आपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे.
February 24, 2014
नेपाळ हा भारताचा अगदी निकट शेजारी, जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून भारतात त्या देशाबद्दल आपुलकी वाटे, परंतु काही वर्षापूर्वी तेथे आलेल्या माओवादी राजवटीने ‘हिंदू राष्ट्र’ही नेपाळची प्रतिमा पुसून टाकून हिंदू हा तेथील अधिकृत अथवा राष्ट्रीय धर्म नसल्याचे घोषित केले. गिरीजाप्रसाद कोईरालांसारख्या पुढार्याच्या कारकीर्दीत नेपाळबरोबर भारताचे जसे संबंध होते.
February 21, 2014
February 20, 2014
फॅंड्रीचा विषय खुपच विचार करायला लावणारा आहे. या चित्रपटातून समाजातील एका विशिष्ट वर्गाची व्यथा, त्यांचं रहाणीमान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा अगदी हळूवार पण नेमक्या शब्दात मांडण्यात आल्या आहेत.हा केवळ चित्रपट नसून एक ज्वलंत वास्तव आहे,चालतं बोलतं उदहारणं आहे; तेव्हा थिएटर मध्ये जाऊन अवश्य अनुभव घ्या “फॅंड्री” हा सत्यपूर्ण सिनेमा पाहून !
February 19, 2014
प्रत्येक पातळीवर अव्वल दर्जाचा असणारा फॅंड्री जागतीक स्तरावरही आपले नाव कोरण्यास समर्थ आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्या आसपास रोजचं मरण जगत असलेल्या वंचितांचे हे भीषण वास्तव अंतर्मुख करणारे असल्याने हा आगळा-वेगळा फॅंड्री एकदा तरी नक्कीच बघायला हवा.
February 18, 2014
February 17, 2014
प्रेमाची खरी रीत..!!
February 17, 2014
आपण www.click-me.in या परिवाराचे सदस्य होऊ शकता.. आपले लेख, कविता, कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका आणि इतर साहित्य आम्हाला पाठवा.. आम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. यासाठी आम्ही कोणतेही मानधन देणार नाही. कारन नवोदित साहित्यिकांसाठी हा उपक्रम आहे. आपण जगातल्या कुठल्याही देशात राहत असलात तरी आपण आपले साहित्य आम्हाला पाठवू शकता.
February 15, 2014
रस्त्याने चालताना एकाकी,
स्पष्टच दिसत होत
आज तरूणींच गुलाबी रंगात रंगण ...
त्यांच्या पायातील गुलाबी बुट
पाहिल्यावर का कोणास जाणे
हद कर दि आपने...म्ह्णावंस वाटल...
गुलाबी रंगाचा पोशाख
परिधान करण शक्य नव्ह्त ज्यांना
त्यांनी ओठांनाच गुलाबी करून सोडल...
कहींनी तर गुलाबी रंगाला
पर्याय म्ह्णून अगदी सहज
लाल रंगालाही जवळ केल...
गुलाबी मोबाईलवरून सुरू होत्या
काहींच्या गुलाबी गप्पा
तेंव्हा ओसंडून वाहत होत
त्यांच्या चेहर्यावरून गुलाबी हस्य...
माझ्या मनात विचार आला
ते सारं पाहून आता
आपण काय करावं
पण दुसर्याच क्षणी
माझ्या लक्षात आले
आपण तर काळा रंगाचा पोशाख
परिधान केलाय नेहमी सारखाच
निषेधाचा आज...
मनात किती आल तरी
गुलाबी पॅन्ट परिधान करणे
मला शकय नव्हते
आणि गुलाबी शर्ट मी
कालच वापरून झालो होतो
नेहमी सारखाच...
आता व्हॅलेन्टाईन डे
कसा साजरा करावा
म्ह्णून मी माझ्या
कित्येक वर्षापूर्वीच्या
गुलाबी वहया काढून वाचू लागलो
नेहमी सारखाच
त्यातील पानावर
गुलाबी नाही तर
लाळ अश्रू गाळ्त...
कवी – निलेश बामणे
February 14, 2014
मराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला.
February 13, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti