अवर्गिकृत

गुरुवर्य नरहर रघुनाथ फाटक

Category:

 

फाटकसरांचं आणि माझ्या आईचं लांबचं नातं होतं .त्यामुळे काही घरगुती कार्यात किंवा समारंभात मी त्यांना अनेकदा पण दुरूनच पाहिलं होतं. याखेरीज, जिथे जिथे विद्येची उपासना चाले, तिथे तिथे सर दिसत. ते ग्रंथसंग्रहालयात असोत की साहित्य संघात, भारतेतिहास संशोधन मंडळात किंवा प्राज्ञ पाठशाळेत ते कुठेही असले तरी आजूबाजूला माणसांचा गराडा आणि सरांचं अव्याहत बोलणं असा त्या बैठकीचा बाज असे.

  January 5, 2012


लेखसंग्रह

शिक्षा पद्धती – एक दृष्टीक्षेप

Category:

 

आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक कसे बनतील?

  January 3, 2012


अवर्गिकृत

माझा अक्षर छंद

Category:

 

कोणताही छंद एकदा का माणसाला जडला की तो त्याच्या जीवनाचा अविभाज्य असा भागच बनून जातो हे जे विधान मी आज जे करतो आहे त्यामागे माझी साठ वर्षांची धडपड आहे. या छंदानं माझी सोबत केली, माझ्या जीवनातल्या अनेक सुख दु:खांच्या क्षणात त्यानं सोबत केली. या छंदानं अनेक क्षेत्रातली माणसं जोडली आणि हा जडलेला स्नेह तुटत नाही उलट ही प्रेमाची, स्नेहाची वीण दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालली आहे असं मला वाटतं.

  January 3, 2012


अवर्गिकृत

दुःख

Category:

 

हा विशाल समुद्र आहे

आणि हे माझे इवलेसे अश्रू.

मी या विशाल समुद्राकडे पाहतो

आणि कविता लिहीतो.

  January 3, 2012


अवर्गिकृत

तंबी दुराईंशी एक (लंबी) मुलाखत

Category:

 

तंबी दुराई यांचं ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर आता रविवारच्या सुट्टीचा अविभाज्य भाग बनलंय. या सदरातल्या विनोदाच्या आविष्करणातली विविधता आणि सातत्य हे वाचकांना अचंबित करणारं आहे. मराठी साहित्यातला विनोद संपलाय अशी हाकाटी करणाऱ्यांना हे सदर ही छानशी चपराकच आहे. विनोदी साहित्याचा आढावा घेणार्‍यांना दखल घ्यायला लावीलच अशी तंबी यांची ही कामगिरी आहे.

  January 3, 2012


अवर्गिकृत

माडगूळी डेज

Category:

 

माझ्या कळतेपणापासून गेली जवळ जवळ पन्नास वर्षे माडगूळला जाण्याची कल्पना निघाली की सर्व प्रथम कोणत्या मार्गाने जायचे याची चर्चा घरात जवळ जवळ जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालायची. काहींचे मत पडायचे की कोरेगाव मार्गाने आटपाडीपर्यंत जावे, तर काहींचे कऱ्हा-वीटा मार्गाने! कुठलाही मोठा घाट नसलेल्या सोलापूर रोडने इंदापूर आणि तिथून अकलूज सांगोला मार्गे थेट माडगूळलाच जावे, तर काहींचे म्हणणे फलटण-म्हसवड मार्ग जवळचा असल्याने त्याच मार्गाने जावे असे असायचे. मला स्वत:ला मात्र कुर्डुवाडीवरून बार्शीलाईट रेल्वेने सांगोला आणि तेथून मोटारने माडगूळला जाणेच खूप आवडायचे.

  January 2, 2012


अवर्गिकृत

नागरिक पत्रकार – विश्वासार्हतेची एक नवी वाट

Category:

 

न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्‍यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे.

  January 2, 2012


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

कुमार गंधर्व

Category:

 

कुमार गंधर्व म्हटलं की मला हेरॅक्लिटसची आठवण यायची. ”तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकूच शकत नाही; तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरुप बदललेलं असतं” असं हेरॅक्लिटस म्हणे. कुमारांचं तसंच काहीसं होतं. त्यांचा एकदा बागेश्री ऐकला की पुन्हा तो तसाच यायचा नाही. अगदी तीच बंदिश असली तरी! ”टेसूल बन फुले, रंग छाये, भंवर रस लेत फिरत मद भरे” ही कुमारांची बंदिश मी प्रत्यक्ष मैफिलीत कितीतरी वेळा ऐकली असेल.

  January 2, 2012


लेखसंग्रह

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता”

Category:

 

मी मायमराठी प्रेमळ व तेजाळ संस्कृति रक्तातच भिनलेला आहे! तेव्हा उत्सवप्रियतेच्या विरूध्द टोकाची भूमिका घेणारा आहे, असा गैरसमज कृपया होऊ देऊ नका. फक्त माझी अट एवढीच आहे की, कंत्राटदारीसारख्या मुख्य व मराठी घरं नासवणार्‍या इतर अनेक अवदसांना (कॅपिटेशन फी घेणारे शिक्षणसम्राट, भ्रष्ट नोकरशहा व राजकारणी इ.) लाथ मारून बाहेर काढून मराठी घरांमधून ’गोकुळ‘ निर्माण झालं पाहिजे, गणपतीच्या रिध्दी-सिध्दी परप्रांतियांच्या नव्हे, तर प्रथम आमच्या घरात पाणी भरताना दिसल्या पाहिजेत

  January 2, 2012


लेखसंग्रह

“औद्योगिक-शांतता की,स्मशान-शांतता? मजूर-कंत्राटदारी की,औद्योगिक-अस्पृश्यता?”

Category:

 

ही ’इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या‘ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ’कॅनव्हास‘वर तर मराठी कामगार-कर्मचार्‍र्यांची थडगी बांधण्याची ’कंत्राटी‘ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं.

  January 2, 2012