चिनी कोलदांडा
Category:
लेखसंग्रहचीन आणि पाकिस्तानसारखे विश्वासघातकी देश शेजारी म्हणून लाभले हे भारताचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. त्यांच्याशी भारताने कितीही चांगले संबंध प्रस्थापित केले.. कशीही जवळीक साधली. तरीही त्यांचं शेपूट काही सरळ होत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, हेच या दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरण राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत याचं पुन्हा प्रत्यंतर आलं. भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘जैश-ए-महंमद’ या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने पुन्हा एकदा कोलदांडा घालून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
March 17, 2019