तफावत ?
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनविकसित देश विकसित का आहेत आणि क्षमता असूनही भारत विकसित देशांच्या पंक्तीत का बसू शकत नाही, या प्रश्नाच्या मुळाशी जायचे झाल्यास उत्तरांची जंत्रीच समोर करता येईल. खूप कारणं आहेत, परंतु त्यातली बहुतेक कारणे निव्वळ तकलादू स्वरूपाची आहेत. वास्तविक एखाद्या देशाला विकसित म्हणून मिरविण्यासाठी त्या देशाजवळ जे काही असावे लागते ते आपल्या भारतात अगदी खच्चून भरलेले आहे किंवा होते असे काही बाबतीत म्हटले तरी वावगे ठरणार नाही.