चीनचा प्रश्न सहकार्याने सुटू शकेल!
Category:
अवर्गिकृतआशिया खंड सोडल्यास इतर खंडांमधील देश आपापसातील वैर विसरून एकमेकांशी सहकार्याच्या तत्वाने एकत्र मिळून प्रगतीची वाटचाल करत आहेत. परंतू आशिया खंडात हे चित्र दृष्टोत्पत्तीस पडत नाही. इतर खंडातील देशांनी एकमेकांत वैर असण्याचे नुकसान-तोटे भोगलेले आहेत. पण आशिया खंडातील देश या दृष्टीने अजुनही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही. पुढच्यास ठेस मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ येथे लक्षात घेण्याची खरोखर गरज आहे. स्वार्थ विसरून आणि एकमेकांच्या फायद्याच्या गोष्टींत समसमान रस घेउन एकत्र प्रगती करणे शक्य आहे. आशिया खंडातील अशाच गंभीर प्रश्नांवर कशाप्रकारे यशस्वीपणाने तोडगा काढला जाउ शकतो यावर संदीप वासलेकरांच्या एका दिशेचा शोध या पुस्तकात विस्तृत विवेचन केले आहे.
November 3, 2010