साहित्य - ललित

युरोपायण – पहिला दिवस

Category:

 

मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला.

  August 18, 2019


लेखसंग्रह

आजीवन साहचर्य म्हणजे विवाह

Category:

 

आजकालचे नाते-संबंध अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत. यातून घटस्फोटाला प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी प्रामुख्याने व्यभिचार, सुसंवादाचा अभाव, अवास्तवी अपेक्षा, समानतेचा अभाव, कौटुंबिक हिंसा, आर्थिक समस्या, राग, संताप, भावनिक जवळीकतेचे अभाव इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. याव्यतिरिक्त मानसिक आजार आणि हिंसक प्रवृत्ती घटस्फोटासाठी प्रवृत्त करते.

  August 18, 2019


साहित्य - ललित

ध’ चा ‘मा’

Category:

 

कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला. महाराज आज्ञा असावी. अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले. उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत म्हणाला. गधड्या मला म्हणायचं होतं ताबडतोब त्यांना बोलावून आण. जसे असतील तसे.
टॉवेलात असतील तरी चालतील कां तुम्हांस..

  August 18, 2019


साहित्य - ललित

वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

Category:

 

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते.

  August 18, 2019


लेखसंग्रह

शब्दसौंदर्य..

Category:

 

बालपणी शब्द आणि धन हे समीकरण सहसा मनाला पटायचंच नाही. हे कसचं धन..? शब्दांनी का आपल्याला एखादी वस्तू मिळते..? का हौसमौज होते..? यासाठी तर खण खण वाजणारा पैसाच हवा ना. त्यावेळी शब्द, रत्न आणि धन याचा मेळ लागता लागत नसे.

  August 18, 2019


कलम ३७० पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना
लेखसंग्रह

कलम ३७० पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना

Category:

 

गेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते.

  August 18, 2019


व्यक्ती-परिचय

लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे

Category:

 

तुकारामांचे अभंग इंग्रजीत नेऊन त्यांना ‘ग्लोबल’ करणारे लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात ‘दि.पु.’,, दिलीप चित्रेंच्या मराठी आणि इंग्रजी कवितांची भारतीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.

  August 18, 2019


लेखसंग्रह

चक्कर येत असल्यास कोणते उपाय करावेत

Category:

 

मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे.

  August 18, 2019