगवेगळ्या चळवळींचा आणि कलाविष्कारांचा अनुभव घेतलेले लेखक आहेत. दादा कोंडकेंच्या ‘विच्छा माझी…’ने प्रभावित होऊन ‘शुक्राची तू चांदणी’सारखे वगनाट्य त्यांनी लिहिले आहे. राजकारणावर आधारित ‘सत्यकथा ८२’ किंवा ‘क्रांती’ सारख्या राज्यस्तरीय पारितोषिकविजेत्या एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत.

व्यक्ती-परिचय

लेखिका पुपुल जयकर

Category:

 

पुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अंड कल्चरल हेरिटेज (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या.

व्यक्ती-परिचय

लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक तारा भवाळकर

Category:

 

तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.

व्यक्ती-परिचय

लेखक पु. भा. भावे

Category:

 

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. भा. भावे. त्यांच्या नावावर सतरा कथासंग्रह आहेत. त्यातील सतरावे वर्ष, पहिले पाप, संस्कार, सुगंध, प्रतारणा, मोहं, फुलवा, नौका, प्रायश्चित्त अशा अनेक कथा आजही आठवतात. . जिथे जिथे दंभ, ढोंग, खोटेपणा आहे तिथे तिथे भाव्यांची लेखणी वज्रप्रहार करते. भाव्यांच्या काही कथांवर चित्रपटही तयार झालेले आहेत.

व्यक्ती-परिचय

लेखक व. पु. काळे

Category:

 

व .पु . काळे हे तरुणांना , समाजाला बरोबर घेऊन जाणारे लेखक होते . त्यांनी समाज आणि समाजातील माणसे जी तुमच्या आमच्यात असतात त्याच्या कथा , व्यथा चांगल्या , आकर्षक भाषेत मांडल्या.

व्यक्ती-परिचय

लेखक निरंजन घाटे

Category:

 

प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत.