लातूर जिल्ह्यातील लोकजीवन
Category:
शहरे आणि गावेलातूरला मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते. लातूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी जोडला असून या विद्यापीठा-अंतर्गत सर्वांत जास्त ६६ महाविद्यालये आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे एक उपकेंद्र लातूर येथे स्थापन होत आहे. लातूर शहरात अनेक शैक्षणिक संस्था असून शिक्षणाच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा एक उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.