अवर्गिकृत

वाचावेसे वाटले म्हणून – भाग 1

Category:

 

मी दादरला ( सुखात ) रहात असताना ( गेले ते दिवस ) माझ्या आजीच्या माहेरच्या दूरच्या नात्यातील एक वृद्ध गृहस्थ आमच्या घरी आठवड्यातून एखादी चक्कर मारत असत. ते येताना ( न चुकता ) माझ्यासाठी १० पैशांची दोन पेपरमिट आणत. एकदा असेच त्यांनी दिलेले पेपरमीट चघळत, मी बेसावध असताना त्यांनी भागवत चंद्रशेखरप्रमाणे गुगली टाकला…. “बाळ , तू अभ्यासाव्यतिरिक्त काही अवांतर वाचन करतोस की नाही ?”

  December 6, 2024


साहित्य - ललित

मेरिट

Category:

 

पण गीता ला मात्र अश्या प्रसंगांची अगदी लहानपणा पासूनच सवय होती , नीता आणि गीता या सुलभा ताई आणि श्रीधर राव यांच्या संसार वेलीवर दोन वर्षांच्या अंतराने उमललेल्या कळ्या..पण आत्ता पर्यंतच्या आयुष्यात नियतीचे फासे मात्र दोघींसाठी काही एकसारखे पडले नव्हते , नीता मोठी म्हणून लाडाची या न्यायाने प्रत्येक गोष्ट तिला न मागता विनासायास … मिळत गेली , नवीन सायकल असो वा कपडे किंवा वह्या पुस्तकं नीताला सगळं नवीन मिळायच , आणि ” चांगलेच तर आहेत की , कुठं खराब झालेत ? ” अश्या पालुपदांनी मात्र नीताचे वापरून झालेले कपडे व पुस्तकं गीताच्या वाट्याला यायची , आणि ती ही सगळं हसतमुखाने , विना तक्रार स्वीकारायची .

  December 5, 2024


साहित्य - ललित

गेट टुगेदर

Category:

 

वॉट्सअप मेसेज च नोटिफिकेशन वाजलं आणि रोहन ने झटकन मोबाईल उचलून मेसेज चेक केला. पण त्याला अपेक्षित असलेले मेसेज नव्हते … फोन बाजूला ठेवून त्याने पुन्हा लॅपटॉप मध्ये लक्ष केंद्रित केलं, थोड्या वेळानं पुन्हा एकदा मेसेज ची टोन वाजली आणि ते मेसेज पाहताना नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं .

  December 1, 2024


अवर्गिकृत

माझे सूचीलेखन कार्य

Category:

 

१९७८ साली मी पीएच. डी. पदवी मिळवली. त्यानंतर काही दिवसात मला मराठी विभागाचे पत्र आले. विभागाने वाड़्मयीन नियतकालिकांवर एक प्रकल्प घेतला होता. त्या आधी पुष्पा भावे यांनी ‘विविधज्ञानविस्तार’ या एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकावर पीएच. डी. पदवीकरिता प्रा. अ.का. प्रियोळकर यांच्याकडे नाव नोंदवले होते आणि त्या नियतकालिकामधील लेखांची सूचीही केली होती.

  November 30, 2024


अवर्गिकृत

आठवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

Category:

 

मी आणि व्ही.पी. सिंग आम्ही दोघेही संभ्रमावस्थेत असण्याचा तो १९८८-८९ चा मंतरलेला काळ होता. पंतप्रधान बनण्याच्या कल्पनेने ते आणि कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या आशेने मी ,असे आम्ही दोघेही पछाडलेले होतो. निर्माता, दिग्दर्शक आणि नायक बनण्याच्या कल्पनेने महेश कोठारे ( डँम इट ) ‘झपाटलेला’ होता जवळपास तसेच.

  November 29, 2024


लेखसंग्रह

चित्रकलेचा हात

Category:

 

मला चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत जात होते. घर शाळेच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचे चित्रकलेचे सर मला सुस्वागतमची रांगोळी काढायला बोलवत असत. त्यांचा मला जास्त सहवास मिळायचा व ते मला चित्रकलेबद्दल बरेच सांगायचे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं दरवर्षी एक मासिक काढलं जायचं, त्याचं मुखपृष्ठ नेहमी मीच काढत असे.

  November 29, 2024


लेखसंग्रह

अरण्यातील ‘लाल सोनं’ : रक्त चंदन

Category:

 

रक्त चंदन म्हटले की बहुतेक जणांना चंदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते. सफेद चंदनाचे फेसपॅक, अगरबत्ती, किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊ यात.

  November 28, 2024


अवर्गिकृत

नाट्यक्षेत्राने केले माझे जीवन समृद्ध

Category:

 

माझा मोठा भाऊ सुरेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन कुठल्यातरी नाटकातले संवाद सादर करायचा. घरातल्या हॉलमध्ये आईच्या काही नऊवारी साड्या किंवा रोज वापरायच्या चादरी इकडे तिकडे लटकावून त्यांचं स्टेज तयार व्हायचं. आम्ही बाल गोपाळ , मित्रमंडळी हे सगळे त्यांचे प्रेक्षक असायचो.

  November 28, 2024