लेखसंग्रह

अदृश्य’ रूळांवर धावणारी रेल्वे चीनकडून सादर

Category:

 

चीन लवकरच एक अशी रेल्वे सुरू करणार आहे, जी रूळांशिवायच धावेल. ही रेल्वे अदृश्य रूळांवरून मार्गक्रमण करणार आहे. चीनमध्ये व्हर्च्युअल रेल्वे ट्रकवर धावणाऱया या नव्या प्रकारच्या रेल्वेचे पहिले दृश्य दाखविण्यात आले आहे. चीनच्या या सेवेचे नाव ऑटोनॉमस रॅपिड ट्रान्झिट (एआरटी) ठेवण्यात आले आहे. ही रेल्वे 30 मीटर लांब असून यात असे सेन्सर बसविण्यात आले आहेत, जे रस्त्याची लांबी-रुंदी आणि विस्तार स्वतःच जाणून घेतील. या सेन्सरच्या मदतीने रेल्वे विनाधातूच्या रूळांवरील आपल्याच मार्गावर धावणार आहे.

  September 16, 2017


लेखसंग्रह

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

Category:

 

अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या !

  September 16, 2017


लेखसंग्रह

थायरॉइड नियंत्रणात येतो

Category:

 

अचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो. जनसामान्यांना थायरॉइड या आजाराची माहिती करून देणं, आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा लेख.

  September 16, 2017