युगधर्म

राजनीतीत आज विचारधारा व मर्यादा राहिली नाही. महाराष्ट्र असो वा झारखण्ड सर्वत्र चित्र-विचित्र गठजोड़ दिसतात. अशा परिस्थितीत कृष्णाने अर्जुनास काय उपदेश केला असेल?



निवडणूक जिंकण्यासाठी आजचे नेता कुठल्याही थरावर जातात. कालपर्यंत जे विरोधी होते ते निवडणूक जवळ आल्यावर मित्र बनतात. आज धर्मयुद्ध म्हणजे सत्तेसाठी युद्ध! आता विचार करा जर महाभारताच्या वेळी भारतात प्रजातंत्र असते आणि दुर्योधनाच्या सभेत लाखोंची भीड असती तर त्या वेळी ‘आजच्या कृष्णाने’ आजच्या अर्जुनास काय उपदेश दिला असता?

पाहुनी लाखोंची भीड़
दुर्योधनाच्या सभेत
संभ्रमि अर्जुनाने विचारले
‘योगेश्वर’ माझा ‘धर्म’ काय?

कृष्णाने हाकली ‘मर्सडीज’
पोहोचला दुर्योधनाच्या ‘तंबूत’

आणि वदला:
‘पार्थ’ हाच आहे आजचा
‘युगधर्म’

— विवेक पटाईत

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →